देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख

श्री गणेशाय नमः

भारत हा मंदिरांचा देश आहे इथे प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात एक ना एक अनोखे मंदिर नक्कीच दिसते या दहा दिवसात आपण फक्त गजानन आमच्या मंदिरांची माहिती घेत असलो तरी त्याखेरीजही हजारो लाखो मंदिरे आजही भारतात अस्तित्वात आहेत आणि त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा मंदिराची जे भारतातील ज्ञात असलेले सर्वात प्राचीन गणेश मंदिर आहे. पुरातत्व विभागाच्या अभ्यासानुसार या मंदिराची निर्मिती सातव्या शतकाच्या सुरुवातीस किंवा त्याच्याही आधी झाली आहे.
तमिळनाडूमधील त्रिची इथल्या रॉक फोर्ट च्या शिखरावर हे मंदिर आहे.. 400 ते 450 दगडी पायऱ्या चढून या मंदिरात पोहोचता येते.
मंदिराविषयीची कथा ही थोडीफार गणपती आणि रावण यांच्या गोकर्ण येथील शिव मंदिराच्या कथेशी साधर्म्य असलेली आहे.
मान्यतेनुसार रामायणातील राम रावण युद्ध संपल्यानंतर रामाच्या राज्याभिषेकासाठी विभीषण आयोध्येत आले होते तेथून परत जाताना श्रीरामांनी त्यांना अनेक भेट वस्तूंसह एक श्री विष्णूची प्रतिमा भेट म्हणून दिली. हिची स्थापना लंके मध्ये मोठ्या मंदिरात करण्याचा मानस विभिषणाने बोलून दाखवला. विभीषणाने जरी रामांना या युद्धात सहाय्य केले असले तरीही शेवटी तो असुर कुळातील असल्याने त्यांच्या राज्यामध्ये विष्णूंची स्थापना व्हावी हे देवांना मान्य नव्हते त्यांनी विघ्नहर्ता गणेशाला साकडे घातले.
परतीच्या मार्गावर त्रिची जवळ कावेरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी बिभीषण थांबले असता तेथे एका गुराख्याच्या स्वरूपातील श्री गणेश प्रकट झाले व त्यांनी विभीषणाच्या हातातील मूर्ती स्वतःकडे घेऊन बिबीशन नदीत उतरताच ती तेथील वाळवंटामध्ये रोवून टाकली. हे पाहून संतप्त विभीषण या गुराख्याच्या पोराला शिक्षा करण्यासाठी त्याच्या मागे धावले त्यांच्यापासून दूर पळत हा मुलगा त्रिचीच्या किल्ल्यावरील सर्वोच्च शिखरावर पोहोचला त्याच्या मागोमाग विभीषणही तिथे पोहोचले व त्यांनी हातातील दंडाने त्याच्या डोक्यावर वार केला. आजही या मूर्तीच्या कपाळावरती खोक किंवा एक छोटासा खड्डा पडल्याचे चिन्ह आहे. हा दंड मारल्यानंतर गणपतीने त्यांना आपल्या मूळ स्वरूपात दर्शन दिले आणि बिभीषणाने त्यांना लोटांगण घालून क्षमा मागितली. गणेशांनी त्याला अभय देऊन अनेक उत्तम आशीर्वाद ही दिले आणि समजावून सांगितले की श्रीरंग स्वामी अर्थात विष्णू यांचे स्थान इथेच आहे आणि त्यांची इथे असण्याची नियती आहे म्हणूनच हे सर्व घडले आहे. विभीषणाने त्याच ठिकाणी गणेशांची यथासांग पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन लंकेस प्रस्थान ठेवले.

मलाईकोट्टी उच्चीपिल्लईयार मंदिर, त्रिची

सहाव्या शतकामध्ये पल्लव राजवंशा पैकी राजा महेंद्र वर्मा याने येथे किल्ल्याच्या पायथ्याशी स्वयंभू शिवलिंग पाहिले आणि त्याच्या भोवती मंदिर बांधायचे ठरवले…त्याच वेळी निर्मिती मध्ये काही विघ्ने आल्याने त्याने गणेशास साकडे घातले तेंव्हा गणपतीने त्यास दृष्टांत देऊन मी अनेक शतके वरच्या शिखरावर वास करून आहे असे सांगितले.. यादृष्टांता नंतर राजा महेंद्र वर्मा यांनी दोन्ही मंदिराचे काम एकत्र सुरू केले. रीतीने ही भारतातील अति प्राचीन मंदिरांपैकी दोन मंदिरे अस्तित्वात आली.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले शंकरांचे मंदिर थायूमनास्वामी या नावाने प्रसिद्ध आहे. येथील शंकरांचे व मंदिर परिसरातील मलिकाविनायकम या गणपतीचे दर्शन घेऊन मग वरच्या गणपतीच्या दर्शनास जाण्याची प्रथा आहे.
ही दोन्ही मंदिरे बांधीव नाहीत तर किल्ल्यावरील नैसर्गिक दगड अख्खा कोरून बनवण्यात आली आहेत. याखेरीजही तिथे तीन अन्य मंदिरांचे निर्माण केले आहे.
पल्लव राजे वंशा नंतर आलेल्या चोला राजवंशानेही या मंदिरांचे संवर्धन केलेच शिवाय अधिक मंदिरांचे निर्माण व गरजेनुसार पुनरुज्जीवन करून याच्या वैभवात भर घातली.

रंगनाथ स्वामी मंदिर..त्रीची..भारतातील सर्वात मोठे देवस्थान

 

Thayumanaswamy ( आई च्या रुपातील शिव) मंदिराचे आतील दृश्य

 

अखंड दगडामध्ये कोरलेले दोन मजली असे हे मंदिर हे वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना समजले जाते.
पल्लव आणि चोला या दोन्ही स्थापत्य शैली इथे पाहता येतात… शब्दशः श्वास रोखून जावा इतके सुंदर हे काम आहे शंभर भव्य आणि कोरीव असे खांब असलेला भला मोठा सभामंडप आणि त्यानंतर पुढे असलेले गर्भगृह अशी ही रचना आहे. प्रत्येक खांबा सह छता वरही अनेक कथा पुराणे कोरलेली दिसतात. नजर ठरू नये इतके बारीक आणि देखणे कोरीव काम शंकरांच्या तसेच गणपतीच्या ही मंदिरामध्ये इथे पहावयास मिळते. वरच्या गणपती मंदिरामधून बाहेर आल्यावर तिची शहराचे अत्यंत सुंदर विहंगम दृश्य बघावयास मिळेल.
इथल्या पाचही मंदिरां विषयी वेगवेगळे दीर्घ लेख लिहावेत इतके भव्य हे काम आहे.

आतील कोरीव काम…

या पाच मंदिरासह तिची शहरांमध्ये रंगनाथ स्वामी मंदिर देखील प्रसिद्ध आहे. श्री विष्णूंचे आहे वरील गणपतीच्या कथेमध्ये वर्णन केलेली जी विष्णूंची मूर्ती कावेरी नदीच्या काठी गणेशाने ठेवली होती त्याच्याभोवती कालौघामध्ये निबिड अरण्य तयार झाले अनेक शतकानंतर चोला राजवंशातील राजा धर्म वर्मा शिकारीसाठी या जंगलात गेला असताना त्याला ही मूर्ती तिथे सापडली आणि त्याने हे मंदिर निर्माण केले. वर्ल्ड हेरिटेज साईट पैकी एक असलेले हे देवस्थान भारतातील सर्वात मोठे वैष्णव देवस्थान आहे आणि जगातील सर्वात मोठ्या पूजा स्थानांपैकी एक आहे. या लेखाचा विषय व शब्द मर्यादेमुळे या मंदिराविषयी अधिक न लिहिता इथेच थांबते.

माहिती संकलक …. योगिता गुर्जर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}