देश विदेशमनोरंजन

# गुरु – शिष्य नाते# कथा : फुलीबाई

🍂श्री गुरुदेव दत्त 🍂
# गुरु – शिष्य नाते#
कथा : फुलीबाई
राजस्थान मध्ये जोधपूर जवळ एक छोटेसे गाव होते . त्या गावात एक फुलीबाई नावाची बाई राहात होती . लग्नानंतर थोड्याच दिवसात तिचा नवरा वारला . तिचे आई वडील म्हणाले -” तुझा खरा पती परमात्माच आहे बाळ ! चल तुला गुरुदेवांकडून दिक्षा मिळवून देतो ” . तिच्या आईवडीलांनी समर्थ महात्मा भूरीबाईकडून तिला दिक्षा मिळवून दिली. आता फूलीबाई गुरूच्या आज्ञेवरून साधनेत मग्न झाल्या . प्राणायाम, जप आणि ध्यानादी करीत त्यांची बुध्दीशक्ती विकसित होऊ लागली .तिला कळू लागले की,प्राणीमात्राचे परम हितैषी खरे स्वामी परमात्माच आहेत .ती हळूहळू परमात्म्याच्या रंगात रंगत प्रेमभक्तीने आपले हृदय ओतप्रोत करून सुषुप्त शक्ती जागवण्यात यशस्वी झाली . तिला अलौकिक विद्या प्राप्त झाली . ती निराधार राहिली नाही . तर ती ईश्वरी स्नेहात परिपूर्ण झाली . तिला दिव्य प्रेरणा स्फुरू लागल्या . लौकिकदृष्ट्या ती खूप गरीब होती पण अलौकिक दृष्ट्या ती खूप श्रीमंत झाली .
शेणाच्या गोवऱ्या करून त्यावर ती चरितार्थ करीत असे . तिची शेजारीण मात्र तिच्या गोवऱ्या चोरायची . फुलीबाई तिला रागावली तर नाहीच उलट तिला तिची दया येऊन ती म्हणाली ,” ताई !तू जर चोरी करशील तर तुझे मन अपवित्र होईल व ईश्वर तुझ्यावर नाराज होईल . हव्या तर मी पाच पंचवीस गोवऱ्या तुला देईन पण तू असे वागून तुझ्या मन व बुद्धीचा, कुटुंबाचा नाश करू नकोस “.
शेजारीण दुष्ट होती . ती फुलीबाईला शिव्या देऊ लागली . पण फुलीबाई रागावली तर नाहीच उलट तिच्या मनात दया उत्पन्न झाली .ती म्हणाली,” ताई !मी तुमच्या भल्यासाठीच सांगते . तुम्ही भांडू नका . ती बाई ऐकेना .भांडण वाढतच गेले तेव्हा गावचे सरपंच व पंचायत जमली . त्यांना पाहून ती स्त्री म्हणाली,” फुलीबाई चोर आहे . माझ्या गोवऱ्या चोरते “. फुलीबाई म्हणाली,” चोरी करणे मी पाप समजते”. तेव्हा सरपंच म्हणाले ,”आम्ही निर्णय कसा घ्यावा की गोवऱ्या कोणाच्या आहेत . गोवऱ्यांवर नाव तर लिहिलेले नाही आणि आकारही सारखाच आहे . कोणत्या गोवऱ्या कोणाच्या हे कसे ओळखणार ?चोरी करणाऱ्या स्त्रीचा नवरा कमवत होता तरी ती चोरी करे . अर्थात मनाच्या मालिन्यापोटी . कुणी पैशाची, कुणी शब्दांची ,कुणी लाच रुपात तर कुणी पुढारी बनवून चोरी करतात . त्यांची समज कमी असते . उच्च विचाराचा मनुष्य प्रामाणिक कमाईवर जगतो .मग ते भले साधे जीवन असो . पण त्याचे विचार मात्र उच्च असतात . फुलीबाईचे जीवन साधेसुधे होते .परंतु तिची भक्ती व समज खूप वाढली होती . ती म्हणाली ,” ही बाई माझ्या गोवऱ्या चोरते याचा पुरावा हा आहे की ज्या गोवरीला कान लावला की त्यातून ‘राम’ नामाचा नाद येईल त्या माझ्या आहेत बाकीच्या तिच्या आहेत असे समजा .” पंचायतीच्या लोकांनी त्या बाईच्या घरी जाऊन गोवऱ्या तपासल्या . त्यातल्या बऱ्याच गोवऱ्यातून रामनामाचा ध्वनी ऐकू आला . त्या बाईच्या चोरटेपणाची त्यांना खात्री पटली . गुरुकृपेने झालेल्या या चमत्कारामुळे फुलीबाईचे महत्त्व वाढले . ती अहोरात्र मंत्र जप करत असे . या मंत्रामुळे तिच्यात दैवी शक्ती आली . ती ज्या वस्तूंना स्पर्श करेल त्या वस्तूत सूक्ष्म तरंगाचा संचार होई . गावच्या लोकांनी फुलीबाईचा चमत्कार पाहून तिचा सत्कार केला . एके दिवशी राजा यशवंतसिंहाच्या सैनिकांची एक तुकडी तेथून निघाली होती . त्यापैकी एक सैनिक फुली बाईच्या झोपडीत आला व पाणी मागितले .ती म्हणाली ,”बाळा , धावून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये . त्यामुळे आरोग्य बिघडते आणि पुढे नुकसान होते . मी तुला एक पोळी देते ती खाऊन मग पाणी पी .सैनिक म्हणाला ,” माते ,आमची पूर्ण तुकडी पळत येत आहे . मी खाल्ले तर सर्वांना द्यावे लागेल . फुलीबाई म्हणाली ,”मी दोन पोळ्या व थोडी गवारीची भाजी बनवली आहे .तुम्ही सर्वांनी दोन घास खाऊन घ्या “. सैनिकाला प्रश्न पडला दोन पोळ्या नि एवढीशी भाजी सर्वांना पुरणार कशी ? फुलीबाई म्हणाली ,” तू चिंता करू नको . माझा गुरु व श्रीराम माझ्या पाठीशी आहेत .तिने दोन पोळ्या व भाजी झाकली . हात जोडून प्रार्थना केली व गुरुस्मरण करत त्या सैनिकांना पोळी भाजी देत राहिल्या . ते खाऊन पूर्ण तुकडी संतुष्ट झाली . त्यांना आजवर एवढे स्वादिष्ट जेवण मिळाले नव्हते .त्यांना एवढ्याशा झोपडीत एवढे भोजन कसे आले हा प्रश्न पडला . तिने ज्या भांड्यात त्या दोन पोळ्या ठेवल्या ते अक्षय पात्र ठरले .ही गोष्ट राजाला कळताच तो आपले राजवैभव बाजूला ठेवून साध्या वेशात तिच्या भेटीला आला . तिच्यासमोर नम्र होऊन त्याने सत्संग ऐकला ,चर्चा केली . फुलीबाईने त्याला महत्त्वाचा असा पारमार्थिक उपदेश केला .” बाळ ,तू राजा आहेस पण या बाह्य राज्याबरोबर आतले आत्म्याचे राज्य जिंकून घे . तुझ्यातला आत्मा -परमात्माला ओळख , त्याच्या ज्ञानाने खरे सुख प्राप्त करून घे. बाह्य विषय विकारांच्या सुखात गुंतून राहू नकोस . सत्कर्म करून ती ईश्वरार्पण कर .तठस्थपणे कर्म केले तर मुक्ती पद मिळते .तेच खरे राज्य आहे . साधुसंतांच्या दर्शनाने भगवंताची आठवण होते . संत – गुरुदर्शनासाठी अधिक वेळ दे . खजिन्यातले धन ज्या प्रजेच्या घामापासून आले आहे त्या प्रजेसाठीच खर्च कर ते स्वतःच्या चैनीत उडवणारा राजा नरकाचे दुःख भोगतो .”फुलीबाईच्या उपदेशाने राजा भारावून गेला व त्याने राजपद त्यागून आपले जीवन प्रजेच्या कल्याणात व्यतीत केले . ‘ गुरुकृपे ‘ मुळेच सामान्य फुलीबाईला राजाला उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त झाला शिवाय तिच्या जन्माचे कल्याण झाले .
जय शंकर🙏
नर्मदे हर 🌊

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}