दुर्गाशक्तीमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सम – विषम  , भाग 3  मकरंद कापरे  ,पुणे ४११०४१

सम – विषम  , भाग 3  मकरंद कापरे  ,पुणे ४११०४१

श्रेयस अर्ध्या तासाने शहा साहेबांबरोबर परत पोटे साहेबांच्या केबिन मध्ये आला. “या, या, बसा…” पोटे साहेबांनी म्हटले. “काय कशी वाटली आमची फॅक्टरी…” पोटे साहेबांनी विचारले. “छान आहे सर, पण माझे काही observations आहेत, तुम्हाला चालणार असेल तर सांगू का?” श्रेयस ने विचारले. “हो, हो, सांगा ना, काहीच हरकत नाही…” मग श्रेयस ने त्याचे काही मुद्दे मांडले. पोटे साहेब, लक्ष देऊन ऐकत होते. “… आणि बरेच ऑटोमेशन पण करावे लागेल सर, क्वालिटी आणि quantity वाढवायची असेल तर” श्रेयस म्हणाला. “शहा ते मागच्या ऑडिट चे रिपोर्ट घ्या”. शहांनी समोरच्या कपाटातला रिपोर्ट काढून टेबलवर ठेवला. “आपण एक ऑडिट केले होते, त्यात पण तुम्ही सांगितलेले मुद्दे आहेत.”
श्रेयस च्या हातात तो रिपोर्ट देत म्हणाले. “पण, तुमचे मुद्दे छान होते, पटले मला, २५० करोड वरून ३०० करोड टर्न ओव्हर करायचा आहे, त्यासाठी हे करावे लागेल…शहा बघा ते क्रेन चे काय झाले…” आणि शहा बाहेर निघून गेले.
“श्रेयस, तुमच्या सारखा हुशार माणूस मला हवा होता, आता तुमच्या काय अपेक्षा आहेत ते पण सांगितले तर पुढे बोलता येईल”
“साहेब, मी काय सांगणार, तुम्हाला जे योग्य असेल ते तुम्हीच ठरवा आणि मला ते मान्य असेल…”
“असे म्हणता, तुमच्या CV मधे, टेनिस बद्दल लिहिले आहे, तुम्ही टेनिस खेळता का?”
“हो सर, मला माझ्या वडीलांनी टेनिस शिकवले, मी १६ वर्षाखालील गटात मी राष्ट्रीय विजेता होतो, 2 वेळा नॅशनल डबल्स चॅम्पियन, सलग 3वर्षे मी महापौर चषक जिंकला आहे, इटली आणि फ्रान्स मध्ये झालेल्या डेव्हिस करंडक मध्ये सुद्धा मी भाग घेतला होता… आणि मी टेनिस कोच म्हणून पण काम करतो आहे सध्या” त्याने अजून त्याचे काही टेनिस मध्ये जिंकलेल्या स्पर्धा सांगितल्या. “खूपच शानदार कामगिरी आहे तुमची खेळातली…” पोटे म्हणाले. “आपण असे करू या श्रेयस, मी तुम्हाला २० लाखाचे पॅकेज देईन, शिवाय कंपनीची गाडी असेल आणि पेट्रोल किंवा डिझेल पण कंपनी देईल, तुम्ही डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून जॉईन होऊ शकता येथे, कधी कामानिमित्त रहावे लागले तर, जवळच आपले गेस्ट हाऊस आहे, तीन मजली आहे, सहा 2 BHK गेस्ट हाऊस आहेत त्यात, त्यातले एक तुमच्यासाठी असेल, जेवण बनवायला कुक असेल… तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा राहू शकता…आणखी काही तुम्हाला हवे असेल तर सांगू शकता…” पोटे साहेबांनी श्रेयस कडे प्रश्नार्थक नजरेने पहात विचारले.
“नाही सर, तुम्ही दिलेले पॅकेज, मला मान्य आहे…” श्रेयस म्हणाला.
“ठीक आहे, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अपॉइंटमेंट लेटर मिळून जाईल तुम्हाला…भेटू या लवकर…गुड लक” पोटे साहेबांनी शेक हॅण्ड साठी हात पुढे करत म्हटले.
श्रेयस त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाला. छान, गार वारे सुटले होते, गाडीच्या काचा खाली करून श्रेयस गार वाऱ्याचा आनंद घेत ड्रायव्हिंग करत होता. कुठेतरी पाऊस पडला होता. संध्याकाळचे रंगी बेरंगी आकाश पहात आणि किशोरदा चे ये शाम मस्तानी हे गाणे ऐकत श्रेयस परत घरी निघाला. त्याने अशोकला फोन केला. ” अशोक, कुठे आहेस” “मी ऑफिस मध्ये आहे, कसा झाला तुझा इंटरव्ह्यू?” अशोक ने विचारले. “छान झाला, दोन दिवसात अपॉईंटमेंट लेटर मिळेल म्हणाले” “अरे वा मस्त, भेटू या मग, किती वेळ लागेल पोचायला?” “साडे सात तरी होतील रे, मी करतो फोन जवळ आलो की” असे म्हणून त्याने फोन ठेवला.
नंतर त्याने रेखाला फोन केला,”रेखा, इंटरव्ह्यू झाला माझा, आता जस्ट निघालो आहे” ” अच्छा, मी क्लिनिक ला जाणार आहे, डॉ. आसावरी यांच्या” रेखा म्हणाली. “अरे, आज अपॉइंटमेंट होती ना…” श्रेयस म्हणाला. “हो, सोनोग्राफी चे रिपोर्ट्स दाखवायचे होते ना…” “ओके मी तिकडेच येतो मग… साडे सात पर्यंत पोहचतो आहे.”
संध्याकाळी साडे सात ला श्रेयस डॉ. आसावरी यांच्या क्लिनिक मध्ये पोचला.
“खूपच चांगला आणि अपेक्षित रिपोर्ट आला आहे सोनोग्राफी चा, आपण जी वर्षभर ट्रीटमेंट देत होतो गर्भधारणा होण्यासाठी ती व्यवस्थित लागू पडली आहे. रेखा तुझ्या शरीराने सुद्धा ट्रीटमेंट ला छान प्रतिसाद दिला” रिपोर्ट पहात डॉक्टर म्हणाल्या. “काळजी मिटली बाई, मला तर खूप बरं वाटले हे ऐकून डॉक्टर” श्रेयस ची आई म्हणाली. “धन्यवाद, आसावरी ताई मला खूप मानसिक आधार दिला तुम्ही…” रेखा म्हणाली “तुझ्या फोनची रिंग वाजते आहे रेखा..” श्रेयस ने सांगितले. “आई चा आहे…” रेखा फोन घेऊन बाहेर गेली. “डॉक्टर, तुम्ही खूप छान हॅण्डल केले रेखाला, दीड वर्षा पूर्वी झालेल्या मिस कॅरेज मुळे ती डिप्रेशन मध्ये गेली होती…” श्रेयस म्हणाला. “हो, तसे होणे साहजिकच आहे, तिने पण प्रतिसाद दिला… आता.. काळजीचे कारण नाही, आपण गर्भधारणा होण्यासाठी जी शरीर शुध्दी करतो त्यात मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजू पहिल्या जातात..म्हणूनच रेखा बरोबरच तुमच्या शरीराच्या शुद्धीसाठी सुद्धा आपण उपचार केले…आता योग्य वेळ आहे गर्भधारणा होण्यासाठी… ” आणि परत एकदा डॉक्टरांचे आभार मानून तिघेही तिथून निघाले.
“कुठे जायचे जेवायला मग” श्रेयस ने पार्किंग मधून गाडी काढताना विचारले. “घरी जायचे जेवायला साहेब, मी स्वयंपाक करून आले आहे…” रेखा गमतीने हात जोडत म्हणाली. “ओके, ओके… I am so happy, आई कसे वाटते आहे मग, खुष ना, आता नातू किंवा नात येईल लवकरच आजीच्या कुशीत” श्रेयस म्हणाला. “काय रे, काहीही… काय” रेखा त्याच्या हातावर चापट मारत म्हणाली. “अरे…काहीही काय.. मी जे डॉक्टर म्हणाले तेच सांगतोय, हो ना आई”
“हो रे बाबा, नात नातू, जे काही असेल लवकर होऊ द्या आता”. “मग कधी प्लॅन करायचे रेखा” श्रेयस म्हणाला. “घरी चल मग सांगते” रेखा त्याच्याकडे रागाने पहात म्हणाली.
–क्रमशः–

सम – विषम  , भाग 3  मकरंद कापरे  ,पुणे ४११०४१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}