Classifiedमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Second Inning ची आर्थिक तयारी Part II अक्षय पारखी aksh747@gmail.com , CA

आपला पहिला भाग, Second Inning ची आर्थिक तयारी कशी करता येईल या बद्दल होता.
आयुष्यातली येणारी inning पहिल्या inning पेक्षा वेगळी असते. म्हणजे पहिली इंनिंग जर आपल्या २५ शी
नंतर चा आयुष्यातली असते असे धरून चालले तर young age करिअर दिवसात खूप
achievement देऊन जाणारी असते. कौटुंबिक आयुष्याचा प्रवास, असा हा साधारण पणे २५ ते ४५ मधला
काळ. हा life settled होण्याचा, अनुभव आणि maturity देऊन जाणारा प्रवास असतो.
त्याच्या पुढच्या काळात पैसा बरोबर ठेवून, स्वतः साठी जास्त वेळ देऊन एन्जॉय करायची वेळ असे
म्हणले तर योग्य ठरेल.
स्वतःच्या आवडी निवडी समजून त्याच्या वर काम करणे तसे सोपे नसते. हा प्रश्न जेव्हा चर्चेत येतो
तेव्हा आपली नक्की आवड काय हे लगेच confirm करू शकत नाही. अर्थात खूप पटकन निर्णय घ्या
आणि पुढे चला असे काही घाईचे हे काम करण्यात अर्थ नाही.
संगीत, गायन, वाचन हे पटकन डोक्यात येणारे विषय. त्यात गायन किंवा गुणगुणणे हे फार common
आहे. पण त्याला एका system मध्ये करणे म्हणजे त्यातले गुरु शोधणे . त्याची प्रॅक्टिस कधी कुठे
करावी ह्याचे time table करणे, क्लास म्हणाला कि त्याची फी, क्लास ची वेळेचे planning करणे.
अर्थात त्यातून मिळणारा आनंद उपभोगायचा असतो, त्यामुळे तुलनातम्क विचार करणे योग्य होत नाही.
पण आपल्याला आनंद कशात आहे हे नीट ओळखता येणे मह्त्वाचे.
ह्या second inning मधील आवडी निवडी खूप वेगळ्या पण असू शकतात. मला एक गृहस्थ भेटले होते,
त्यांनी त्यांचा second inning मध्ये Laundry चे काम करायला आवडेल असे सांगितले. हे ऐकल्या वर
एका बनियान आणि लुंगी मध्ये फार वजनदार असा इस्त्री घेऊन उभा असलेला मनुष्य माझा डोळ्या
समोर आला. मग पटकन डोक्यात आले हि कसली second Inning. जेव्हा त्यांच्याशी अधिक बोललो
तेव्हा कळले कि इस्त्री करून जी टापटिप येते ती त्या गृहस्थाला खूप आवडायची. त्यातला अर्थ लागल्याने
त्याची कल्पना छान वाटली.
मी नोकरी करत असणाऱ्या लोकांना second inning बद्दल विचारले कि तुमच्या कोणत्या आवडी वर
तुम्ही पुढे काम करू पाहाल. त्याचे सहज पटकन उत्तर काही मिळत नाही .
म्हणजे नोकरी एके नोकरी, त्यातील responsibilities, हे जर नाही झाले तर… अशा गोष्टी ने मनुष्य
आपल्या आवडी निवडीना जसे विसरून च जातो. त्या सगळ्या विचारातून बाहेर पडून आपल्या मध्ये
आनंद शोधणे हे वेळ देऊन करण्याचे काम असते.

काही वेळेला profession is my passion असू शकते. म्हणजे HR profession मध्ये त्याच्या related
काम म्हणजे Recruitment, training and development हे पुढे चालू ठेवावे असे वाटते. तसे झाले तर
आपण नोकरी नसून पण कामात busy राहतो, आपले contacts, network तसेच रहातात परत त्यातून
काही पैसे पण देऊन जातात, हि अशी passionate journey पण आनंद देणारी असते.
Investment in share market हा COVID नंतर पैसे देऊन जाणारा, work from home करावा असा
business आहे. ATM सारख बटण दाबले कि पैसे देणारे machine नसले तरी योग्य विचार शक्ती ने
जर काम केले तर दिवसात ५-६ तासात काहीसा पैसा मिळू शकतो. परत त्याचा अभ्यास, seminar,
coaching हे सगळे करायला लागणारा वेळ, पैसा, Capital requirement चे planning करणे, हि खरंच
खूप मोठी second inning आहे.
काही profession किंवा स्वतःचा व्यवसाय सोडला तर रिटायरमेंट येणे गृहीत आहे. ती रिटायरमेंट हवीशी
वाटली तरी ती खूप boring नसावी. त्याचे planning खूप आधी पासून केले तर Second Inning wiil
be much more exciting than first inning.
असे म्हणतात कि Thinking kills Action. जर हि thinking ५० शी नंतर आली तर जीवन थांबल्या
सारखे वाटु शकते. परत जीवनात असे रिटायरमेंट सारखे काही आहे हेच मुळात काढून टाकायला पाहिजे
असते.
त्यामुळे माणसाची कृती हीच जीवनाची दिशा असे आपण म्हणून पुढे चालत राहावे. ती दिशा आपल्या
एका छंदात शोधावी किंवा काही passionate activity मध्ये शोधावी.
तर जीवनाच्या या पायरीवर जे पाऊल टाकत असतील त्यांनी ह्याचा विचार करून पाहावा.

अक्षय पारखी

aksh747@gmail.com

The writer for this article is a CA

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}