मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

*तुझ्यावाचून करमेना* श्रध्दा जहागिरदार

*तुझ्यावाचून करमेना*
आज सकाळी airport ला निघतानाच ठरवले की प्रवासात आपण मोबाईल कमीतकमी वापरायचा. आम्ही दोघे 2-4 दिवसाच्या ट्रिप साठी निघालो होतो. कॅब मध्ये बसले, नेहमीप्रमाणे मोबाईल साठी हात पर्स कडे गेला, एकदम लक्षात आले मोबाईल पहायचा नाही.
airport वरील सगळी procedure पुर्ण झाली. दोघे chair वर बसलो. परत हात मोबाईल काढण्यासाठी पर्स
कडे, लगेच दुसर्या मनाने पहिल्या मनाला सुचना केली मोबाईल पहायचा नाही. मला प्रश्न पडला 1 तास आहे एवढा वेळ आपण काय करायचे!!
खरं तर हा प्रश्न पडायलाच नको होता. घरी वेळ मिळत नाही. आपले नवर्याशी, नवर्याचे आपल्याशी जास्त बोलणे होत नाही. निवांत दोघे एकमेकांशी गप्पा मारत बसा ना. पण ‘ह्यांनी’ केंव्हाच मोबाईल हातात घेऊन त्यात डोके घातले होते.
मग मी ठरवले आज 1-2 तास आपण निरिक्षण करायचे. मग airport चा परिसर न्याहाळीत होते. new terminal ला थांबलो होतो. किती छान परिसर सजवला होता. प्रत्येक ठिकाणी कलात्मकता दिसत होती. सुंदर मनाला आकर्षीत करणारे
छोटे छोटे प्लान्ट्स सगळीकडे विशिष्ट
रचनेने लावले होते. वर रंगीबेरंगी आपल्यावर प्रकाश टाकणारी झुंबर, लाईट्स चमकत होते.
लोकांची ये- जा चालली होती. final call झाला म्हणून मध्येच एखादा जण पळताना दिसत होता. मला उगाच इच्छा झाली की आज येथे बसून आपण लोकांच्या चेहर्यावरचे हावभाव
न्याहाळायचे. समोर एक कपल निवांत पणे खुर्चीवर मान टाकून झोपले होते. दोघांना पण कशाचे भान नव्हते. म्हटलं एवढे गाढ झोपले आहेत प्लेन निघून गेलेले पण ह्यांना कळणार नाही. मनात म्हटले एवढी गाढ झोप लागणे पण आज धावपळीच्या जिवनात अवश्य आहे.
माझ्या दृष्टीक्षेपात येईल अशा रितीने एक बाई समोर बसल्या होत्या. बहुतेक एकट्याच होत्या. मोबाईल पहात नव्हत्या. पण काहीतरी गहन विचार ही बाई करत आहे हे माझ्या लक्षात आले. पुष्कळदा माणसाच्या चेहर्यावरुन त्याच्या मनातील विचारांचा अंदाज येतो. तिच्या चेहर्यावर एवढे टेंशन होते की मलाच प्रश्न पडला काय बरे हिला एवढे टेंशन असेल.
कोणी एकमेकांशी बोलताना मोकळेपणे हसत होते. कोणी नवरा- बायको एकमेकांशी गप्पा मारत होते( हा योग दुर्मीळ असतो) अर्थात सांसारिकच गप्पा असतील त्या. ह्या सर्व प्रकारात लोकांच्या मनातील हावभाव, अंतर्भाव, मनातील भाव व्यक्त करणारे हातवारे मी छान पैकी बसून न्याहाळत होते. ते न्याहाळण्यात, airport वरील परिसर मन लावून पहाण्यात, बाजूला fab india माझा आवडता कपड्याचा ब्रॅंड होता. Display मध्ये सुंदर स्टोल, कुर्ती , सलवार सुट लावले होते. हे सर्व निरिक्षण करण्यात माझा वेळ चांगला गेला.
तेवढ्यात boarding सुरू झाले. आम्ही प्लेन कडे जायला निघालो. प्लेन मध्ये बसले विचार केला 1-2 तास आपण बिना मोबाईल बसलो. आपल्याला एकदा पण मोबाईल ची आठवण झाली नाही. उलट आपल्याला आजुबाजूची विविधता पहायला मिळाली.
का आपण ह्या मोबाईल मध्ये सारखे डोके घालून बसतो?
मोबाईल म्हणजे सध्या आपल्या शरीराचाच एक भाग झाला आहे. आज तो तेवढाच गरजेचा पण आहे. कारण प्रत्येक गोष्ट मोबाईल वर अवलंबून आहे. हातात मोबाईल नसेल तर हात मोडल्यासारखा वाटतो.
आजचे धावपळीचे जीवन, अनिश्चित जीवन ( कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही ) मुलांचे भवितव्य हे सर्व मोबाईल वर अवलंबून आहे. त्यामुळे तो तेवढाच आवश्यक आहे.
ट्रिप मध्ये सृष्टी सौंदर्य, पुरातन कालीन मंदिरांचे बांधकाम, तेथील शिल्पकला मी मनसोक्त डोळ्यात साठवून घेतली. (तसे माझे 5-6 फोटो) काढले. पण आपण काय करतो कुठे पण गेलो की स्वत: चे सल्फी, काही खात असू तर त्याचा फोटो लगेच Instagram वर टाक, जे काय पाहू त्याचे आडवेतिडवे फोटो काढ. म्हणजे ही प्रत्येकात सहजता झालीये.
त्यापेक्षा तेथील वातावरण, विविधता, संस्कृती ही पहाणे ती मनात साठवून ठेवणे हे आपण विसरुनच गेलो. मोबाईल चा वापर पाहिजे तेथेच करुया. तो अती नको व्हायला. पण कोण कोणाला सांगणार असे झाले.
तेवढा एक दिवस मी बिना मोबाईल चा काढला. कारण आज मोबाईल पहायचाच नाही हे ठरवले होते. नंतर मी पण बिना मोबाईल ची नाही राहू शकले.
एवढे मात्र खरे अती फोटोच्या नादी नाही लागलो. आल्यावर मुलींनी विचारले ‘काय आई! तुम्ही काहीच फोटो नाही काढले!!
मी तिला म्हटले “मी तुला प्रत्येक जागेचं जसेच्यातसे वर्णन करुन सांगते ना. फोटो काय घेऊन बसलीस”.
एकंदरीत माझ्या हे लक्षात आले मोबाईल शिवाय दिवसातील काही तास राहू शकतो. एकदमच त्याच्या आहारी जायला नको. प्रयत्न तरी करून पाहूया.
श्रध्दा जहागिरदार🙏🏾

Related Articles

2 Comments

  1. खरंय! आठवड्यातून एक दिवस तरी social media पासून दूर रहायला पाहिजे.

  2. छान, मोबाईल एक पूर्ण दिवस बाजूला ठेवायला हवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}