प्राधान्य कोणाला .. श्रध्दा जहागिरदार
प्राधान्य कोणाला
अनिता व सुनिता नणंद- भावजयी
अनिता ही नोकरदार स्त्री, सुनिता गृहिणी.
सुनिता चा पुर्ण वेळ घर कामात
निघून जायचा. मुलांच्या वेळा संभाळणे,नवर्याच्या वेळा संभाळणे, मुलांचे अभ्यास यातच तिचा पूर्ण दिवस जात असे.एकंदरीत गृहिणीचे
कर्तव्य ती उत्तम रीत्या पार पाडत होती.
अनिता तिचे मिस्टर व सासू- सासरे
असे तिचे कुटुंब.सकाळी उठून
भरभर सगळे आवरून ऑफिस ला
जाणे हा तिचा दिनक्रम.
सुनिताला आपण नोकरी करत नाही. फक्त चुल आणि मुल करत बसलो यांची खंत तिला सतत मनात
बोचत असे. कधीकधी अनिताचा
तिला हेवा वाटत असे.अनिता पण
कधीकधी सुनिताला टोमणे मारायची
“घरात बसून तुम्ही बायका काय
करता!” रांधा वाढा, उष्टी काढा”
त्यामुळे सुनिता स्वत:ची स्वत:ला
कमी लेखायची.आपण काही करत
नाही, ही खंत तिला सतत टोचत असे.
अनिताचे धावपळीचे जीवन.
त्यामुळे कधीकधी सासू-सासर्यांच्या
मनासारखी प्रत्येक गोष्ट करणे तिला
जमत नसे.अनिताच्या सासूबाईंना
सुनिताचे नेहमी कौतुक वाटत असे.
” बाईने नोकरी करणे एवढे सोपे नाही. घर सांभाळणे हे तिचे
पहिले कर्तव्य.”
त्यामुळे न जाणो पण, आपण नोकरी
करतो, पैसा कमावतो म्हणून सुनिता
आपल्याला पाण्यात पहाते. असा
विचार अनिता च्या मनाला शिवून जायचा.
एकदा अनिताच्या सासूबाईंची तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये
admit केले. अशा वेळ प्रसंगी अनिताला वेळ नसल्यामुळे सुनिताने
अनिताच्या सासूबाईंची पूर्ण
काळजी घेतली. हॉस्पिटलमध्ये रोज डबा नेणे,अनिताच्या मुलांना शाळेत सोडणे. तिच्या परीने तिला
सोडणे. तिला जमेल तेवढी मदत
सुनिताने आपल्या नंणंदेसाठी
केली. अनिताच्या सासूबाईंना
सुनिताचे खुप कौतुक वाटले. ‘”माझी खुप सेवा केली बरे” असे त्या वारंवार म्हणत होत्या.
पण सुनिताला एकाच गोष्टीची खंत वाटली. अनिताने एका शब्दाने पण आपल्याला जाणीव करून दिली
नाही.” वहिनी खरच आज तुझ्या
आधारामुळे मी आज सासूबाई
हॉस्पिटल मध्ये असून पण माझी
नोकरी संभाळू शकले. ” आपण
आपले कर्तव्य केले असे मनास
बजावून सुनिता गप्प राहिली. या
कालावधीमध्ये अनिताच्या मुलांना
मामीचा ( सुनिता) चा चांगलाच लळा लागला. दिवस जात होते.
अचानक एकदा सुनीताच्या
मिस्टरांची ( अनिताच्या ) भावाची तब्येत बिघडली. डॉ. ने मोठी
शस्त्रक्रिया सांगीतली. खर्च बराच येणार होता. आर्थिक परिस्थिती
बळकट नाही, शस्त्रक्रियेसाठी एवढा
पैसा कोठून आणायचा या चिंतेने
सुनिताला ग्रासले. खरच आपण
नोकरी करायला पाहिजे होती. तो
पैसा आज उपयोगी पडला असता.
चिंताग्रस्त सुनिता हॉस्पिटलच्या बेंचवर निराशतेने बसली होती.
मनातल्या मनात पैशांची जमवाजमव करत होती. तेवढ्यात पाठीवरून मायेचा हात फिरला. मागे वळून
सुनिताने पाहिले. ती अनिता होती.
न रहावून सुनिताला हुंदका आला.
” एवढा पैसा मी कोठून आणू गं!! म्हणत ती हुंदके देऊन रडू लागली.
अनिताने आपल्या वहिनीला ( सुनिताला ) प्रेमाने जवळ घेतले. “अगं वहिनी आज तोवर मी नोकरी
केली काहीतरी पैसा जमवला असेल
ना! तो आता कामी येणार नाहीतर कधी! काळजी करु नको दादाची
शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडेल. ”
माझ्या सासूबाईंची तू वेळेला एवढी सेवा केली , त्यावेळी मला मनुष्यबळ हवे होते ते तू पुरवले ,आज माझ्या भावाला आर्थिक गरज आहे ते मी
नाही पुरवणार!! तेवढी जाणीव आहे गं मला.” दोघी आनंदाश्रूंनी एकमेकाच्या गळ्यात पडल्या व हसत हसत टाळी दिली.
एवढेच सांगायचे आहे, आज समाजात एखाद्या स्त्री ला मी गृहिणी
आहे हे कमी पणाचे वाटते. आपण काय फक्त घरच सांभाळतो.याची तिला खंत वाटत रहाते. पण तो पण
एक मोठा जॉब आहे.
एकिकडे नोकरी करून घर
संभाळणे हे काही सोपे नाही. तो
पण कसरतीचा जॉब आहे.
शेवटी स्त्री ने नोकरी करणे काय किवा गृहिणी होणे या दोन्ही गोष्टी गरजेच्या व योग्य आहेत.
आपल्या आपल्या जागी दोन्ही श्रेष्ठ आहेत. दोघींना पण प्राधान्य दिले पाहिजे.
श्रध्दा जहागिरदार🙏🙏