दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सम – विषम  भाग ८  लेखक मकरंद कापरे  

सम – विषम  भाग ८  लेखक मकरंद कापरे

श्रेयस इंटरव्ह्यू देऊन निघाला, त्याने रेखाला फोन केला. “रेखा, दिले का कोटेशन..” “हो, दिले त्यांनी होकार दिला आहे…उद्यापासून काम सुरू करा म्हणाले” रेखा म्हणाली. “अरे वा..मस्तच अभिनंदन तुमच्या दोघींचे..” “इकडे ईशाच्या घरी ये ना..इथूनच जाऊ बरोबर आपण..” रेखा म्हणाली.
श्रेयस ईशाच्या घरी पोचला. “हाय…ईशा अभिनंदन तुमच्या दोघींचे…” दार उघडल्यावर ईशाला समोर पाहून श्रेयस म्हणाला.
“धन्यवाद, तुझा इंटरव्ह्यू कसा झाला…” ईशा ने विचारले. “छानच..लवकरच अपॉइंटमेंट लेटर मिळेल” श्रेयस म्हणाला. “दॅट्स ग्रेट… आता दोघेही जेवण करूनच जा..” ईशा श्रेयस च्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली. “तुम्हाला ऑर्डर द्यायचे कसे ठरवले रत्नाकर सरांनी..काय म्हटले ते नक्की…” श्रेयस ने विचारले.
“ते म्हणाले..तुमचे काम मला आवडले…तुम्ही नक्कीच हे करू शकाल…उद्या पासून तुम्ही काम सुरू करायला हरकत नाही…” रेखा म्हणाली. “छान, आता मटेरियल कुठून आणायचे..बाकी प्लॅन कसे करणार आहेस..” श्रेयस म्हणाला. “मी पेंटिंग्ज चे सांभाळेल…ईशा ग्लास वर्क चे बघेल…आणि काही ईशा च्या ओळखीचे सप्लायर्स आहेत ..त्यांना आज संध्याकाळी भेटणार आहोत..” रेखा म्हणाली. “साऊंड्स ग्रेट” श्रेयस म्हणाला. इतक्यात आई चा फोन आला. “हा..आई मी आणि रेखा ईशा च्या घरी आहोत…हो इंटरव्ह्यू छान झाला..आणि रेखाला पण ती हॉटेल च्या कामाची ऑर्डर मिळाली आहे..” श्रेयस म्हणाला. “हो..सांगितले तिने..” आई म्हणाली. चार पर्यंत घरी येऊ असे सांगून श्रेयस ने फोन ठेवला.
“अरे हो..रत्नाकर सरांना विचारले का… ॲडवान्स काही देणार आहेत का..” श्रेयस म्हणाला. “हो..हो..दीड लाख देतो म्हणाले…पाच वाजेपर्यंत ट्रान्स्फर करतो म्हणाले…रेखा च्या अकाऊंट ला…आणि जसे काम होईल तसे पैसे देईन म्हणाले…”
“वा खरेच..खूपच को ऑपरेटिव्ह आहेत रत्नाकर सर…” श्रेयस म्हणाला.
संध्याकाळी चार वाजता रेखाच्या अकाऊंट ला दीड लाख ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज आला. एकेक गोष्टीची जमवाजमव होत गेली आणि ऑर्डर चे ठरल्याप्रमाणे काम सुरू झाले. ईशा आणि रेखा मन लावून सर्व गोष्टी निवडत होत्या आणि हॉटेल च्या एकेका भागाचे काम पूर्ण करत होत्या. एक आठवडा होऊन गेला कामाला योग्य वेग आला होता.
रेखा आरशा समोर उभी राहून स्वतः ला न्याहाळत होती. पाठीमागून येवून श्रेयस ने तिला अलगद मिठीत घेतले. “वा अती सुंदर.. मेक अप शिवाय सुधा किती सुंदर दिसतेस तू..” श्रेयस तिला जवळ ओढत म्हणाला. “हो ना..मग काय इरादा आहे..” रेखा त्याची दाढी ओढत म्हणाली. “इरादा ..आहे ना..” “अशोक च्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे आहे ना…आवर लवकर” रेखा त्याला हळूच ढकलत म्हणाली. “हो..का..ठीक आहे ना..आल्यावर सांगतो माझा इरादा. ” श्रेयस तिला चिडवत म्हणाला.
संध्याकाळी अशोकच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याचे काही खास मित्र आणि नातेवाईक जमले होते. ” सुनिता वहिनी आणि अशोक भाऊजी..हे छोटे गिफ्ट आमच्याकडून…” रेखा अशोकच्या हातात पॅक केलेले गिफ्ट ठेवत म्हणाली. “काय आहे रे श्रेयस माझा पहिला वाढदिवस आहे का…” अशोक श्रेयस कडे पहात म्हणाला. “पहिला नाही ना…तीसावा नक्की आहे..हो ना सुनिता वहिनी…आणि भेट तर जवळच्या लोकांनाच देतात…” श्रेयस म्हणाला. “बर बाबा…काय आहे याच्यात…” अशोक ने विचारले. ” बघ उघडून… आणि अशोक ने ते उघडून पाहिले त्यात त्याचे आणि त्याच्या बायकोचे रेखाने काढलेले ऑईल पेंटिंग होते. “अय्या…काय सुरेख काढले आहे रेखा वहिनी…खूपच छान” सुनिता पेंटिंग पहात म्हणाली. जेवणाचा आनंद घेत छान गप्पा जमल्या होत्या. “रेखा वहिनी, तुमच्या लग्नाचा किस्सा सांगा ना..कुठे भेटले तुम्हाला श्रेयस भाऊजी..” सुनिता ने विचारले.
” दहावी पर्यंत आम्ही बरोबरच होतो एकाच शाळेत नंतर माझ्या वडिलांची नाशिक ला बदली झाली…मी आर्ट्स ला प्रवेश घेतला… कमर्शियल आर्ट्स केले नंतर पुण्यात आलो…मग परत एका लग्नात भेट झाली आमची…मग भेटी चालू झाल्या..”
“मग…प्रपोज कसे केले श्रेयस ने…” सुनिता ने विचारले. “तो घाबरत होता प्रपोज करायला…त्याने त्याची आणि माझी कॉमन मैत्रीण आहे तिला विचारायला सांगितले…मला खूप राग आला त्याचा…मी नकार दिला आणि तिला म्हटले परत हा विषय माझ्याकडे काढायचा नाही..तिलाही मला श्रेयस आवडतो हे मी सांगितले नाही…म्हटले पाहू या हा स्वतः विचारतो का..”
मग सगळे हसायला लागले. “काय रे..श्रेयस इतका भित्रा असशील असे वाटले नव्हते..” अशोक म्हणाला. “मी काय केले नंतर विचार ना रेखाला…” श्रेयस म्हणाला. “मी मैत्रिणीकडून नकार दिल्यावर…पंधरा दिवस मला टाळत होता श्रेयस…मग अचानक घरी आला…मी घरी नव्हते…आई बाबा होते…मग स्वतः ची ओळख करून दिली…आणि गप्पा मारत बसला..मी आल्यावर थक्क झाले याला घरी पाहून..मी बोललेच नाही..मग बाबाच म्हणाले…रेखा आपले घर दाखव याला…मग आम्ही बोलत बसलो गच्चीवर तेव्हा याने मला विचारले…माझ्याशी लग्न करशील का म्हणून…मी म्हटले बाबांना विचारावे लागेल ..तर म्हणाला ठीक आहे आताच विचारतो…मग त्याची समजूत घालून पाठवले…नंतर परत प्रपोज केले दुसऱ्या दिवशी..अगदी गुढग्यावर बसून..”
“अरे वा…भारीच की…मग होकार दिला का…” सुनिता ने विचारले. “मग बाबांना सांगितले…मग बाबा श्रेयस च्या आई बाबांना भेटले आणि झाले लग्न” रेखा म्हणाली. तो किस्सा ऐकून मनमुराद करमणूक झाली सर्वांची. रात्री उशीराच दोघे परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेयस ग्राउंड वरून परतला आणि परत ईशा आणि रेखाच्या मदतीला लागला. काही पेंटिंग्ज गाडीतून घेऊन जायचे होते, येताना काही सामान घेऊन यायचे होते. मोबाईल वर मेसेज आला, चेक केल्यावर समजले की जेमिनी स्टील चे अपॉइंटमेंट लेटर आले होते मेल वर.
“रेखा चांगली बातमी आहे, जेमिनी स्टील चे अपॉइंटमेंट लेटर आले आहे. ” श्रेयस ने सांगितले. “वा…ग्रेट…अभिनंदन..” रेखा म्हणाली. त्याने आत जाऊन आईला सांगितले, “आई…मागच्या आठवड्यात इंटरव्ह्यू दिला होता ना…त्यांचे अपॉइंटमेंट लेटर आले आहे…” श्रेयस ने आईला सांगितले. “वा…स्वामी समर्थ…छान झाले..कधी सांगितले आहे जॉईन व्हायला..” आई ने विचारले. ” एक महिन्याची वेळ दिली आहे, पण मी पुढच्या आठवड्यात करेन जॉईन..एक तारखेपासून…आई मी आणि रेखा जाऊन येतो..हॉटेल चे सामान देऊन. ” श्रेयस. “हो, हो…जाऊन या.
रेखा आणि श्रेयस दुपारी एक च्या सुमारास परत आले. पत्र पेटीत काहीतरी दिसत होते. श्रेयस ने उघडून पाहिले तर वेरॉन स्टील चे अपॉइंटमेंट लेटर होते. “रेखा, वेरॉन स्टील चे पण अपॉइंटमेंट लेटर आले आहे…” श्रेयस म्हणाला. “वॉव…ग्रेट आजचा दिवस भारी आहे..” रेखा म्हणाली.
“आपल्या गुरुजींनी सांगितलेले खरे झाले” आई म्हणाल्या. “हो..ना आता कोणती कंपनी जॉईन करायची..वेरॉन की जेमिनी..तू काय ठरवले आहेस श्रेयस…” रेखाने विचारले. “जिथे पगार जास्त असेल तिथे…वेरॉन ने ऑफर केले आहे 2117133 आणि जेमिनी ने 2400000 मी जेमिनी जॉईन करेन ऑफिस पण जवळ आहे…थोडे टुरिंग असेल पण चालू शकेल, हो ना आई..”
“माझी काही हरकत नाही बाबा…दोघांनी ठरवा आणि सुखी रहा..” आई श्रेयस च्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
एक तारखेला श्रेयस जेमिनी स्टील ला जॉईन झाला.
“हे मिस्टर श्रेयस भारद्वाज, आपल्या टीम ला आजपासून जॉईन होत आहेत” निशा मॅडम ने इतर जॉईन झालेल्या लोकांबरोबर श्रेयस ची बाकी स्टाफ बरोबर ओळख करून दिली. सर्वांच्या ओळखी झाल्यानंतर श्रेयस ला निशा त्याच्या केबिन कडे घेऊन गेली. “ही तुमची केबिन…हॅव ए सीट ..तुमच्या खुर्चीत बसा..” निशा म्हणाली. “आता तुम्हाला रिपोर्ट करणारा जो स्टाफ आहे त्यांची ओळख करून देते..” निशा म्हणाली. श्रेयस त्याच्या खुर्चीत बसला.
क्रमशः

सम – विषम  भाग ८  लेखक मकरंद कापरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}