मंथन (विचार)

#शक्ती_भाग_२ 🔱 लेखक अक्षय चंदेल संदर्भ :-शिवभारत, सभासद बखर,राजा शिवछत्रपती

#शक्ती_भाग_२ 🔱

घात तुळजापूर ला झाला आणि वार्ता जाऊन राजगडावर आदळली…
खणाणणारा संबळ तुटून गळून पडला, महाराष्ट्राची राजधानी राजगड, भोसल्यांचा निवास जिथे तिथेच भोसले कुलस्वामिनी च्या खंडणाची वार्ता येऊन पोहोचली आणि सदरेत हाहाकारच माजला….।

रामेश्वराच्या जलकुंभासाठी जलाशयातुन निघणाऱं पाणी अश्रू ढाळीत बालेकिल्ल्यावर मेण्यात बसून निघाला…..

गरुडाच्या पंखावर बसलेले दख्खन विष्णू खासे त्या मेण्यास सामोरे आले…

आपल्या हाताच्या वज्रमुठा बांधून सह्याद्रीच्या तेजोभास्कर शिवाजी राजांनी मेण्यापुढे आपला हात जोडला…

आणि मेण्यातुन खुद्द जगदंबा उतरली…

एकनाथांनी दार ठोठाऊन भगवतीला मगितलेला आशिर्वाद, जन्माला कन्या आली म्हणून हत्तीवर बसून साखर वाटणार्या लखुजीराव जाधवांची कन्या, समशेरबहाद्दुर महाबली शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी महाराष्ट्रभवानी जिजाबाई भोसले साहेब….

” सिऊबा….!!

” जी मासाब !!! ”

डोळ्यात क्रोधाग्नी भरून जिजाऊ म्हणाल्या…

” त्या नरपिशाच्च खानाने श्री जगदंबेस उपद्रव केला ?? ”

राजांनी आपली मान खाली घातली आणि दाटलेल्या कंटाने ” हो !! ” म्हणून उतरले….

” सिऊबा…..!! ” राजांकडे स्थिर झालेल्या डोळ्यांनी जिजाऊ म्हणाल्या….

” शिवबा तुम्ही आम्हास विचारले होते न की जिवनाचे ध्येय काय म्हणून!! तर ऐका…..!!

तुम्ही गर्भात असतांनाच आम्ही तुमचे ध्येय निश्चित केले होते…..!!
शिवनेरी वर आई शिवाईच्या पुढे पदर पसरवून मागणं मागतांना….
या क्रूर पातशाहांना संपवून पुन्हा या भुवर रामराज्य आणणे हेच… हेच तुमचे ध्येय…आणि याची पायरी तो हा खान… या खानाच मुंडके आम्हाला हवय शिवबा…. कालीकेच्या खप्परास रक्त हवय… या जिजाचामुंडेस त्या दैत्याचं मुंडके हवय… आई भवानीचं उसनं फेडा, खान खस्त करा….!!

“जी मासाहेब…..!!! ” राजांचे अंग थरथरत होते…. तोडातुन उद्गार फक्त एकच….

“श्री जगदंबा का अवतरली नाही या राक्षसास संपवण्यास ?? ”

“ती….!!! ” येते….जेव्हा अहंकाराचे शिरपेच चढतात तेव्हा दैत्याचा नाश करण्यासाठी ती येतेच…!! ”

जिजाऊ बोलायला लागल्या…

क्रमशः

लेखक अक्षय चंदेल
संदर्भ :-शिवभारत, सभासद बखर,राजा शिवछत्रपती

जय भवानी 🔱 🚩
जय शिवराय ⚔️ 🚩

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}