दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

शारदीय नवरात्रोत्सव — लेखन : सौ. अनघा

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-अर्चा घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.
हिंदू धर्मात माता दुर्गेची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. दुर्गा मातेच्या नऊ रूपांची विशेषत: नवरात्रीमध्ये पूजा केली जाते. परंतु इतर दिवशीही दुर्गा मातेची पूजा केल्याने संकटं टळतात. असे मानले जाते की मातेच्या आशीर्वादाने भक्तांचे सर्व प्रकारचे दुःख आणि गंडांतर दूर होतात. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते देवांपर्यंत सर्वांनी मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून तिची मनोभावे पूजा केली आहे.

नवरात्र… हा नऊ रात्री देवीचा उत्सव साजरा केला जातो…. नऊ हा आकडा खूप महत्वाचा आहे. नऊ हाच आकडा का? ह्याचे महत्व अनन्य साधारण आहे. बऱ्याच गोष्टी ह्या नऊ आकड्याशी संबंधित आहेत. नारायण नऊ आहेत आपण त्यांना नवनारायण म्हणतो, ग्रह नऊ आहेत – नवग्रह, रस सुद्धा नऊ आहेत त्यांना नवरस म्हणतो, नवनाथ आहेत, जप माळेत मणी १०८ असतात… त्याची बेरीज नऊ येते, श्रीमदभग्वद्गीतेचे अध्याय १८ आहेत… त्यांची बेरीज नऊ येते, बाळ नऊ महिन्यांनी ह्या जगात प्रवेश करते…. अशीच कितीतरी उदाहरणं आहेत. त्यातच नवदुर्गा… नवरात्री हा सुद्धा अनन्य साधारण महोत्सव आहे.
ह्या शारदीय नवरात्राची आज सुरुवात झाली आहे.
पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री ह्या दुर्गामातेच्या रूपाचे पूजन करतो.
माता शैलपुत्री…..
मातेला पांढरा रंग प्रिय आहे.
शैल म्हणजे पर्वत आणि पर्वताची मुलगी ती शैलपुत्री….. हिमालयाची कन्या. माता शैलापुत्री ही नंदी ह्या वाहनावर बसलेली आहे. कठोर तपश्चर्या करणारी माता शैलपुत्री ही सर्व वन्य प्राण्यांचे रक्षण करते. मातेच्या उजव्या हातात त्रिशूल आहे आणि डाव्या हातात उमललेले कमळ आहे.
पांढरी फुले आणि वस्त्र देवीला अर्पण केले जाते. पांढऱ्या रंगाचा समावेश असलेली मिठाईचा देवीला नैवेद्य अर्पण केला जातो.
माता शैलपुत्रीची भारतात ६ ठिकाणी मंदिरे आहेत.
१) वाराणसीमधील मंदिर अतिप्राचीन आहे. शारदीय नवरात्र आणि वासंतीक नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी काही भक्तांना साक्षात दर्शन देते, असे म्हणतात.
२) काश्मीरमधे बारामुल्ला येथे माता शैलपुत्रीचे मंदिर आहे. मंदिराचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. पुराण कथा आणि दंत कथानी भरलेला आहे. प्राचीन धर्म ग्रंथानुसार सम्राट अशोकाच्या काळात हे मंदिर बांधले गेले आहे.
३) हिमाचल प्रदेश मधे निहरी येथे मंदिर आहे. तिथे महामाया नागमाता शैलपुत्री शक्तिपीठ ह्या नावाने ह्या मातेचे मंदिर आहे.
४) हिमाचल प्रदेशमधे केसरला सेल्ह येथे अजून एक मंदिर माता शैलपुत्रीचे आहे.
५) उत्तर प्रदेश मधे धर्मांगदपूर येथे एक माता शैलपुत्रीचे मंदिर आहे.
६) उत्तराखंड येथे सुवल येथे माता शैलपुत्रीचे मंदिर आहे.

नवदुर्गेच्या नऊ रूपांचे नवरात्रात पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्याची पद्धत, परंपरा प्राचीन काळापासून आजतागायत सुरू असल्याचे पाहायला मिळते. नवदुर्गेचे प्रथम स्वरुप शैलपुत्री देवीला समर्पित आहे.

माता शैलपुत्री बीज मंत्र: ह्रीं शिवायै नम:।

जय माँ शैलपुत्री 🙏🏻🙏🏻

लेखन : सौ. अनघा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}