वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

पुजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, संकलन- निसर्ग उपचार तज्ञ डॉ. प्रमोद ढेरे,

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

पुजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, या शारीरिक समस्या होतील काही दिवसांत होतील गायब

पूजेच्या वेळी कापूर वापरला जातो. असं मानलं जातं की कापरामध्ये वास्तू दोष आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते. या कारणास्तव कापूर अत्यंत पवित्र मानला जातो.

पण तुम्हाला माहीत आहे का, कापरामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे तुमच्या सर्व शारीरिक समस्या दूर करू शकतात. कापरामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. याशिवाय विविध समस्यांमध्ये कापूर कसा वापरावा, हेही समजून घेणं आवश्यक आहे.

जाणून घेऊ, कापरापासून कोणकोणते फायदे मिळतात, ज्याबद्दल आपण आतापर्यंत अनभिज्ञ आहोत.
◼️तणाव दूर करतो कापराचा सुगंध मनाला शांत करतो. जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर, एका भांड्यात कापूर ठेवा आणि खोलीत ठेवा. यामुळं तणाव दूर होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. शिवाय, तुम्हाला रात्री चांगली झोपही लागेल.
◼️डोकेदुखी दूर करतो डोकेदुखीचा त्रास झाल्यास कापूर, शुंथी, अर्जुन वृक्षाची साल आणि पांढरं चंदन समप्रमाणात बारीक करून कपाळावर लावावं. थोडा वेळ तसंच पडून रहावं. या उपायानं तुम्हाला भरपूर आराम मिळेल.
◼️स्नायू वेदना आणि खोकल्यामध्ये आराम स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी कापूर देखील उपयुक्त मानला जातो. यासाठी मोहरीच्या तेलात कापूर टाकून नियमितपणे शरीराची मालिश करावी. खोकला झाल्यास या तेलानं छाती आणि पाठीला मालिश करा. तुम्हाला भरपूर विश्रांती मिळेल. तुम्ही मोहरीऐवजी तिळाचं तेलही वापरू शकता.
◼️शिवाय, सर्दी झाल्यास गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यानं खूप आराम मिळतो.
◼️खोबरेल तेलात कापूर मिसळून ते नियमितपणे त्वचेवर लावावं. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते. पण जर त्वचा तेलकट असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर हे करा.
◼️खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांमध्ये लावल्याने कोंड्याची समस्या दूर होऊन केस काळे राहतात.
◼️हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. अशा स्थितीत कापूर तेलात पाणी मिसळा आणि त्यात काही वेळ पाय ठेवा. यानंतर पाय पुसून क्रीम किंवा तेल लावा. यामुळे तुम्हाला काही दिवसांत आराम मिळेल.

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}