नाते जन्मांतरीचे कथाविश्व
नाते जन्मांतरीचे
घरच्यांचा विरोध असूनही वैदेहीने सारंग सोबत पळून जाऊन लग्न केले. खरतर सारंग परप्रांतीय होता उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तो पुण्याला आला होता. आणि वैदेही पाटील घराण्यातील घरंदाज मुलगी होती. दहावी झाल्यानंतर ती ही पुढील शिक्षणासाठी पुण्याला आली तिथेच त्या दोघांची ओळख झाली. भाषा, रहाणीमान खाण्यापिण्याच्या सवयी सारे काही फार वेगवेगळे होते त्या दोघांचेही. पण म्हणतात ना प्रेम कसलीही बंधणे नियम पहात नाही व्हायचे असेल तर ते कुठेही कोणासोबतही होते. लग्न करून दोघेही पुण्याला निघूण आले. लग्न झाले तेव्हा ते दोघेही कॉलेजच्या दुस-याच वर्षाला होते. अचानक लग्न केल्यामुळे दोघांचेही शिक्षण थांबले. खरतर दोघांचीही पुढे शिकण्याची फार इच्छा होती पण वैदेहीच्या घरच्यांना त्या दोघांबद्दल कळाले आणि ते तिचे अर्धवट शिक्षण सोडून तिला कायमचे गावी घेऊण गेले आणि तिच्या लग्नाचे पाहू लागले. इकडे सारंगला तिच्या शिवाय एक क्षणही जगणे अशक्य झाले होते तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला आणि तिथूनच ते दोघे पुण्याला निघूण आले. पुण्यात आल्यानंतर सारंग नोकरी करू लागला. पुण्याला आल्यानंतर त्यानेही त्याच्या घरच्यांना वैदेही बद्दल सांगीतले पण त्याच्या घरच्यांनीही त्याला परजातीय मुली सोबत लग्न करण्यासाठी विरोध केला. वैदेहीला मात्र आशा होती की, कधी ना कधी तिच्या घरचे तिला समजून घेतील लग्न झाल्यापासून तिने एक दोन वेऴा घरी फोन ही केले पण तिचा आवाज ऐकून तिच्या घरचे सरळ फोन ठेऊन द्यायचे. सारंग तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा तिला घरच्यांची आठवण होऊ नये म्हणून खुप प्रयत्न करायचा पण कोणी काहीही केले तरी आई वडीलांची जागा नाही भरून काढू शकत. सारंगने लग्न केल्यावरही त्याच्या घरी एकदा फोन केला पण त्याच्याही घरच्यांनी त्याच्या लग्नाबद्दल ऐकून त्याच्या सोबतची त्यांची सर्व नाती तोडली. दोघांचेही त्यांच्या घरच्यांसोबत सगळॆ संबंध संपले. पण तरीही कोणाच्याही आधारा शिवाय ते दोघेही खुप छान रहायचे. एक दिवस सारंगने आईची आठवण आली म्हणून सहज त्याच्या घरी फोन केला तेव्हा त्याला त्याची आई खुप आजारी असल्याचे कळाले. तो आईला पहाण्यासाठी गावी निघाला. वैदेहीला इथे एकटीला सोडून जाणे त्याला योग्य वाटत नव्हते पण वैदेही सोबत लग्नाला त्याच्या घरच्यांनीही विरोध केला होता आणि त्यात त्याची आई आजारी असल्याने त्याला वैदेहीला घेऊण जाणे बरोबर वाटले नाही. शेवटी तो एकटाच जायला निघाला. निघताना त्याने वैदेहीला घरखर्चासाठी थोडे पैसे दिले आणि दोन चार दिवसांत परत येतो सांगून निघाला. वैदेहीला खुप भिती वाटत होती सारंग पुन्हा येईल की नाही याची पण सारंगने तिला वचन दिले होते काहीही झाले तरी नक्की परत येईन. तो जाण्याआधी तिच्यावर कधीही एकटी रहाण्याची वेळ आली नव्हती पण तरीही ती एकटी राहीली सारंग येण्याची वाट पहात. सारंग जाऊण साधारण पंधरा दिवस झाले होते तरीही तो आला नाही त्याकाळात फक्त लँडलाईन फोन होते सारंगने निघताना तिला त्याच्या घरचा म्हणून एक फोन नंबर दिला होता. वैदेही रोज त्या नंबर वर फोन करायची पण, सारंग नावाचे कोणीही इथे रहात नाही असे सांगून समोरची व्यक्ती फोन ठेऊन द्यायची. पुढे पुढे तर तिचा आवाज ऐकला की, त्या नंबरवर जे कोणी यायचे ते फोन ठेऊन द्यायचे. वैदेहीला काय करावे काहीही सुचत नव्हते पण वाट पहाण्याशिवायही तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. पुन्हा घरी जाण्याचा तर ती विचार सुद्धा करू शकत नव्हती. सारंग जाऊन महीना होत आला घरमालक भाडे घेण्यासाठी आल्यावर वैदेहीने घर खर्चासाठी सारंगने जे काही पैसे दिले होते ते घरमालकाला देऊन टाकले. ते पैसे दिल्यानंतर तिच्याकडे आता घर खर्चासाठी काहीच शिल्लक नव्हती. शेवटी तिने काहीतरी कामधंदा करायचे ठरवले पण अंगावरच्या कपड्यांवर तिने घर सोडले असल्यामुळे तिच्याकडे कोणतेही शैक्षणीक कागदपत्र नव्हते त्यामुळे शिक्षण असूणही तिला नोकरी मिळणे अशक्य झाले होते. आता पोट भरण्यासाठी तिच्याकडे घरकामाशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. पण तिथेही ती खचली नाही घरंदाज पाटील घराण्यातील पोर असूणही ती धुणीभांडी करायलाही लाजली नाही. पण म्हणतात ना वाईट वेळा आल्या की, चारीही दिशेने येतात तसेच काहीसे तिच्यासोबत घडत होते. दिसायला खुप सुंदर असल्याने एक तर तिला कोणी काम द्यायचे नाही आणि दिलेच तरी त्या घरातील पुरूष तिच्याकडे वाईट नजरेने बघायचे. नाईलाजाने तिला ते काम सोडावे लागायचे. दिवसें दिवस वैदेहीची अवस्था आणखीनच खराब होऊ लागली घरातील सर्व सामानही संपले होते. दोन महीणे झाल्यावर पुन्हा घरमालक भाडे घेण्यासाठी आला त्यावेळी वैदेहीकडे त्याला देण्यासाठी काहीही पैसे नव्हते घरमालकाने तिला सारंग बद्दल विचारले तिने सर्व हकीकत घरमालकाला सांगीतली सारंग आला की, पैसे देते असेही ती त्याला बोलली पण, घरमालकाला तिची दया आली नाही तिला धीर देण्याऐवजी तो तिला म्हणाला गेला पळून तुझा नवरा मन भरले असेल आता त्याचे मला काही माहीत नाही चार दिवसात भाड़े टाक नाहीतर घर खाली कर. वैदेहीला काहीच सुचत नव्हते चार दिवसात कुठून पैसे उभे करायचे त्या चार दिवसात ती काही न खाता पिता वेड्यासारखी काम शोधू लागली. चार दिवस झाल्यावर घरमालक पुन्हा आला भाड़े न भेटल्याने त्याने वैदेहीला घरातून काढून टाकले. शिवाय तिला तिचे सामानही घेऊ दिले नाही त्याने. संध्याकाळची वेळ होती चार दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कण ही नव्हता तिच्या. सारंगचे गाव मध्यप्रदेशात कुठे तरी आहे या शिवाय तिला काहीच माहीत नव्हते. तिने मनाशी ठरवले काही नाही आपणच जायचे त्याच्या गावी त्याला शोधायला तावातावाने पायी चालत ती पुणे स्टेशनला आली पण कसे जायचे कोणती गाडी त्याच्या गावी जाते तिला काहीही माहीत नव्हते शिवाय जवळ काहीच पैसेही नव्हते. पुन्हा हताश होऊण ती स्टेशनच्या बाहेर येऊन रडत रडत आता कुठे जायचे याचा विचार करत ती रस्त्याने चालू लागली. तितक्यात एक स्विफ्ट तिच्यासमोर येऊन उभी राहीली गाडीतून कोणीतरी हाॅर्न वाजवत होते गाडीची लाईट डोळयांवर पडत असल्यामुळे तिला गाडीतील काहीच दिसत नव्हते. काही वेळाने गाडीची लाईट बंद झाली गाडीतून एक तीस बत्तीस वर्षांचा विजय नावाचा व्यक्ती बाहेर आला तो तिला म्हणाला गाडीत बस! वैदेहीला काहीच कळत नव्हते तो कोण आहे कशासाठी थांबला आहे रात्रीचे साधारण दिड वाजले होते. तिने त्याला विचारले कोण आहात तुम्ही? आणि कुठे न्हेणार मला? तो म्हणाला चांगल्या होटेलवर न्हेतो खायला प्यायलाही देतो पुर्ण रात्र तिथेच थांबायचे. वैदेहीच्या पुढे रात्र काढण्याचा प्रश्न तर होताच शिवाय चार दिवसांपासून अन्नाचा एक कणही पोटात नव्हता. ती गाडीत जाऊण बसली. त्यानंतर तो तिला घेऊण चांगल्या हॉटेलवर गेला तिथे त्याने स्वतःसाठी ड्रिंक्स आणि तिच्यासाठी जेवण मागवले. भुकेने व्याकूळ झालेली वैदेही त्या जेवणावर वेड्यासारखी तुटून पडली. मदत केलेला माणूस कोण आहे आपल्याला इथे का घेऊन आला आहे शिवाय कोणतेही नाते नसताना त्याने आपल्याला जेवन का दिले हे तिच्या अजूनही लक्षात आले नव्हते. छोट्याश्या गावातून आलेल्या वैदेहीला असल्या बाहेरच्या जगाबद्दल काहीही माहीत नव्हते. पोटभर जेवन झाल्यावर ती दिवसभराच्या वणवणीने थकल्यामुळे जाऊन झोपली. विजयचे पिऊन झाल्यावर तो वैदेहीला उठवू लागला. वैदेहीला जाग आली विजय अर्धनग्न अवस्थेत तिच्या समोर उभा होता तो तिला तिचे कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करू लागला. वैदेहीला काहीच कळत नव्हते भेटल्यापासून देवासारखा वाटणारा विजय अचानक असा वागू लागल्याने तिचाही फार गोंधळ उडाला होता तिने त्याच्याकडे तिला सोडण्यासाठी खुप विणवणी केली पण तोपर्यंत केलेली नशा विजयच्या डोक्यावर चढली होती त्याला त्याच्यासमोर असणा-या सौंदर्याच्या उपभोगाशिवाय काहीही सुचत नव्हते. अखेर वैदेहीचे त्याच्या ताकतीपुढे काहीही चालले नाही. परीस्थीतीपुढे हताश झालेल्या वैदेहीकडे जे काही होत होते ते होऊ देण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. विजय मात्र संपूर्ण रात्रभर तिच्या शरीरावर स्वतःच्या शरीराची भुक भागवत राहीला. दुस-या दिवशी विजय स्वतःचे आवरून घरी जायला निघाला वैदेही पलंगावर स्वतःचे अश्रू पुसत बसली होती. विजयने तिला तिची किंमत विचारली. त्यारात्री वैदेहीचे सर्व काही उध्वस्थ झाले होते. विजयने तिच्यावर तिला पोटभर अन्न खाऊ घालण्यासाठी जबरदस्ती केली की, तो देणा-या पैशांची किंम्मत वसूल करण्यासाठी तिला काहीच कळत नव्हते. विजयने पुन्हा विचारले अगं सांग किती घेतेस एका रात्रीचे? वैदेही म्हणाली किती घेतात? किती देणार तुम्ही मला? काय किंम्मतीची वाटते मी तुम्हाला? विजय म्हणाला तू सांगना नेहमी किती घेतेस तू वैदेही म्हणाली मला नाही माहीत भुकेसाठी मजबूरीने केलेल्या कामाचे किती पैसे घेतात ते. विजय तिच्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला म्हणजे? वैदेही म्हणाली चार दिवस काही खाल्ले नव्हते तुम्ही जेवन देतो म्हणालात म्हणून मी तुमच्या गाडीत येऊन बसले. विजयला ते ऐकून धक्का बसला त्याने पुन्हा तिला विचारले याचा अर्थ तू कॉलगर्ल नाहीस? वैदेहीला काहीच माहीत नव्हते कॉलगर्ल हा शब्द तिने आयुष्यात पहील्यांदा ऐकला होता ती निरागसपणे विजयला म्हणाली, म्हणजे? विजय म्हणाला अगं म्हणजे तू देहविक्री नाही करत? वैदेही म्हणाली नाही. विजय पुन्हा म्हणाला अगं मग एवढ्या रात्री तू त्या रस्त्यावर का उभी होतीस? वैदेहीने त्याला सर्व हकीकत सांगीतली. ते ऐकून विजय म्हणाला अगं मग हे आधी का नाही सांगीतलेस. मला नव्हते माहीत तुम्ही मला काय समजून थांबलात शिवाय मला रात्र कुठेतरी काढायचीच होती भुकही लागलेली तुम्ही चांगल्या घरचे दिसलात म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेऊन तुमच्या गाडीत येऊन बसले. ते ऐकून विजयला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याला त्याच्या वागण्याचा खुप पश्चाताप होऊ लागला. त्याने वैदेहीला विचारले आता काय करणार कुठे जाणार? त्यावर वैदेही म्हणाली मलाच ठाऊक नाही आई बाबा तर मला उभेही करणार नाहीत. सारंगचाही माझ्याकडे पत्ता नाही. तो वैदेहीला म्हणाला मला माफ कर मी तुझा अपराधी आहे सांग मला आता मी तुझी कशा प्रकारे मदत करू? वैदेही म्हणाली पैसे देण्यापेक्षा मला कुठे काम लावलत तर बरे होईल खुप उपकार होतील तुमचे. विजय म्हणाला उपकार नाही गं तुला मदत करणेच माझे प्रायश्चीत असेल आता. माझे स्वतःचे कॉफी शॉप आहे इतर कामांमुळे मला तिकडे लक्ष नाही देता येत तुच संभाळ इथून पुढे ते. आणि रहाण्याचे म्हणशील तर इथे माझा स्वतःचा फ्लॅट आहे मी तिथे एकटाच रहातो तिथे रहा तू माझ्यासोबत. विजयला झालेला पश्चाताप तिला त्याच्या डोळयांत स्पष्ट दिसत होता. शिवाय तिच्याकडे त्याचा आधार घेण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता ती काहीही न बोलता त्याच्या सोबत त्याच्या घरी जायला तयार झाले. जाता जाता विजय तिला काही कपडे घेऊण दिले. दुपारी तिला घरी सोडून तो त्याच्या कामासाठी निघूण गेला. विजयचे घर खुप सुंदर होते पण विजय एकटाच रहात असल्याने अस्थाव्यस्थ तर होतेच आणि खुप कचराही झाला होता घरात. संध्याकाळी विजय घरी आला तेव्हा तो पहातच राहीला घराकडे. त्याने पुन्हा खात्री करून घेतली की आपण आपल्याच घरात आलो आहे का. घरात जराही पसारा दिसत नव्हता प्रत्येक वस्तू व्यवस्थीत जिथल्या तिथे ठेवली होती. खुप प्रसन्न वाटत होते त्याला किचन मधून छान आल्याच्या चहाचा वास येत होता. तितक्यात देवघरातून घंटीचा आवाज आला अगरबत्ती हातात घेऊन काहीतरी पुटपूटत वैदेही देवघरातून अगरबत्ती घरभर फिरवत बाहेर आली. अचानक विजयला हॉल मधे पाहून दचकली आणि त्याला म्हणाली बापरे घाबरले ना मी, कधी आलात तुम्ही. विजय म्हणाला केव्हाच आलो आहे सॉरी सवयी प्रमाणे माझ्याकडच्या चावीने दरवाजा उघडून आत आलो. वैदेही म्हणाली अच्छा ठिक आहे फ्रेश होऊन या मी चहा आणते. वैदेही दोघांनाही चहा घेऊन आली विजय चहा पितापिताच संपूर्ण घराकडे पहात होता. वैदेही म्हणाली,काय पहात आहात एवढे? विजय म्हणाला खुप छान ठेवले आहेस घर तू थँक्स आज पहील्यांदा हे घर घरासारखे दिसत आहे. वैदेही म्हणाली एवढ कुठे काय केले आहे फक्त घरातील वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या आहेत. खरतर तुमचे घरच खुप छान आहे. पुन्हा विजय म्हणाला बर ते जाऊदे तुझ्याकडे सारंगचा फोटो आहे का? वैदेही म्हणाली हो आहे पण माझ्या सामानामधे आहे घरातून काढल्यावर भाडे न दिल्यामुऴे घरमालकांनी माझे सर्व सामान त्यांच्याकडेच ठेऊन घेतले भाडे दिल्यावरच घेऊन जा बोलले. वैदेहीने विचारले कशाला हवा आहे तुम्हाला फोटो विजय म्हणाला काही नाही असेच उद्याच जाऊन आपण तुझे सामान घेऊन येऊ. दूस-या दिवशी ते दोघे जाऊन सामान घेऊन आले. त्याच दिवशी वैदेही कॉफी शॉपलाही गेली पहील्याच दिवशी तिने सर्व काम समजून घेतले घर आणि कॉफीशॉपही छान संभाळू लागली होती ती. पुढे विजय आणि वैदेही मधे खुप छान मैत्री झाली. पण वैदेहीला नेहमी प्रश्न पडायचा विजयला कोणीच कसे नाही तो एकटाच का रहातो त्याचे नातेवाईक कुठे आहेत? न राहून एक दिवस तिने विजयचा मुड पाहून त्याला त्याच्याबद्दल विचारले. विजय तिला म्हणाला सांगणे गरजेचेच आहे का? वैदेही म्हणाली हो प्लिज आज सांगा पुन्हा कधीही नाही विचारणार. तेव्हा विजय म्हणाला कॉलेजमधे असताना माझे एका मुलीवर फार प्रेम होते. तिची परिस्थीती खुप नाजूक होती शिवाय आमची जातही वेगळी त्यामुळे आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला. शेवटी लग्न होत नसल्याने तिने आत्महत्या केली. ती गेल्यापासून मी खुप दारू प्यायला लागलो. माझ्या मनस्थीतीपेक्षा माझ्या घरच्यांना त्यांची गावातील प्रतीष्ठा जास्त महत्वाची वाटत होती त्यामुळे त्यांनी मला प्रोपर्टीतील माझा हिस्सा देऊन घरातून हाकलून दिले. त्यानंतर मी इकडे येऊन एकटा राहू लागलो. खर सांगू तुझ्यात आणि मी जिच्यावर प्रेम करत होतो तिच्यात मला काहीच फरक वाटत नाही तिने परीस्थीती पुढे हार मानूण जीव दिला आणि तू परीस्थीतीमुळेच जिवा इतके मौल्यवान तुझे चारीत्र्य दिलेस. माझ्यासाठी तुमच्या दोघींचेही पावित्र्य एकसारखेच आहे. तिच्यासाठी तेव्हा मला काहीच करता आले नाही पण तुझ्यासाठी जिवात जिव असे पर्यंत करणार विजयचे बोलणे ऐकून वैदेही रडू लागली तिला रडताना पाहून विजय ताडकण घरातून निघूण गेला. वैदेहीला कल्पना होती तो कुठे गेला असेल याची. पिल्यानंतर विजयचा स्वतःवर ताबा रहात नाही आणि त्याची तिच्या मनातील किंमतही तिला कमी होऊ द्यायची नव्हती म्हणून ती तो येण्याआधीच झोपण्याचे नाटक करू लागली. काही वेळाने विजय दरवाजा खोलून आत आला. धडपडत तो वैदेहीच्या खोलीकडे तिला आवाज देत देत गेला. वैदेही घाबरली होती घाबरून डोळे मिटून अंग चोरून झोपून मनातल्या मनात देवाचा धावा करू लागली ती. तिला झोपलेली पाहून विजय तिच्या आणखी जवळ गेला. त्यानंतर ती खुप जास्त घाबरली. विजय तिच्याजवळ गेला धडपडतच त्याने तिच्या अंगावर चादर टाकली आणि बाहेर येऊण हॉल मधेच सोफ्यावर झोपून गेला. वैदेहीला फार वाईट वाटले त्याच्या बद्दल इतका वाईट विचार केल्यामुळे. तिच्या मनात विचार आला विजय काही खाल्ले नसेल तर ती पटकन उठून बाहेर आली तिने त्याला उठवण्याचा खुप प्रयत्न केला पण त्याला जाग आली नाही. वैदेहीने त्याचे बुट आणि मोजे काढून ठेवले आणि त्याला व्यवस्थीत झोपवून तिही स्वतःच्या खोलीत जाऊन झोपली. सकाऴ झाली वैदेही आवरून कामालाच निघाली होती जाण्याआधी तिने विजयला उठवले. रात्री जास्त झाल्यामुळे सकाळी उठल्यावरही त्याच्या तोल जात होता. वैदेही त्याची सर्व गंम्मत पहात होती तिने जाऊन त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवूण आणले आणि त्याच्या हातात देऊन म्हणाली झेपत नाही तर नाही प्यावी एवढी माणसाने. विजयनेही काही न बोलता गपचूप शहाण्या मुलासारखा ग्लास तोंडाला लावला आणि चोर नजरेने तिच्याकडे पाहीले ती हाताची घडी करून त्याच्याकडे पहातच होती. त्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहून खुप हसू लागले. वैदेही म्हणाली जमेल ना व्यवस्थीत गाडी चालवायला की येऊ सोडायला? विजय हसतच म्हणाला हो ये ना येते का गाडी चालवायला? आली मोठी जा निघ उशीर होतो आहे तुला आहे मी आता ठिक.
खुप छान नाते झाले होते दोघांचेही पहील्यांदा नकळत झालेल्या चुकीनंतर विजयने कधीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहीले नाही. वैदेहीही सारे काही विसरून त्याचा खुप आदर करू लागली होती. विजय तिच्या आयुष्यात अश्याप्रकारे सामावून गेला होता की, आता तिला कोणाचीही आठवण होत नव्हती अगदी सारंगचीही नाही. विजय आणि वैदेही सोबत रहात होते त्याला सहा महीण्याहून अधीक काळ होऊन गेला होता. आजूबाजूचे लोकही त्यांना आता पतीपत्नी समजू लागले होते. पुढे ते दोघेही फार मोकळे राहू लागले होते एकमेकांसोबत. खुप जवळ येत चालले होते ते एकमेकांच्या. ते दोघेच एकमेकांचे मित्र,नातेवाईक,मार्गदर्शक सर्व काही झाले होते तसॆ पहायला गेले तर काहीच नाते नव्हते त्या दोघांच्यातही पण तरीही खुप काही झाले होते ते एकमेकांचे. म्हणतात ना कधीकधी काही नात्यांना खरच कोणत्याही नावाची गरज नसते अगदी तसेच.
एके दिवशी पहाटे अंघोळ झाल्यानंतर देवपुजा करून वैदेही विजयला उठवायला त्याच्या खोली मधे गेली त्याला खुप गाढ झोप लागली होती. काही केल्या उठतच नव्हता. शेवटी गंम्मत म्हणून तिने तिच्या केसातील दवबिंदू त्याच्या तोंडावर झटकले. त्यानंतर त्याला जाग आली. नुकताच झोपेतून उठल्यामुळे वैदेही त्याला अस्पष्ट दिसत होती. शिवाय ती नुकतीच अंघोळ करून आल्याने तिचे खुललेले रुप तिच्या शरीरातून येणारा सुगंध त्याला मोहवत होता तो स्वतःला अडवू शकला नाही. त्याने तिचा हात पकडून तिला पलंगावर खेचले त्यानंतर त्याने तिच्या चेह-यावरचे केस बाजूला केले. तिही जे काही होत होते त्याला विरोध करत नव्हती शांत पडून त्याच्यात एकरूप होण्यासाठी तिही तयार होती. त्याने अलवार त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले, त्यानंतर तिच्या सुंदर टपो-या डोळयांवर आणि गालांवरही टेकवले. अखेर तो तिच्या नाजूक मानेवर आला आणि तिच्या मानेवर तो त्याचे ओठ अलवार फिरवू लागला. त्याच्या श्वासातून निघणारी गरम हवा तिलाही खुप सुखावत होती. आणखी पुढे जाण्याआधी मात्र तो भानावर आला आणि तिला सॉरी बोलून उठून जाऊ लागला. वैदेहीला त्याच्यामधे भान हरवून विरघळून जायचे होते तिने त्याचा हात पकडला विजयने तिच्याकडे पाहीले ती तिचे दोन्ही हात पुढे करून म्हणाली प्लिज…विजयने तिच्या गालावर हात ठेवला आणि प्रेमाने तिला म्हणाला नको राजा. विजय वैदेहीचा खुप आदर करू लागला होता कोणत्याही नात्याशिवाय तिच्या इतके जवळ जाणे आता त्याला बरोबर वाटत नव्हते. खरतर दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करू लागले होते. वैदेहीची अवस्था थोडी वेगळी होती तिला तिचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करता येत नव्हते. आधीच त्याचे खुप उपकार होते तिच्यावर शिवाय ती आधीच कोणाची तरी पत्नीही होती. त्याच दिवशी उठल्यावर विजयने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मंदीरात जाऊण त्याने लग्नाची सर्व तयारीही केली आणि वैदेहीला फोन करून म्हणाला वैदेही तुझ्यासाठी सरप्राईज आहे छान साडी नेसूण तयार रहा. वैदेहीनेही आवरायला घेतले. काहि वेळाने तिला घेण्यासाठी तो घरी आला. चावी जवळ असूणही दरवाजा उघडल्या बरोबर तिला साडी मधे पहाण्यासाठी त्याने बेल वाजवली. वैदेहीने दरवाजा उघडला विजय तिच्याकडे भान हरवल्यासारखे पाहू लागला खुप सुंदर दिसत होती ती अगदी एखाद्या बाहूली सारखी. वैदेहीचे डोळे पाण्याने गच्च भरले होते डोळयातील एक थेंब तिच्या गालावरून ओघळतच होता की तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली थँक्स…ती मिठीत आल्याबरोबर विजयला तिच्या मागे खुर्चीवर बसलेला सारंग दिसला. सारंग उठून समोर आला आणि म्हणाला थँक्यू विजयजी तुम्ही नसतात तर आज काय झाले असते माझ्या वैदूचे. मी खुप येण्याचा प्रयत्न केला पण माझ्या घरच्यांनी मला डांबून ठेवले होते. शेवटी मित्रांच्या मदतीने कसाबसा सुटून इथे पर्यंत आलो तुम्ही पेपरमधे जाहीरात दिली म्हणून मी तिला शोधू शकलो नाहीतर जवळ जवळ मी तिला गमावलेच होते. वैदेहीलाही काहीतरी खुप आवडते हातातून सुटल्या सारखी हुरहूर वाटू लागली होती. पण ती काहीही बोलू शकत नव्हती. विजयने सारंगचा फोटो कशासाठी मागीतला होता याचे कारणही तिला स्पष्ट झाले होते. विजयनेच त्याचा फोटो पेपरला दिला होता हे ही तिच्या लक्षात आले त्याची हिच इच्छा आहे समजून ती त्याला काहीही न बोलता सारंग सोबत जायला निघाली. जाताना विजयला काळजी घ्या म्हणून जड अंतःकरणाने ती तिथून निघूण गेली.
खरतर ते दोघेही आपआपल्या जागेवर योग्यच होते. वैदेही निघुण गेल्यानंतर विजय कोसळला आणि हॉल मधेच गुडघ्यावर बसून तो जोरजोरात रडू लागला. तिला स्वइच्छेने जाताना पाहून त्याला काहीच करता आले नाही. पुन्हा एकदा विजय इतकी स्वप्न रंगवून एकटा पडला. मनात भरलेल्या सर्व भावनांना त्याने अश्रूंवाटे वाट करून दिली. खिशातील मंगळसूत्र काढून हातात घेऊन पाहू लागला आणि गुडघ्यात मान घालून हताश होऊन पुन्हा स्वतःच्या नशीबावर रडू लागला. तितक्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मान वर केली रडून लाल झालेल्या डोळयांनी वर पाहीले समोर वैदेही उभी होती. त्याने पटकन डोळे पुसले आणि म्हणाला काय गं काही राहीले आहे का तुझे? वैदेही म्हणाली हो ना विजयने विचारले काय? वैदेहीही रडू लागली आणि म्हणाली तुम्ही. विजय तिच्याकडे पहातच राहीला आणि म्हणाला म्हणजे? वैदेही लटक्या रागाने त्याला फटके मारू लागली आणि म्हणाली मुर्ख, गाढव, बधीर, बावळट इतके प्रेम करत होतात मग सांगीतले का नाहीत? विजयने रडत रडतच तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला सांगणारच होतो आज. तर गेलीस निघुण त्याच्या सोबत जायचे ना मग कशाला आलीस पुन्हा वैदेही मिठीतून बाहेर आली आणि म्हणाली हो का? जाऊ का मग पुन्हा अजूणही गेला नसेल सारंग फार दुर. विजयने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला जिव घेईन मी तुझा आता जर मला सोडून गेलीस तर.
विजयला सोडून जाताना वैदेहीला तिथेच पाय-यांवर बसून जोरजोरात रडताना सारंगने पाहीले त्याने ओळखले आणि तो वैदेहीला म्हणाला जे प्रेम मी तुझ्या डोळयांत पहात होतो ते मला आता दिसत नाही. मला इतक्या दिवसांनी पाहून रडत रडत येऊन तू माझ्या मिठीत सामावशील असे वाटले होते मला पण तसे नाही झाले. तुझ्या चेह-यावर मी भेटल्याच्या आनंदा पेक्षा विजय पासून दुर जाण्याचे दुःख जास्त दिसत आहे. कसलाही विचार करू नको एकदा माझ्यासाठी आईवडील सोडून येण्याची हिंम्मत केलीस ना तशीच हिंम्मत आताही कर आणि मला सोडून तुझ्या ख-या प्रेमाकडे जा मी तुला आपल्या नात्यातून पुर्णपणे मुक्त करतो.
पुढे विजय-वैदेहीने लग्न केले. तिच्या हट्टासाठी तो तिला त्याच्या घरच्यांकडेही घेऊन गेला. वैदेहीला पाहील्या बरोबर सर्वांनाच ती आवडली. सर्वांनी तिला फार आनंदाने स्विकारले. पुढे तिच्या वाढदिवसा दिवशी त्याने तिला जगातील सर्वात महाग सरप्राईज द्यायचे ठरवलॆ तिच्या सासरचेही सर्व आले होते वैदेही खुप खुश होती. केक कापण्याआधी वैदेहीने विचारले अहो माझे सरप्राईज? विजय म्हणाला हो देतो थांब त्याने तिचे डोळे त्याच्या हातांनी झाकले आणि म्हणाला एक, दोन आणि तिन सरप्राईज… आणि डोऴयांवरचा हात काढला. सरप्राईज पाहून वैदेही वेड्यासारखी रडू लागली कारण सरप्राईजच तसे होते सरप्राईज म्हणून विजयने तिला तिचे आई-बाबा आणि भाऊ परत दिले होते. आज सगळयांना पुन्हा मिळवून ती खुप सुखात आहे. नेहमी आई वडील त्यांची मुलगी कन्यादान करून दुस-या मुलाला देतात पण विजय पहीला नवरा असेल की ज्याने लग्न करून एका आईबाबांना त्यांची मुलगी आणि मुलीला तिचे आई-बाबा पुन्हा दिले….
काही निर्णय चुकले होते माझेही
आणि भरकटून गेले होते मी माझ्या स्वप्नांचा जगात
एकाच नात्यात गुंतवून घेतले होते स्वतःला
दुस-यांच्या भावनांचे जराही भान नव्हते मला
मग एकटी पडल्यावर जगू लागले पश्चातापाचे ओझे घेऊन
संपवणार होते स्वतःला आयुष्यासमोर हार मानून
मग अशातच अचानक तु भेटलास
कोणत्याही नात्याशिवाय तू सहज माझा झालास
मग गुंतत गेले तुझ्यात विसकटलेल्या जगाचेही भान हरवून
पुन्हा नव्याने मी जगू लागले स्वप्नांच्या जगात जाऊण
तुही सहज स्विकारलेस मला माझ्या भुतकाळाला विसरून
नवे आयुष्यच दिलेस पुन्हा मला तुझी अर्धांगीणी बनवूण
आता तुझ्या शिवाय जगण्याचा विचारही सहण होत नाही
क्षणभर जरी दुर गेलास तरी मन माझे घाबरूण जाइ
लग्न झाल्यावर सर्वांनाच मिळतो सौभाग्याचा आहेर
तू मात्र नवे जिवन दिलेस देऊन मला माझे हरवलेले माहेर
पतीला परमेश्वर का म्हणतात हे तू दाखवून दिलेस
जगातील सर्व सुख देऊन मला तू तुझी जन्मभराची ऋणी केलेस…..
कथाविश्व – आपले आवडते कथांचे विश्व✨🎉