मनोरंजन

#गोट्या(भयकथा) 👹👹👹 लेखिका-निशा सोनटक्के ✍️

#गोट्या(भयकथा)

👹👹👹👹👹👹👹👹👹

लेखिका-निशा सोनटक्के ✍️
********

घरात माणूस मृत झाला की त्याच्या सगळ्या वस्तू
Destroy करतात.म्हणजेच गरीबांना दान करतात
फेकून देतात…असे का????
तर आत्मा अमर आहे हो….तो मरत नाही.
आणि
त्या वस्तूत त्याचा जीव अडकला असेल तर तो
परत येतो…..आता शरीर पण नसते…मग हा
मृतात्मा भूत बनून त्रास देतो.कारण शरीर नसल्यामुळे
माया,,प्रेम काहीच ऊरलेले नसते. म्हणूनच मृत व्यक्तींच्या
आठवणी काढून सतत रडायचे नसते…. स्मशानात
भटजींनी त्यांना मंत्र म्हणून तुमचा इथे काही सबंध नाही
असे सांगून पुढील प्रवासासाठी पाठवले जाते.त्यांना
गती मिळते…..मग आपण त्यांच्या वस्तू आठवण म्हणून
ठेवणे ….ऊराशी बाळगणे कीती चूक आहे???
मंडळी
आता तुंम्हाला विषय समजलाच आहे तर कथेला सुरुवात
करूया😂
घाबरू नका …भयानक आहे.👺👽☠️

मुंबईत एका मध्यवस्तीत …एक तीनमजली आलिशान
बिल्डिंग आहे….बरेच फ्लॅट आहेत…तिथे अनेक कुटुंबे
रहात आहेत…सगळ्यात वरच्या मजल्यावर संपूर्ण
फ्लोअरवर मालक रहातात….
या बिल्डिंगच्या बरोबर समोर जो रस्ता जातो तो थेट
स्मशानात… त्यामुळे या बिल्डिंगच्या समोरून सतत
प्रेतयात्रा जात असतात.
पण मुंबई सारख्या मोठ्या शहरात लोक अंधश्रद्धा म्हणून
काही गोष्टी मानत नाहीत….व मुंबईत लोक असे पाणी टाकत
नाहीत.आणी तो रस्ता स्मशानात जाणारा सतत कीती पाणी
टाकणार???
म्हणजे
गावाकडे कसे दारावरून प्रेतयात्रा गेली की लगेचच
पाणी टाकतात…पाणी टाकणे याचा अर्थ त्या मृतात्म्याने
परत येऊ नये…पण शहरात हे मानत नाहीत…
पण स्मशानाकडे जाणारा रस्ता हाच….

रात्री तर जाम भयाण वाटायचा… शुकशुकाट…शांतता
आणी प्रेतयात्रा जातात त्यांचा आवाज…राम जयराम
जयजय श्रीराम…हा ऊलटा जप हो…मधुनच भटकी
कुत्री भेसूर आवाजात रडत असतात.खांबावरचे अधलेमधले
लाईट पण गेलेले….इतके भयाण वाटायचे की
आपलीच सावली आपण बघून भीती वाटायची…..

इथल्या प्रत्येक इमारतीच्या प्रत्येक फ्लॅटमधे रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान गोट्या पडल्याचा आवाज यायचा. आवाज साधारण असा असायचा: ठप्प टप टप टप टप गडगडगड….. एखादी गोटी वरून फरशीवर टाकली की आधी येणारा ठप्प असा आवाज, मग तिचे दोन तीन टप्पे, टक टक टक.. असा मग गडगडत जाऊन थांबणार. सुरवातीला घरटी लोक गोंधळात पडले. मग रात्रीची झोपमोड का करता म्हणून वाद झाले. पण जो तो म्हणायचा की आम्ही नाही वरचे गोट्या खेळतात. बरं इमारतीत वीसेक फ्लॅट असतील तर सगळेच्या सगळे हेच ओरडायचे. मग सगळ्यात वरच्या फ्लॅटमधे रहाणाऱ्यांचे काय? त्यांच्या तर डोक्यावर कुणीच नव्हतं! आणि सगळ्याच्या सगळ्या इमारतीत , त्याच वेळेला, तोच आवाज…..
कधी कुणी नाईट शिफ्ट वरून आले की त्यांना विचित्र
हालचाली जाणवायच्या….गेटपाशी कुणी ऊभे आहे…
तर आतुन कुणीतरी बाहेर येते आणी थेट चालत जाते.
असे भास व्हायचे….या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरुन
तर रात्री अपरात्री कुणीतरी बघते आहे…ऊभे आहे असे
दिसायचे…पण मालकांचा मुलगा अमेरिकेत असतो.
त्याची आईपण तिकडेच आहे….वरती कुणीच नाही
बाहेरून कुलूप आहे.मग आत कोण राहते????
कित्येकदा लोकांनी हे पाहिले आहे….या बिल्डिंगची गच्ची
ऊघडीच असते… बिल्डिंग मधिल तरूण मुले तिथे जातात
गप्पा मारत बसतात… अगदी रात्रीचे वेळी…

एके दिवशी असाच गोट्यांचा आवाज सुरु झाला. त्याच
बिल्डिंग मधील काही मुले अभ्यासाला कंटाळून थोडावेळ
गप्पा मारत बसले असताना च खालून लोक ओरडत होते
“”””अरे कोण आहे???”””
ही मुले बघायला लागली….तर त्यांना हा आवाज मालकांच्या
घरातून आला…खालीसोसायटीच्या सेक्रेटरी कडे किल्ली होतीच ती मुलांनी घेतली फ्लॅट ऊघडला तर तिथे कुणीही
नव्हते पण सगळीकडे काचेच्या गोट्या विखुरलेल्या होत्या.
याचा अर्थ इथे कुणीतरी आले होते….
मग नेमके कोण होते???
मुलांनी सगळ्या घरातून शोध घेतला…एकदोघांना टाॅयलेटच्या पॅसेजमधे कुणीतरी पळताना दिसले….ती काळी आकृती
एका लहान मुलाची असावी…ते धावत तिथे आले पण त्यांना
कुठेही कुणीही दिसले नाही….खालची माणसे वर आली.तर
त्या काचेच्या गोट्या गायब झाल्या होत्या….मुले आश्र्चर्य च
करत होती……
काही दिवसांनी मालकिणबाई…..अमेरिकेतून आल्या…त्यांना
हा प्रकार कानावर घातला…त्यावर त्या बोलल्या…
काही वर्षांपूर्वी माझा मुलगा प्रदिप…तेंव्हा शाळेत होता…
शाळेतून तो काचेच्या गोट्या घेऊन आला होता….त्याच्यापाठी
एक मुलगा भांडत आला…. माझ्या नवऱ्याने विचारले….तर तो मुलगा जीव तोडून सांगत होता….प्रदिपने चिटिंग केलेय…या
गोट्या माझ्या आहेत….पण नवऱ्याने त्याला हाकलून दिले…आणि त्याच रात्री त्या मुलाला त्याच्या घरी विजेचा
शाॅक लागला.आणि तो वारला…त्याची प्रेतयात्रा घरावरुनच
जाताना…मला फार वाईट वाटले…पण..त्यानंतर…घरात
गोट्या खेळल्याचे आवाज सुरु झाले…..तो पॅसेजमधून
पळताना ही भास होतो…..मी हे पाहिले आहे….
सगळे लोक शांतपणे ऐकत होते…
एवढ्यात दुसऱ्या मजल्यावरील आप्पा बोलले…
“राग मानू नका पण रात्री अपरात्री तुमच्या घराच्या खिडकीतून
कुणीतरी पहातेय असा खूप लोकांना भास होतो”.
त्यावर मालकिणबाई बोलल्या…
“ते माझे सासरे आहेत…हे घरातील शिसवीचे फर्निचर आहे नं
त्यांनी खूप मोठ्या कष्टाने जमवले आहे…इतके भारी
चकचकीत फर्निचर टाकुन तरी कसे देणार???”
सगळेच स्तब्ध झाले…
आप्पा बोलले….””””आपली गल्लीच भुताळी आहे….हा रस्ता
थेट स्मशानात जातो….सतत इथे रात्री अपरात्री भास होतात
मला निद्रानाश आहे.मी जागाच असतो..रोज साडेबारा ते
अडीच रात्रीच्या वेळी कसलेकसले आवाज येतात…सगळीकडे
भयाण शांतता असते.काळोख असतो…आणि कितीतरी माणसे सफेद कपडे घालून….खाली मान घालून स्मशानाकडे
चाललेले असतात.त्यांचे चेहरे पण दिसत नाहीत…..ह्या
मृतव्यकतीच असणार याबद्दल मला तिळमात्र शंका नाही…
आपण यांच्या मुक्तीसाठी काय करणार???
एकच वाटते मालकिणबाई…….
त्या मुलाच्या काचेच्या गोट्या तुंम्ही परत करायला हव्या होत्या
त्याचा जीव त्यात अडकलाय…लहान पोर होते हो”””.
सगळेच स्तब्ध झाले…
आणि त्या वेळी गोट्यांचा आवाज झाला…

ठप्प…..टप टप टप टप
टक टक टक
गड गड गड गड
ठक्क……….

👽👽👽👽👽👽👽

समाप्त.

निशा सोनटक्के. ✍️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}