दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सम – विषम  भाग ७  लेखक मकरंद कापरे

सम – विषम  भाग ७  लेखक मकरंद कापरे

“मी, टेनिस कोचिंग करतो सर…आधी आम्ही वलसाड ला होतो..सहा महिने झाले…पुण्यात आलो” श्रेयस म्हणाला. “ओके, ग्रेट..आणि तुमचे काय नाव..” अशोक कडे पहात रत्नाकर म्हणाले. “मी अशोक माझे पण हॉटेल आहे…शंभर लोक बसू शकतील इतके टेबल आहेत..ब्रेकफास्ट, लंच… डिनर ” अशोकने सांगितले. “अरे वा..छानच आपण एकच व्यवसायात आहोत..चला..मी दाखवतो ..काय काम आहे ते…” आणि रत्नाकर ने त्यांना सगळे काम दाखवून दिले.
“सर…आम्ही नक्कीच हे काम करू शकतो…दोन तीन दिवस द्याल का… वर्क आऊट करून कोटेशन देतो..” रेखा म्हणाली. “हो, हो..चालेल…” रत्नाकर म्हणाले.
गाडीत बसल्यावर ईशा म्हणाली,”रेखा पन्नास पेंटिंग्ज आणि अडीचशे स्क्वेअर फूट ग्लास वर्क…सातशे स्क्वेअर फूट वारली आर्ट… माय गॉड…दहा लाखाचे तरी काम आहे…”
“हो, ना…त्यांना आपल्या कामाचे फोटोज् पसंत आलेत..बघू या उद्यापर्यंत फायनल करून.. कोटेशन देऊ या…उद्या नऊ ला ये घरी ईशा” रेखा म्हणाली. “रेखा वहिनी…हे काम कराच तुम्ही..या कामाच्या अनुभवावर पुढचे पण मिळेल.” श्रेयस म्हणाला. “कामाच्या मुदतीचे पण पहा…तीन महिन्यात पूर्ण करायचे आहे…त्याप्रमाणे प्लॅन करावे लागेल..” श्रेयस म्हणाला.
रस्त्यात ईशाला तिच्या घरी ड्रॉप करून श्रेयस आणि रेखा अशोकला घेऊन घरी आले. “अशोक भाऊजी, जेवण करून जा..” रेखा म्हणाली. “नाही वहिनी, बायकोचा मेसेज आहे घरी कधी येतो म्हणून…जेवायला वाट पहात आहे..” आणि त्याची बाईक चालू करत तो म्हणाला,”आता तुम्हीच या..रविवारी माझ्या वाढदिवसाला…मस्त पार्टी चा प्लॅन आहे…” अशोक म्हणाला. “हो रे…नक्की येऊ आम्ही…” श्रेयस म्हणाला आणि त्याला निरोप देऊन दोघे घरात आले.
रेखा आणि श्रेयस फ्रेश होऊन दिवाणखान्यात येवून बसले, आई पण संध्याकाळची आरती आणि पोथी वाचून येवून बसल्या. “काय म्हणाले ते हॉटेल वाले” आईने विचारले. “अग आई..छान काम मिळणार आहे रेखाला..मोठी ऑर्डर आहे..” श्रेयस म्हणाला. “अरे वा, छानच..काय आहे काम रेखा” आई ने विचारले. “आई…बरीच पेंटिंग्ज लागणार आहेत त्यांना..वारली आर्ट चे काम पण आहे…श्रेयस म्हणाला तसे मोठे काम आहे…मिळायला पाहिजे पण…”
“मिळेल गं, तुझी मेहनत करायची तयारी आहे ना..मग नक्कीच होईल.. तुझा नवीन इंटरव्ह्यू कधी आहे रे श्रेयस…आणि आधीच्या कंपनीचे पण अपॉइंटमेंट लेटर नाही मिळाले ना अजून..”
“हो ना आई..अशोक ला सांगतो माहिती काढायला…आणि नवीन कंपनीचा इंटरव्ह्यू परवा आहे सकाळी…” श्रेयस म्हणाला.
दुसऱ्या दिवशी ईशा आली, रेखा आणि ईशा ने संध्याकाळ पर्यंत सगळे अनुमान लावून कोटेशन तयार केले. दुसऱ्या दिवशी परत हॉटेल ला जाऊन परत काही मोजमाप करून, कोटेशन मधे बदल करून त्याला अंतिम रूप दिले.
“श्रेयस, हे बघ ना आम्ही तयार केले कोटेशन…तुला पण काही सुचवायचे असेल तर सांग, रेखा टीपॉयवर चहाचे कप ठेवत म्हणाली. “अकरा लाख तेरा हजार… तुमचे पेंटिंग्ज चे मटेरियल होल सेल मध्ये मिळत असेल..तिथून आणू या आपण…उद्या तू आणि ईशा कोटेशन देऊन या..मी पण इंटरव्ह्यू देऊन येतो कोथरूडलाच ऑफिस आहे…लवकर झाला तर मी जॉईन करेन येताना तुम्हाला…” श्रेयस म्हणाला.
“हो, चालेल…अकरा वाजता या म्हणाले रत्नाकर जी..आणि तुझा इंटरव्ह्यू पण अकरा वाजताच आहे..आमचे झाले की तुला फोन करते…मग भेटू या कुठेतरी..”
“ओके ग्रेट…” श्रेयस म्हणाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता श्रेयस जेमिनी स्टील च्या ऑफिस मध्ये पोचला. ते भव्य ऑफिस पाहून श्रेयस ला छान वाटले. निळ्या रंगाचा प्लेन शर्ट आणि ग्रे कलर ची पँट आणि त्यावर बारीक चेक्स चा टाय त्याच्या व्यक्तिमत्त्व उठून दिसत होते.
सव्वा अकरा ला रिसेप्शन वरून एक मॅडम आल्या. “हॅलो सर..या..तुमचा इंटरव्ह्यू आमचे डायरेक्टर विवेक पोतनीस घेतील…या मी तुम्हाला केबिन दाखवते. आणि मॅडम ने केबिन च्या दरवाज्यावर हळूच टक टक करून दरवाजा उघडला. “येस.. कम् इन..” आतून पोतनीस साहेबांचा भारदस्त आवाज आला.
“सर..हे श्रेयस भारद्वाज..” मॅडम ने ओळख करून दिली. “सुप्रभात सर..” श्रेयस शेक हॅण्ड साठी हात पुढे करत म्हणाला. “सुप्रभात..यंग मॅन… हाऊ आर यू..” मिस्टर पोतनीस शेक हॅण्ड करत म्हणाले. “सुप्रभात सर, मी मजेत सर, thanks…” श्रेयस म्हणाला. “बसा…” तोपर्यंत एच आर डिपार्टमेंट मधून मिस. निशा पण आली. “सर..cv आहे मिस्टर श्रेयस यांचा…” निशा प्रिंट केलेले कागद पोतनीस सरांच्या हातात देत म्हणाली. “ओके…बैस तू पण निशा. “सोफिया…माझ्यासाठी ब्लॅक टी…आणि श्रेयस व्हॉट यू वूड लाईक टू हॅव…” पोतनीस म्हणाले. “मला दुधाचा चहा चालेल…” आणि सोफिया मॅडम बाहेर निघून गेल्या.
” ओके..मिस्टर श्रेयस भारद्वाज… टेल अस अबाऊट युवरसेल्फ.” पोतनीस म्हणाले. “येस सर शुअर…” आणि श्रेयस ने थोडक्यात त्याच्या बद्दल सांगितले. “दॅट्स ग्रेट…मी तुम्हाला थोडे कंपनिबद्दल सांगतो…आपले हे कॉर्पोरेट ऑफिस आहे… दिल्ली आणि कोलकाता ला..ब्रांच ऑफिसेस आहेत…आपले मन्यूफॅक्चरींग युनिट्स भुवनेश्वर, टाटानगर, झांसी ला आहेत…आणि टांझानिया मधे पण ७५० टन पर मंथ चे युनिट आहे, सध्या ते बंद आहे.. इट्स ए जॉइंट वेंचर…तिथे स्टेनलेस स्टील आणि पोलाद दोन्ही तयार करतो आपण…आणि भारतातल्या तीन युनिट मध्ये फक्त स्टेनलेस स्टील बनवतो आपण…” आणि इतर बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली.
“तुमची काय अपेक्षा आहे…अबाऊट remuneration package…” पोतनीस म्हणाले.
“सर..तुम्ही ठरवा सर…माझ्या अनुभानुसार आणि तुमच्या कंपनीच्या पॉलीसी प्रमाणे..माझी काही हरकत नाही.” श्रेयस म्हणाला. “ओके..मी निशा बरोबर बोलतो…ती तुम्हाला सांगेल..” पोतनीस म्हणाले. “ओके सर, थॅन्कस फॉर युवर टाईम…” आणि श्रेयस बाहेर येवून लाँज मध्ये सोफ्यावर बसला.
“मला आवडला…confident आणि हुशार आहे..” पोतनीस निशाला म्हणाले. “सर… रीपोर्टिंग साने सरांना असेल ना…”
“नो..माझ्याकडे डायरेक्ट रीपोर्टिंग असेल…पोस्ट डी जी एम…देऊ या..सॅलरी वर्क आऊट केली का..”
“सर सेम qualification आणि अनुभव असलेले आपण जनरल मॅनेजर ची पोस्ट दिली आहे..” निशा म्हणाली. “इट्स ओके…पॅकेज काय…” निशा ने तिचे वर्किंग दाखवले. “मेक इट एक्झॅक्टली 24,00,000 PA” पोतनीस तिने दिलेल्या कागदावर करेक्शन करत तो कागद तिच्या हातात दिला. “ओके सर…मी अपॉइंटमेंट लेटर बनवते…” आणि निशा केबिन च्या बाहेर आली. “मिस्टर श्रेयस..आम्ही कळवू तुम्हाला…” निशा
क्रमशः

सम – विषम  भाग ७  लेखक मकरंद कापरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}