Classifiedदेश विदेश

जुन्नर आणि घाटवाट

जुन्नर आणि घाटवाट

जुन्नर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीतील अशा मोजक्या तालुक्यांपैकी एक आहे की जो जगाशी घाटवाटांनी जोडला गेला आहे. पुर्वेला गुळंचवाडी – आणे घाट, पश्चिमेला माळशेज, नानेघाट, दाऱ्याघाट, दक्षिणेला पेठ अवसरी घाट तर उत्तरेला अकोले व जुन्नर तालुक्याच्या सिमेवरील अनेक घाटांचे दक्षिणोत्तर जाळे. त्याही पुढे जायचं तर चंदनापुरीचा घाट. या घाटांचा, डोंगररांगाचा जुन्नरच्या सर्व क्षेत्रांवर मोठा प्रभाव आहे. इथं स्थानिक मायक्रोक्लायमेट डेव्हलप होण्यापासून अनेक गोष्टी आहेत. विविधता आहे त्याच्या मुळाशी ही सर्व नैसर्गिक यंत्रणा आहे. जुन्नरमधील सर्व किल्ल्यांचे जाळे हे ही घाटवाटांभोवती, त्यांना संरक्षण देण्यासाठी वा त्यांच्या अनुषंगाने सत्ता राखण्यासाठी आहेत. हरिश्चंद्रगड, सिंदोळा, भैरवगड, निमगिरी, हनुमंतगड, हडसर, जिवधन, चावंड, शिवनेरी, नारायणगड, दुर्ग व ढाकोबा हे सर्व या वाटांवर पहारा देते आहेत. त्यांना पाठबळ देते आहेत. आजही जुन्नरच्या जनजीवनात या घाटवाटांचे महत्व अनन्यसाधारण आहे. घाटवाटा समजून घेताना, पर्यटकांना, ट्रेकर्स मंडळींना त्याची अनुभूती देताना हे सर्व संदर्भ आयाम महत्वाचे ठरतात.

घाटांची गावं

एकट्या जुन्नर तालुक्याचा विचार केला तर सह्याद्रीच्या मुख्य गाभ्याला भिडलेली खिरेश्वर, खुबी, तळेरान, निमगिरी, देवळे, अंजनावळे, घाटघर, फागुळ गव्हाण, आंबोली, भिवडे बुद्रुक, हातवीज ही गावं आणि पश्चिम पूर्व रांगांमधील कोल्हेवाडी, सांगनोरे, कोपरे, जांभुळशी, मांडवे, मुथाळणे, चिल्हेवाडी, आंबेगव्हाण, ओतूर, खामुंडी, आणे, नळावणे, गुळंचवाडी, औरंगपूर-निमगाव सावा ही सर्व गावे घाटांची गावे आहेत. आणि त्याही सर्वाधिक घाट गेलेल्या गावांचा विचार केला तर त्यात आंबोली, अंजनावळे, तळेरान आणि खिरेश्वर या चार गावांचा अग्रक्रम लागतो.

जुन्नर तालुक्यातील घाटसमुह

जुन्नर तालुक्यात सुमारे 25 हून अधिक घाटवाटा आहेत. त्यांची वर्गवारी करायची झाल्यास हरिश्चंद्रगड घाटसमुह, नानेघाट घाटसमुह, दाऱ्याघाट घाटसमुह, भिमाशंकर घाटसमुह आणि इतर असा विचार करता येईल. साध्या सोप्या सुखद अनुभूतीपासून जीवघेणा थरार देणाऱ्या सर्व ग्रेडच्या घाटवाटांचा यात समावेश आहे. तुम्ही अजान बालक असा वा एव्हरेस्टवीर प्रत्येकाला जुन्नरच्या घाटवाटा अमर्यात आनंद व अनुभूती देतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या घाटवाटा पर्यटनात नानेघाट आणि माळशेज अग्रस्थानी आहेत, यात नवल नाही. जुन्नरमधील काही घाटवाटांचा अल्पपरिचय पुढीलप्रमाणे…

1) डोणीदार

– त्रिगुण धारा या नावानेही ओळखली जाते.

– दुर्गवाडी व आंबेगावच्या हद्दीवर .

– जुन्नरमधून आंबेगावमध्ये जाणारी घाटवाट

2 ) खुटेदार

– दुर्गवाडी (जुन्नर) ते रामपूर (मुरबाड) वाट

– दुर्ग, ढाकोबा, गडद लेणी यांच्याजवळ

– दुय्यम वाट, मात्र ऐतिहासिक वापराच्या पाऊलखुणा

– उभ्या कातळात ठिकठिकाणी खोदलेल्या खोबण्यांच्या रांगा

– सोप्या श्रेणीचे अनेक कातळारोहण टप्पे, उतराई अवघड, पावसाळ्यात टाळावी.

– रामपूर व दुर्गवाडी दोन्ही ठिकाणी मंदीरात मुक्काम शक्य

– या वाटेला साधारणतः 4 तास लागतात

3) दाऱ्याघाट

– मीना नदीच्या खोऱ्यातून कोकणात डोकावणारी घळ

– आंबोली (जुन्नर) ते धसई (मुरबाड), दुर्ग, ढाकोबाचा शेजार

– नाळेत खोदीव पावठ्या ट्रेकर्सनी नोंदवल्या आहेत.

– घाट उतरायला लागल्यावर माथ्यापाशी झरा – घाटाच्या तळाशी रांजणखळग्यांमध्ये फेब्रुवारीपर्यंत पाणी

– तांत्रिक कातळारोहणाची आवश्यकता भासत नाही.

4) रिठ्याचं दार

5) घोडे पाण्याचं दार

– या दोन्ही वाटा आंबोली जवळ येतात

– दाऱ्या घाटाजवळच आहे. संलग्न वाटा

6) नाणेघाट

7) भोरांडेची नाळ

– नानेघाटाच्या शेजारीच

8) नांगरदरा

– भैरवगड (मोरोशी) ते अंजनावळे

– अतिशय अवघड, फिटनेसचा अंत पाहणारी, पावसाळ्यात न करण्याची

– फेब्रुवारीनंतर गिर्यारोहणातील ज्ञानी व अनुभवी व्यक्तीसोबतच करावी.

9) अस्वलदरा घाटवाट

– नांगरदरा वाटेच्या शेजारी

10) भोजदारा – तळेरान घाटवाट

– शिनलोप डोंगर, वाघ्या डोंगर, भोजदारा डोंगर, दिवाणपाडा माथा, आणि अंजणावळ्याचा व-हाडी डोंगर

– या ठिकाणाहून विविध घाटवाटांनी माळशेज घाटात उतरता येते.

– यापैकी ऐतिहासिक मार्ग म्हणजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खिंडीचा मार्ग.

– यावाटेवर पुरातन कातळकोरीव टाक्या पहावयास मिळतात.

11) जुनी माळशेज घाटवाट

– एमटीडीसी रिसॉर्टच्या बाजूने खाली उतरणारी

– हीच वाट खालच्या दिशेने पुढे काळू धबधब्याकडेही जाते.

12) जुन्नर दरवाजा मार्गे हरीचंद्रगड

– खिरेश्वर ते हरिश्चंद्रगड, अतिशय सुंदर मार्ग

– उजव्या हाताला नेढं, डाकीकडे विस्तिर्ण पठारं

13) टोलार खिंड घाटवाट

– खिरेश्वर – टोलार खिंड – हरिश्चंद्रगड

– जुन्नर व अकोले तालुक्यांना जोडणारी महत्वाची खिंड

14) म्हसवंडी घाट

– पिंपरी पेंढार ते म्हसवंडी

15) वाघाचं द्वार घाटवाट

– आडोशी ते आवळ्याची वाडी

– थोडी नामशेष झाली आहे

16) औरंगपूर – गांजवेवाडी घाटवाट

– भागडोबा डोंगररांग.

– पुर्वी राजरोस वापरातली. आता फक्त गुराख्यांकडून वापर

17) निमगाव सावा/सुलतानपूर – भागडी घाटवाट

– भागडोबा डोंगररांगांच्या माथ्यावरुन जाणारी वाट

– कॅनाल ही पाऊलवाट पासून सुरु होते.

– पुढे डोंगरमाथ्यावर जावून संपूर्ण डोंगररांग ओलांडून भागडोबा जवळ उतरते

18) आणे घाट

– गुळंचवाडी व आणे यांना जोडणारी वाट

– याच वाटेचे रुंदीकरण करुन पक्का रस्ता आणि नंतर महामार्ग

– या वाटेच्या पॅरलल पाण्याच्या प्रवाहालगत पायवाट

– या व्हॅलीत जुन्नरमधील सर्वोत मोठा नैसर्गिक पूल

– अतिशय सुंदर वनसंपदा, पक्षिसंपदा व जैवविविधता

– चांगल्या पावसाचा भाग व दुष्काळी भाग यांच्या सिमेवर

19) वाघोबाचा घाट

– वाघाबोच डोंगर, व्याघ्रशिल्प

– मांदारणे – मुथाळणे – मांडवे

– राजूर, जांभुळशी, कोतुळ, फोफसंडी इ. भागातील वाड्या वस्त्यातुन दररोज सुमारे 50 पिकअपमधून सुमारे 2 ते अडीच हजार लोकं दररोज कामाला येतात.

20) खामुडी – बदगी बेलापूर घाट

– डांबरी रस्ता, मुथाळणे सारखाच मोठा घाट

– लोड च्या गाड्या जात नाहीत, जाग्यावर चढ व टर्न

21) लागाचा घाट

– ओतूर – ब्राम्हणवाडा

– नाशिक हायवेला पॅरलल वापरला जातो.

22) इतर घाटवाटा

– नळावणे घाटवाटा

– दावल मलीक देवस्थाने घाटवाटा

– दुर्गवाडीकडून डिंभेला जाणारी खोदीव पायऱ्यांची ऐतिहासिक घाटवाट

– इत्यादी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}