देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सम – विषम   भाग ६  लेखक मकरंद कापरे 

सम – विषम   भाग ६  लेखक मकरंद कापरे

” तू काश्मीर ला कधी गेली होतीस आत्या?” श्रेयस ने हसून विचारले. “मी नव्हते गेले रे…यांचा मित्र गेला होता येताना घेऊन आला…काजू बदाम..तिथले केशर” आत्या म्हणाली. “वा..छान..भारी ना…छान चव असेल” रेखा म्हणाली. “हो, छानच आहे…”
“वहिनी आता बाथरूम मध्ये जाताना काळजी घ्या…बरे झाले थोडक्यात निभावले. “आत्या, आम्ही तर चमत्कार अनुभवला” श्रेयस म्हणाला, आणि हॉस्पिटलमध्ये आलेला अनुभव त्याने सांगितला. “खरेच…स्वामी त्यांच्या भक्तांना मदत करायला नक्की येतात..” समोरच्या स्वामींच्या फोटोला नमस्कार करत आत्या म्हणाली.
रात्री ९ च्या दरम्यान श्रेयस ला एक फोन येतो…”नमस्कार मी, राघव शेठ बोलतोय… नगरसेवक..” “बोला ना, नमस्कार..” “आपल्या भागात जे नवीन गार्डन झाले आहे त्याला…लेफ्टनंट कर्नल कुलदीप भारद्वाज यांचे नाव द्यायचा ठराव..मागच्या आठवड्यात मंजूर झाला आहे.. तेव्हा येत्या तेरा तारखेला म्हणजे..पुढच्या मंगळवारी.. तुमच्या आईसहेबांचा हस्ते, त्याचे अनावरण करायचे आहे… तेव्हढे कृपया आईंना सांगा, मी स्वतः येतो घरी त्यांना सांगायला…” राघव शेठ म्हणाले. “बरं.. बरं..मी सांगतो आईला”
“काय रे, कोण होते” आईने विचारले. “राघव शेठ होते, नगरसेवक.. नवीन गार्डन झाले आहे ना..पेट्रोल पंपाच्या मागे, त्याला बाबांचे नाव द्यायचे आहे.. तर तुझ्या हस्ते करायचे आहे बोर्ड अनावरण..पुढच्या मंगळवारी..”
“माझ्या हस्ते…कशाला.. त्यांनाच करू दे ना, तुम्हीच करा म्हणावं..” आई म्हणाल्या. “वहिनी, काय हरकत आहे.. तुमच्या हस्ते करायचे असेल तर..करा ना…एक वीरपत्नी म्हणून तुम्हाला तो सन्मान द्यायचा आहे त्यांना..असू द्या..” सीमा म्हणाली.
“हो आई, होऊ द्या तुमच्या हस्ते अनावरण…” रेखा म्हणाली.
मंगळवारी सकाळी ११ वाजता लेफ्टनंट कर्नल कुलदीप भारद्वाज यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या नावाने बागेचे उद्धाटन झाले. “दीपिका ताई आपण पण दोन शब्द बोलावेत” रघावशेठ यांनी विनिंती केली. “नमस्कार, खूपच हृद्य क्षण आहे हा आम्हा सर्वांना…लेफ्टनंट कर्नल कुलदीप भारद्वाज यांची पत्नी म्हणून जसे बाकी सैनिकांना आणि ऑफिसर्स ना..बरेचदा या घटनेला सामोरे जावे लागते.. घर की कर्तव्य… आणि अर्थात देश प्रथम..असतो जेव्हा तुम्ही ती खाकी वर्दी परिधान करता…त्याच्यापुढे …त्या तिरांग्या पुढे ..सर्व नाती…सर्व वयक्तीक गोष्टी दुय्यम होतात…त्यांनी अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या..लष्कराचे अनेक सन्मान त्यांना मिळाले… मरणोत्तर परमवीर चक्राने त्यांचा सरकारने गौरव केला. अनेक अतिरेकी मारले…आणि मग भारत पाकिस्तान सीमेवर त्यांची इच्छा होती काम करायची, ती त्यांना मिळाली…पाकिस्तान सीमेत ३० किलोमीटर आत जाऊन कारवाई केली.. स्वतः ८ अतिरेकी मारले.. युनिट चा सैनिक मागे राहिला म्हणून परत त्याला आणायला आत गेले आणि घात झाला… दोघेही शहीद झाले..पाकिस्तान ने मृतदेह द्यायला मुद्दाम वेळ लावला… पंधरा दिवसानंतर त्यांचे शव मिळाले..त्या सर्व मातांना मी प्रणाम करते ज्यांनी असे बहादुर, निडर आणि निधड्या छातीचे वीर जन्माला घातले…जय हिंद” त्यांच्या भाषणा नंतर तेथील जमलेल्या लोकांनी “लेफ्टनंट कर्नल कुलदीप भारद्वाज अमर रहे च्या घोषणा दिल्या. रेखाची मैत्रिणी आणि श्रेयस चे शाळेतील मित्र अशोक, दिनेश आणि बाकी काही शेजारी अनावरण कार्यक्रमाला उपस्थित होते.
रात्री जेवणांतर, छान गप्पा जमल्या होत्या, “आत्या, छान झाला होता बदामाचा शिरा…तुम्ही दिलेल्या टिप्स मी लक्षात ठेवीन..म्हणजे कोरडा होणार नाही शिरा..” रेखा त्यांना बडीशेप हातावर देत म्हणाली. “परवा, तुझ्या चित्रांचे प्रदर्शन आहे ना..मी येईन मदत करायला..” सीमा म्हणाली.
अशोक ने त्याची गाडी आणली होती पेंटिंग्ज घेऊन जायला. इतक्यात पोस्टमन आला, त्याने त्याच्या हातातले पाकीट बंगल्याच्या गेट वर लावलेल्या पेटीत न टाकता, श्रेयस च्या हातात दिले आणि निघून गेला. श्रेयस ने ते उघडले “काय आहे रे…” रेखाने विचारले. “इंटरव्ह्यू कॉल लेटर आहे.. जेमिनी स्टील चे..चला हॉल वर पोहोचू या नंतर वाचू…अशोक हो पुढे तू आम्ही आहोत मागेच”
प्रदर्शनाला छान प्रतिसाद मिळत होता. बरेच लोक येत होते. रेखाचे ३५ पेंटिंग्ज लावले होते, सर्व जण येऊन तिला अभिप्राय देऊन कौतुक करत होते. “छान प्रतिसाद आहे, रेखा..तुझी पेंटिंग्ज नक्कीच विकली जातील..” ईशा म्हणाली. “हो वहिनी..छान प्रतिसाद आहे…काकू आणि आत्या येणार आहेत ना..श्रेयस” अशोक ने विचारले. “हो, चार वाजता येते म्हणाली…आत्या आईला घेउन..” श्रेयस म्हणाला.
“हॅलो, छान पेंटिंग्ज आहेत तुमची..मी दयानंद चौगुले..आमच्या हॉटेल मध्ये काही पेंटिंग्ज ची आवश्यकता आहे..आणि काही भिंतींवर वारली पेंटिंग्ज पण करून हवी आहेत…”
“ओके, आम्ही देऊ ना करून तुम्हाला हवी तशी…हो ना रेखा…” ईशा म्हणाली. “हो..हो..किती एरिया आहे आणि पेंटिंग्ज कुठे लावायची आहेत…ते समजले तर बरे होईल…” रेखा म्हणाली.
“तुमचे प्रदर्शन झाले की या तुम्ही..मी आमच्या मालकांची गाठ घालून देतो..त्यांना घेऊन येतो उद्या..म्हणजे त्यांनाही पहायला मिळतील पेंटिंग्ज” दयानंद म्हणाले. त्यांनी त्यांचे कार्ड दिले आणि ते निघून गेले. संध्याकाळी आई आणि सीमा आत्या पण आल्या, “छान… ग रेखा..मी काही पेंटिंग्ज तुझी पाहिली होती आधी…पण प्रदर्शनात खूपच उठून दिसतात पेंटिंग्ज” सीमा म्हणाली. “हो …आत्या..आज तीन पेंटिंग्ज विकली गेली पण..पंधरा हजार मिळाले…” रेखा म्हणाली.
“वा, छान खूपच मस्त सुरवात झाली तर…” श्रेयस ची आई म्हणाली. “आज श्रेयसला अजून एका इंटरव्ह्यू चा कॉल आला आहे ..” रेखा म्हणाली. “हो का रे श्रेयस..कुठे आहे ती कंपनी” आई ने विचारले. “पुढच्या आठवड्यात आहे सोमवारी… बाणेर ला ऑफिस आहे..” श्रेयस म्हणाला.
प्रदर्शनात ६०,००० रुपयांची विक्री झाली होती आणि काही नवीन ऑर्डर्स पण मिळाल्या होत्या. त्यामुळे सर्वच जण खुशीत होते. आज रेखाला हॉटेल ओपल मध्ये जायचे होते भेटायला.. तिने आग्रह केला म्हणून श्रेयस आणि अशोक पण बरोबर आले होते. “मिस रेखा, तुम्हाला बोलावले आहे आत..” रिसेप्शन वर असलेल्या मॅडम ने समोरच्या दिशेने हात करत म्हटले “या माझ्या बरोबर.. तिच्या बरोबर ईशा, अशोक आणि श्रेयस पण गेले.
“सर या रेखा मॅडम…” त्यांची ओळख करून देत म्हणाल्या. “रेखाची नमस्कार…मी रत्नाकर बागाईतकर… बसा ना…” समोरच्या सोफ्याकडे हात करत रत्नाकर म्हणाले. “नमस्कार सर, हे माझे मिस्टर श्रेयस, हे अशोक भावजी श्रेयस चे मित्र, आणि ही ईशा..” रेखाने सर्वांची ओळख करून देत म्हटले.
“दयानंद, काय कौतुक करत होता तुमचे…सॉरी मी येवू नाही शकलो…” रत्नाकर बागाईतकर म्हणाले.
“धन्यवाद सर, काय आहे कामाचे स्वरूप…” रेखाने विचारले. “काय घेणार तुम्ही…चहा, कॉफी की बियर…आता संध्याकाळ झाली म्हणून विचारतो आहे ह…संकोच नको..हॉटेल आपलेच समजा…” रत्नाकर म्हणाले. “आम्ही कॉफी घेऊ सर…” रेखा म्हणाली. “ओके…As you wish… अंकिता..सर्वांसाठी कॉफी…आणि स्नॅक्स…”
“मी नावाने बागाईतकर असलो तरी माझी शेती नाही कुठे…मी वीस वर्षापासून या हॉटेल इंडस्ट्री मध्ये आहे…हे नवीनच हॉटेल आहे आपले..गृप चे.आणि अजून तीन हॉटेल आहेत…ओपल च्या प्रत्येक मजल्यावर ५ रूम आहेत, काही ठिकाणी वारली पेंटिंग्ज करायचे आहेत…आणि रूम मध्ये वेगवेगळ्या साइज चे पेंटिंग्ज आहेत…६००० स्क्वेअर फूट टोटल वारली पेंटिंग्ज चा एरिया आहे…आणि साठ रूम आहेत… तीन कॉन्फरन्स हॉल आहेत… तीन पब्लिक समारंभा साठीचे हॉल आहेत.. काही ठिकाणी काचेवर पण पेंटिंग्ज आहेत. ओके…कॉफी आली, मिस्टर श्रेयस…तुम्ही काय करता…”
क्रमशः

सम – विषम   भाग ६  लेखक मकरंद कापरे

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}