दुर्गाशक्तीवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

शारदीय नवरात्रोत्सव माता कालरात्री लेखन : सौ. अनघा  वैद्य

शारदीय नवरात्रोत्सव माता कालरात्री लेखन : सौ. अनघा  वैद्य

दिवस सातवा – माता कालरात्री

दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘सहस्रार’ चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.

या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत.

कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’ सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.

मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे. म्हणून हिचे दुसरे नाव शुभंकारी असल्याचा प्रत्यय येतो. दुष्टांचा विनाश करणारी, ग्रह संकटांनाही दूर करणारी अशी ही कालरात्री. राक्षस, भूतप्रेत हिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात.
पौराणिक कथेनुसार, एकेकाळी शुंभ, निशुंभ, रक्तबीज यांसारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता. लोकांसह देवांनाही त्रास दिला होता. बघेल त्याला उचलणे, मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. त्यामुळे वैतागलेले देव गण भगवान शंकरांचा धावा करू लागले.

जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले, तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले. देवीने महिषसूरमरर्दिनी रूप धारण करून राक्षसाचा वध केला. पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली. तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता काळरात्रीची निर्मिती पार्वती मातेने केली.

या रक्तबिजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख धडावेगळे करून त्यातून येणारे रक्त कालीमातेने प्राशन केले. त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला.

माता कालरात्री बीज मंत्र – ‘ॐ कालरात्र्यै नम:।’

माता कालरात्रीची भारतात ३ ठिकाणी मंदिरे आहेत.
मध्यप्रदेशात इंदौर येथे माता कालरात्रीचे मंदिर आहे.
वाराणसी या तीर्थक्षेत्रात मीरघाट, कालिका गल्ली येथे माता कालरात्रीचे मंदिर आहे.
बिहारमध्ये भोजपुर ला सिमरी या गावात माता कालरात्रीचे मंदिर आहे.

संकलन – सौ. अनघा  वैद्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}