ॐ नमो भगवते वासुदेवाय दररोज एक भागवत श्लोक आणि त्याचा अर्थ
ॐ नमो भगवते वासुदेवाय
जन्माद्यस्य यत:अन्वयात्इतरत:च अर्थेषुअभिज्ञ: स्वराट् तेने ब्रह्म हृदा य आदिकवये मुह्यन्ती यत्सुरय: |
तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोsमृषा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ||१||
अर्थात
हे प्रभू वासुदेवनंदन श्रीकृष्णा,मी तुम्हाला सादर प्रणाम करतो मी सदैव तुमचे ध्यान करतो,कारण तुम्हीच परम सत्य आहात तसेच ह्या सृष्ट ब्रह्मांडाच्या उत्पत्ती,स्थिती,लयाचे कारण आहात. तुम्हीच संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहात, तुमच्या पलीकडे कुठलेही कारण नाही. तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्हीच आदिजीव ब्रह्मदेवांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले. तुमच्यामुळेच देवता आणि ऋषीमुनी अग्नीत जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा आभास व्हावा त्याप्रमाणे भ्रमात टाकले जातात. तुमच्यामुळेच प्राकृतिक गुणांच्या क्षोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असूनही शाश्वत भासतात.तुम्ही भौतिक जगाच्या मायिक सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्यधमात शाश्वत स्थितीत विराजमान आहात.🙏
दररोज एक भागवत श्लोक आणि त्याचा अर्थ
राजेश सहस्रबुद्धे
+91 98505 89580