मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

भाड्याची “सायकल

📖✒️🚲 भाड्याची “सायकल” 🚲..✍️

१९८०-९० चा काळ होता तो…
त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी “सायकल” घेत होतो…
बहुधा जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 😀
भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं..!
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा…! 📝
घराच्या जवळ असे अनेकजण “सायकल” दुकानदार होते…

👉🏻 भाड्याचे नियम कडक असायचे.
● जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी…
मग त्या “सायकल” वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 🤠
पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने “सायकल” चालवायला मागायचे.
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा ⏱ म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची… 💫

तेव्हा भाड्याने “सायकल” घेणं ,
हेच आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं…! 🤩
स्वतः ची लहान “सायकल” असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे…

घरी तेव्हा मोठी काळी अँटलस “सायकल” आणली , 🚲
पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं यातचं अर्धी एनर्जी वाया जायची
आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक…
खबरदार हात लाऊ नको “सायकल” ला , गुडगे फुटुन येशील…

खरं तर जीवनाची “सायकल” अजुनही चालु आहे 😊
पण आता ते दिवस नाही…
तो आनंद नाही….

आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या “सायकल” वर नजर गेली तेव्हा वाटलं की..

“एक काळ गाजवलेल्या… “सायकल”ची किंमत अन् मजा यांची सर आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही… 🏍”

गेले ते दिवस…!!…
राहिल्या त्या आठवणी…!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}