दुर्गाशक्तीवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

शारदीय नवरात्रोत्सव माता कात्यायनी लेखन : सौ. अनघा  वैद्य

शारदीय नवरात्रोत्सव माता कात्यायनी लेखन : सौ. अनघा  वैद्य

सहावा दिवस – माता कात्यायनी

माता कात्यायनी ही महादेवी आणि अत्याचारी राक्षस महिषासुराचा वध करणाऱ्या देवीचं एक रूप आहे. नवदुर्गांपैकी ती सहावी आहे , हिंदू देवी दुर्गेची नऊ रूपे ज्यांची नवरात्रीच्या उत्सवात पूजा केली जाते. तिचे चार, दहा किंवा अठरा हातांनी चित्रण केले आहे. माता कात्यायनी हे अमरकोशातील देवी आदि पराशक्तीला दिलेले दुसरे नाव आहे, संस्कृत कोश (देवी पार्वतीची नावे- उमा, गौरी, काली, हैमावती, ईश्वरी ). कात्यायनी देवीचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आणि स्फुरद आहे.
शक्ती धर्मात, ती शक्ती किंवा दुर्गा, एक योद्धा देवी, ज्यामध्ये भद्रकाली आणि चंडिका यांचाही समावेश आहे, या उग्र रूपांशी संबंधित आहे .
या दिवशी साधकाचे मन ‘आज्ञा’ या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे.
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष माता भगवतीची कठोर तपस्या केली. माता भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. महर्षी कात्यायनांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांच्या घरात कन्या रूपात जन्म घेतला होता. माता भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता.

अशीही एक कथा सांगितली जाते की, जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषसुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.

माता कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान श्रीकृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. माता कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल
आहे. तिचे वाहन सिंह आहे.

माता कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो.
माता कात्यायनी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते. माता कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जून समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.
देवी कात्यायनीच्या उपासनेने रोग, भय आणि क्रोधाचा होतो नाश.
देवी कात्यायनीची उपासना केल्याने भक्तांमध्ये शक्तीचा संचार होतो. या देवीच्या कृपेने साधक शत्रूंचा नाश करू शकतात. त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. देवी कात्यायनीची पूजा केल्याने अविवाहित मुलींचे लग्नाचे योग जुळून येतात आणि योग्य वरही मिळतो. कात्यायनी देवीच्या उपासनेने रोग, शोक, क्लेश, भय इत्यादींचा नाश होतो. कात्यायनी देवीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे भय दूर होते.
भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. रोग, शोक, संताप, भय सर्व नष्ट होते. तसेच जन्मोजन्मीच्या पापातूनही मुक्तता होते. यासाठी देवीच्या उपासनेला पर्याय नाही. देवी कात्यायनी आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते. सदैव तिच्या सान्निध्यात राहून साधकाने परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या कृपाछायेत आयुष्य व्यतित करावे.

माता कात्यायनी बीज मंत्र – क्लीं श्री त्रिनेत्रायै नम:

माता कात्यायनी चे संपूर्ण भारतात एकच मंदिर आहे….
भारताची राजधानी दिल्ली शहरांत हे मंदिर आहे. नवी दिल्ली मधे छतरपूर येथे आंबेडकर कॉलनी मधे जवळजवळ ७० एकर परिसरात हे माता कात्यायनी देवीचे प्रशस्त आणि भव्य दिव्य मंदिर आहे. मंदिराच्या आवारात छोटी मोठी अजून २० मंदिरे आहेत.
१९७४ पर्यंत मंदिर अगदीच पडक्या अवस्थेत अगदी छोटंसं होतं. पण १९७४ साली ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मंदिराचे अवघे रुपच पालटले.
माता कात्यायनीच्या साज शृंगारासाठी रोज विशिष्ठ आणि वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या माळा दक्षिण भारतातून मागवल्या जातात. त्यामुळे माता कात्यायनी देवीची रोजची प्रतिभा खूपच लोभस आणि विलोभनीय दिसते.

संकलन – सौ. अनघा  वैद्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}