#शक्ती_भाग_३ 🔱 लेखक :- अक्षय चंदेल संदर्भ :- शिवभारत, सभासद बखर,राजा शिवछत्रपती
#शक्ती_भाग_३ 🔱
जिजाऊंच्या मुखातून जणू जगदंबा बोलत होती…
राक्षसी विचारांची मांड टाकून रंभ आणि क्रंभ हे दोन्ही भाऊ घोर तपश्चर्या करुन अग्नी आणि वरुणाची करुणा प्राप्त करण्यासाठी स्थिर होऊन जलशयात उभे होते… स्वर्ग सिंहासन डोलायला लागले मगरमच्छाचे रुप धारण करून इंद्राने क्रंभ संपवला पण आपल्या भावाच्या हत्या चा प्रतिषोध म्हणून रंभ आणखिनच उग्र तपश्चर्या करायला लागला…
अग्नीदेवास प्रसन्न करुन स्वतः चा अंत देव अथवा दानव च्या हातुन होऊ नये म्हणून मागणं त्याने मागितले…..
“मग मासाहेब तो कधीच मेलाच नाही ?? “शिवाजी राजांना प्रश्न उपस्थित राहीला….
शिवबाकडे बघत जिजाऊ म्हणाल्या…
” शिवबा तो रंभ म्हणजे या पातशाही समजा…. या रंभास वरदान मिळाल्यावर त्याला एक श्रापीत श्यामला नावाच्या श्रापीत म्हशीवर प्रेम झाले, मुळात ती म्हैस नव्हे एक राजकुमारी होती…. तीच्याशी विवाह
करुन स्वर्गलोक जिंकण्याची धडपड सुरू झाली त्या दैत्याची , अखेर यमदेवाने आपल्या रेड्यास त्याच्या पुढे पाठवून त्याचा वध केला कारण देव दानव चा वरदान मागुन बसलेला रंभ अहंकाराने प्राणी विसरला होता …..
रंभाची चिता पेटल्या बरोबर श्यामला गर्भाअवस्थेतच त्याच्या चितेवर चढली आणि जळतांन किंकाळली ” अग्नीदेव तुमचा वरदान जाया गेला…..!! ” पण अचंबा म्हणजे त्या पेटत्या चितेतुन एक महाकाय शरीर पुढे आले…. अर्धा म्हैस आणि अर्धा पुरुष हा असुर म्हणजे महिषासुर…..ब्रम्हदेवास प्रसन्न करून या असुराने वरदान घेतला की त्याचा अंत ना देव ना दानव , ना पशु ना पक्षी कुठल्याही पुरुष कडून होणार नाही….
ब्रम्हदेवाने विचारले ” स्त्री ??? ” आणि अहंकारात मुरलेल्या महिषासुराने हसुन फेटाळून बोल लगावला तो ” एक अबला स्त्री मला काय मारेल ?? ”
आणि हा माजलेला रेडा स्वर्गलोकावर चाल करून गेला….
सर्व सर्व त्या पुढे असमर्थ झाले….
जिजाऊ बोलत असतांना तेवढ्यात मागुन एक आवाज आला….
” राजं…..!! खानाने सर्व वतनदार आपल्या कडे वळवायला सुरुवात केली, लय लय धास्ती पडलीया….!! आपला मेव्हणा बजाजी निंबाळकर यांना कैदेत घातलं…..!! काही मार्ग सुचेना….. जे खानाकडे गेले त्याची वतनं शाबूत राहिल असा फतवाच निघालाय…. राजं ह्योच बोलाया कान्होजी जेधे गडावर येतायत… !!
“येऊ द्या त्यांना. !! ”
राजांनी मासाहेब कडे बघितले आणि मासाहेब मंचावर बसल्या…. जणू सिंहासनावर जगदंबा बैसावी……
क्रमशः
लेखक :- अक्षय चंदेल
संदर्भ :- शिवभारत, सभासद बखर,राजा शिवछत्रपती