अनाहत प्रस्तुत करत आहे…. गुलझारियत
अनाहत प्रस्तुत करत आहे…. गुलझारियत काही गाणी..काही कविता..थोडा संवाद अशी एक सुरेल संध्याकाळ…गुलझार आणि त्यांच्या चाहत्यांसाठी
अनाहत प्रस्तुत करत आहे…. गुलझारियत
एका मनस्वी कवीच्या मुसफिरीचा मागोवा घेणारा सांगीतिक कार्यक्रम
भारतीय चित्रपटात जेवढे महत्त्व गाण्यांना आहे तेवढे जगात कुठेच नसावे. आणि गाणी म्हटले की जसे त्याचे एक संगीतकार गायक गायिका यांची आठवण होते तितके पटकन त्यांचे गीतकार आठवतातच असे नाहीत..अर्थात याला असलेल्या काही सन्माननीय अपवादांपैकी सर्वात ठळक अपवाद म्हणजे गुलजार.
लहान असताना पासून गाण्याची गोडी लागली होतीच…कारण घरात रेकॉर्ड player वर सतत हिंदी मराठी गाणी चालू असायची…
नंतर टीव्ही वरच्या मोगली चे..चड्डी पहेन के फूल खिला है..हे ओठावर आपसूक हसू येईल असे वर्णन, लकडी की काठी चे निरागस शब्द…अशातून यांचे शब्द मोहवू लागले….पण नाव अजून दूरच होते
मग गाणी वहीत लिहिणे, नंतर आवडत्या गाण्यांच्या cassette करुन घेणे..या सगळ्या टप्प्यावर कधी तरी या नावाची ओळख झाली….गुलझार….
पुढे जाऊन मग गुलजार यांच्या अजून काही सुंदर शब्दांची काव्यांची शायरीची ओळख झाली आणि या शब्दांची जादू मनात झोपायला लागली आणि हळूहळू गुलजार साहब क्या चीज है हे समजून घ्यायची ओढ वाढायला लागली…
मग कधी जिहाले मिस्किन मुकून बरंजिश असे न कळणारे तरी मनात राहून जाणारे शब्द
कधी आँखोंकी खुशबू, महेके हुए राज , खामोशी की आवाज असे काही फक्त गुलझार च लिहितील असे शब्द…
एकाच गाण्यातील पण स्वतंत्र रचना वाटेल इतक्या ताकदीचे किती शब्द…भेटत राहिले..भेटत आहेत…
एक दूर से आती है
पास आके पलटती है
एक राह अकेली सी
रुकती है ना चलती है
दिन ने हाथ थाम के इधर बिठा लिया
रात ने इशारे से उधर बुला लिया
सुबह से शाम से मेरा दोस्ताना
एक छोटासा लम्हा है जो खत्म नही होता
मैं लाख जलाता हुं
वो भस्म नही होता
बहोत खुबसुरत है हर बात लेकीन
अगर दिल भी होता तो क्या बात होती
याच लेखणी मधून…सपने मे मिलती हैं…, बिडी जलाई ले , नमक इश्क का , आणि कजरा रे…,
रात के ढाई बजे…, खामखा नहीं…, खुदाया खैर…….बोल ना हल्के हलके
अशी गाणी पण उमटतात. काळाबरोबर इतका समरस होवून चाललेला ..चार पिढ्यांची तरुणाई शब्दातून व्यक्त करणारा असा हा अफलातून शब्दप्रभू…गुलझार
या आणि अशाच काही सुंदर शब्दांचा, अनोख्या सुरांचा आम्ही काही गुलझार प्रेमींनी घेतलेला मागोवा….. गुलझारीयत
सरदार महादेव बळवंत नातू सभागृह
(भारती विद्याभवन सभागृह)
सेनापती बापट रोड, पुणे
संध्याकाळी ५.३०-८.३०
तिकीट मूल्य: १००/-
येताय ना???
एका मनस्वी कवीच्या मुसफिरीचा मागोवा घेणारा सांगीतिक कार्यक्रम
For Ticket Booking Vikram 9822052261 , G Pay , Whats app , Call and Confirm
🙏🏻
दिनांक १९ ऑक्टोबर २०२४