देश विदेशमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

अवि्मरणीय आणि भन्नाट कोकण ट्रिप…… अभिषेक शुक्ल

अवि्मरणीय आणि भन्नाट कोकण ट्रिप.

आमची ट्रिप होऊन आता ३ आठवडे झाले. आज लिहायला बसलो आहे.

एक अवि्मरणीय आणि भन्नाट माझ्या मित्रांसोबत बाईक वर केलेली कोकण ट्रिप.

गेले महिना भर जोरदार प्लॅनिंग चालू होते. बाईक ने जायचे पण कुठे जायचे. सुरवातीचा गोवा ठरत होते. मग ते कॅन्सल झाले मग गोकर्ण महाबळेश्वर, मुर्डेश्वर. असा ठरत होता.

नुसता जागा ठरवा ठरवीमध्येच वेळ जात होता. ट्रीपच्या तारखा मात्र नक्की होत्या. त्याच्यात काहीच बदल होणार नव्हता. पण जागा म्हणजे काहीच ठरतच नव्हतं. मध्येच दमण, मध्येच कर्नाटक, मधेच कोस्टल कोकण, गोवा असं करत करत ट्रीप ला जायला आठ दिवस राहिले होते.

मग मी आणि माझा मित्र अमोघ आम्ही दोघांना मिळून एक प्लान फायनल केला आणि तोच उर्वरित दोघांना सांगितला. आम्ही चौघांनी तो फायनल केला.

तो प्लान असा होता:

पुणे ते वेंगुर्ला, वेंगुर्ला ते रत्नागिरी, रत्नागिरी ते दाभोळ, दाभोळ ते पुणे.

आम्हाला चौघांनाही हा प्लॅन आवडला. ट्रीप ला जायला आता एकच आठवडा राहिला होता. कोणाचं बाईक सर्विसिंग राहिलं होतं कोणाला काही कपडे घ्यायचे होते तो कोणाला काही किरकोळ ॲक्सेसरीज घ्यायचे होत्या.

ट्रीप आमच्या चौघांची होती.

मी, अमोघ, चैतन्य, अमित.

पण ट्रिपच्या आदल्या दिवशी रात्री काही वैयक्तिक कारणामुळे अमित याला ट्रीपला यायला जमले नाही. मग काय आम्ही तिघांनीच जायचे ठरवले.

दिवस १:

ट्रीपला निघायची वेळ साधारण आम्ही सहा ठरवली होती. पण निघता निघता नेहमीप्रमाणे आम्हाला 40 मिनिटे उशीर झाला. त्याला कोणीच काही करू शकत नाही 😊.

सिंहगड रोड वरून आम्ही ट्रिप चालू केली, आमचा रूट सिंहगड रोड – कराड – मलकापूर – अनुस्कुरा घट – खरे पाटण – वेंगुर्ला असा होता.

ट्रिप चालू झाल्यावर आम्ही नॉनस्टॉप सातारा पर्यंत गेलो. तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला, जिथली सर्विस अतिशय भंगार होती आमच्या हिशोबाप्रमाणे आम्हाला अर्धा तासापेक्षा जास्त ब्रेकफास्ट ला देता येणार नव्हता. पण तिथेच आम्हाला दीड तास लागला. नाईलाजाने तिथेच ब्रेकफास्ट करून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्हाला अगदी कराड पर्यंत कुठेही ट्रॅफिक लागला नाही. आणि कराड गाव सोडून आम्ही मलकापूरच्या रस्त्याला लागलो. कराड ते मलकापूर चा रस्ता हा कोकरूड गावावरून जातो आणि अतिशय सुंदर असा रस्ता आहे. आम्हाला थोडी सुद्धा कल्पना नव्हती की उन्हाळ्यात सुद्धा हा रस्ता तितकाच सुंदर दिसतो. भर उन्हाळ्यात सुद्धा हिरवीगार झाडे आणि गार वारे यानेच आम्हाला खूप प्रसन्न वाटत होतं. ह्या रस्त्यावर आम्ही तिघेच होतो जणू काही आम्ही येणार म्हणून हा रस्ता मोकळा ठेवला होता की काय असेच वाटत होते. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गाडी 147 च्या वेगाने पळवली. थोडी मजा वाटली पण तेवढीच भीती पण वाटली. मग काय अमोघने पण 140 च्या वेगाने पळवली. असे करत करत मलकापूरला पोहोचलो. तेथील रोड खूप छोटे असल्यामुळे पंधरा-वीस मिनिटे आम्हाला जरा ट्रॅफिक लागला. आणि मग आम्ही अनुस्कुरा घाटाच्या दिशेने निघालो. अतिशय सुंदर असा घाट आहे हा. एकेरी वाहतूक आहे रोड चांगला आहे पण रोड छोटा पण आहे. वळणावळणांचा घाट आहे आणि तीव्र उतार पण आहे.

 

उन्हामुळे आम्ही बऱ्यापैकी एक्झॉस्ट झालो होतो. घाटामध्ये वरून व्ह्यू बघत बघत आम्ही लिंबू सरबत आणि काकडी चा आस्वाद घेत दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेतली. आणि पुढील मार्गाला लागलो. पुढे पुढे आल्यावर साधारण आम्हाला कळले की आम्ही रस्ता चुकलो आहे आणि आम्ही खारेपाटणच्या दिशेला न जाता राजापूरच्या दिशेला चाललेलो आहोत. साधारण आम्ही वीस किलोमीटर पुढे आल्यावर आम्हाला कळले. आता परत फिरण्यात काहीही पॉईंट नव्हता म्हणून मग आम्ही जसे चाललो आहे त्याच दिशेने गेलो. पुढे गेल्यावर ओणी फाटा वरून राजापूरच्या दिशेला हायवेने निघालो.

दुपारचे तीन वाजले होते तिघांनाही भुका लागल्या होत्या. पण आता वाटत जेवायचं कुठे हा थोडा प्रश्न होता. पुढे जात असताना आम्हाला कोडवली येथे गुरुमाऊली नावाचे एक छान हॉटेल सापडले. उत्कृष्ट जेवण होते. टॉयलेट्स पण अतिशय क्लीन होते. त्यांची सर्विस पण बऱ्यापैकी फास्ट होती. जेवण करून साधारण एक दहा ते पंधरा मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो.

मुंबई गोवा हायवे सिमेंटचा होता आणि मोकळा ही होता त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी वेगाने जाता आले. सुमारे 110 किलोमीटर आम्हाला पुढे जायचे होते.

वेंगुर्ल्याच्या बस स्टॉप पर्यंत पोहोचायला साधारण आम्हाला साडेसहा वाजले. वेळ चहाची होती आणि वेळेला चहा हवाच म्हणून आम्ही वेंगुर्ला गावातच एका अमृततुल्यमध्ये चहा प्यायलो. तिथून साधारण आम्हाला आमच्या रिसॉर्ट वरती जायला एक ते सव्वा तास दाखवत होते. मी मॅप लावला आणि मी पुढे होतो. मॅप नाही आम्हाला जिथे नेले की महाराष्ट्र गोवा बॉर्डर वरती असलेला समुद्र होता. आणि तिथून पुढे काहीही नव्हतं. रिसॉर्ट वाल्याला फोन केल्यावर आम्हाला असं कळलं की मी पुन्हा एकदा रस्ता चुकलो आहोत. तेव्हा संध्याकाळच्या साडे सात वाजले होते. जरी रस्ता चुकलो होतो तरी रात्रीच्या वेळेस फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज वरती निरभ्र आकाश आणि लखलख करणाऱ्या चांदण्या हे सर्व बघून आमचा थकवा गेला आणि दहा मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही आमच्या रिसॉर्टला जायला निघालो. रिसॉर्ट ला पोचल्यावर असे कळले किती वेंगुर्ला बस स्टँड पासून फक्त पाच मिनिटांवरती आहे. असो चालायचेच पण त्या दिवशी दिवसभर बाईक राईड करून भरपूर मजा आली.

आता खरी आणि मोठी गंमत.

रिसॉर्टच्या पार्किंग मध्ये पोचल्यावर आम्हाला आधी कळलेच नाही की हेच पार्किंग आहे. आम्हाला वाटले अजून इथून पुढे जायचे आहे. मग काय समुद्राची वाळू दिसत असताना सुद्धा अमोघ ने गाडी घातली. असं वाटून की रिसॉर्टला जायचा तोच रस्ता आहे तिथे वाळू फार कमी असेल. पण समुद्राच्या किनाऱ्यावरती जेवढी वाळू असते ना साधारण त्याच्यापेक्षा थोडी जास्त वाळू तिथे होती. आणि गाडीची साधारण दोन्ही अर्धी चके आज रुतल्यावरती जाणवले की आता इथून गाडी पुढे जाणार नाही. तशी त्याने आठ दहा फूट गाडी आत पण नेली होती. आधीच आम्ही थकलेलो, त्याच्यात गाडी अडकलेली, रिसॉर्टवरची माणसे अर्धी झोपलेली, गाडीवरती भरपूर सामान, चैतन्यने त्याची गाडी पार्किंग मध्ये लावून अमोघ ची गाडी धरून ठेवली. मी आणि अमोघ तिघांच्या गाडीवरचा सामान घेऊन रूम मध्ये ठेवला. आणि तिथल्या लोकांना बोलावून आणले. मग सगळ्यांनी मिळून ती गाडी खड्ड्यातून आधी उचलली आणि मग मागे ओढत ओढत पूर्ण पार्किंग पर्यंत आणली. या सगळ्या प्रकाराला अर्धा तास गेला पण एक वेगळीच मजा अनुभवता आली.

रात्रीचे जेवण बरे होते खूप वाईटही नव्हते पण खूप चांगले पण नव्हते.

रूम आणि डायनिंग एरिया हा अगदी बीचला लागूनच होता. रूम फार मोठी नव्हती. म्हणजे जर का आमचा चौथा मेंबर पण आला असता तर मग आम्हाला नक्कीच दुसरी रूम घ्यावी लागली असती. आम्ही जेमतेम च्या रूम मध्ये तिघेजण अड्जस्ट करून राहिलो होतो. बाथरूम आणि टॉयलेट याविषयी न बोललेलं बरं.

 

जेवण करून झोपलो.

आणि आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये माझा उजवा हात म्हणजे तळहात हालेच ना बोट हलवायला गेलो की मनगट जाम दुखायचं. त्याच्या मागे कारण असं होतं की रायडींग करताना जे मी हात मोजे घातले होते ते खूप घट्ट होते आणि एक साईज ने कमी पण होते. बाईक चालवताना मला ते फार विशेष जाणवले नाही. पण जेव्हा आम्ही रूमवरती पोहोचलो तेव्हा माझा हात आलेच ना. म्हणजे माझी परिस्थिती इतकी वाईट होती की मला हातात चमचा सुद्धा धरता येत नव्हता अथवा जेवताना भाकरीचा घास सुद्धा तोडता येत नव्हता. आम्हाला तिघांनाही थोडं टेन्शन आलं होतं की मी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी गाडी कशी चालवणार. म्हणलं बघू सकाळी.

दिवस २:

दुसऱ्या दिवशी आम्ही फार काही प्लॅनिंग करून निघालो नाही की नक्की कुठे जाऊन थांबायचं. कुणकेश्वर चा मंदिर हे आधी बघायचं होतं आणि मग त्याच्यानंतर ठरवणार होतो की आपल्याकडे वेळ किती आहे त्याप्रमाणे आपण कुठे जाऊन राहू शकतो.

सकाळी रिसॉर्ट मधून निघताना साडेनऊ ची वेळ ठरवली होती पण निघता निघता आम्हाला अकरा वाजले. सगळं सामान गाडीला बांधून अकरा वाजता आम्ही फायनली निघालो. आमच्या रिसॉर्ट पासून कुणकेश्वर चे मंदिर साधारण शंभर किलोमीटर वरती होते.

आमचा जायचा रोड पूर्णपणे समुद्राच्या काठावरून असल्यामुळे ते  रस्ते छोटे होते, काही ठिकाणी रस्त्यांवर काम चालू होते, तर काही ठिकाणी खड्डे पण होते. संपूर्ण रस्ता अगदी खराब होता असं नव्हतं पण साधारण एक दहा पंधरा टक्के रस्ता बऱ्यापैकी खराब होता. त्यामुळे कुणकेश्वरच्या मंदिरात पोहोचायला आम्हाला उशीर झाला.

कुणकेश्वर चे मंदिर अतिशय सुंदर समुद्राच्या काठी वसलेले आहे.

येथे एक सरबते विकणारी टपरी होती तिच्या पाठीमागे आम्ही आमच्या तिन्ही बाईक्स सामानसहित लावल्या. कोकम सोडा पिऊन आम्ही दहा-पंधरा मिनिटं पूर्णपणे विश्रांती घेऊन तिथून निघालो. सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही पोट भरून केल्यामुळे दुपारी जेवणासाठी विशेष भूक नव्हती. थोडसं आम्ही ठरवलं की आपण मोठ्या प्रवास करण्याच्या ऐवजी रत्नागिरी अथवा वेळणेश्वर येथे राहू. जाता जाता ऑन द गो एखादं हॉटेल बघूयात कारण आम्ही अशीच ट्रीप प्लॅन केली होती की दुसऱ्या दिवशीचे हॉटेल बुक केले नव्हते आणि जाता जाता जे चांगले हॉटेल मिळेल तिथे राहणार होतो.

कुणकेश्वर मंदिरापासून आम्ही रत्नागिरी कडे जायचा रस्ता पकडला. रस्ता तोच जितका समुद्राच्या काठावरून जाता येईल तेवढा. शक्यतो आम्ही हायवे टाळत होतो कारण आम्हाला थोडं कोकणामध्ये फिरायचं पण होतं.

रत्नागिरीच्या रोडवर एका घाटामध्ये चैतन्याला साप दिसला… म्हणून आम्ही तिघे पटकन थांबलो पण तो त्या आवाजाने असावा अथवा गाडीच त्या व्हायब्रेशन मुळे असावा पटकन कुठेतरी झाडीत लपला आणि आम्हाला कोणालाच दिसला नाही. पाणी पिण्यासाठी म्हणून बॅग उघडायला गेलो तर मला असं कळलं की कुणकेश्वरच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न झालेला आहे. कारण माझ्या बॅगला लावलेली बंजी कॉर्ड गायब होती. मग अमोघ ने पण त्याची बॅग चेक केली असता त्याच्या बॅगेच्या चेन उघड्या होत्या. सुदैवाने चैतन्याच्या गाडीला कोणी हात लावलेला नव्हता. कोकणात असेही प्रकार होतत असा अनुभव आम्हाला पहिल्यांदाच आला.

पाणी पिऊन आम्ही रत्नागिरीचे प्रवासाला लागलो. अरे वारेच्या बीच वरती सुंदर नजारे बघून फोटो काढायची तीव्र इच्छा झाली आणि लगेच आम्ही तिघांनी गाड्या बाजूला घेऊन फोटो काढायला सुरुवात केली.

 

तिथे फोटो काढत असताना एक बाईक आली त्या बाईकवर एक कपल होतं…  असंच आमच्या सारखा रायडर. माझी दोन बॅगा लावून आणि तिच्या खांद्यावरती एक बॅग होती असे भरपूर सामान घेऊन ते दोघं मुंबईवरून गोव्याला गेले होते आणि फिरत फिरत ते आरेवारे बीच ला आम्हाला भेटले होते. छान वाटलं त्यांना भेटून. जवळपास ते बाईक वरती सात आठ दिवस फिरत होते.

फोटो काढून झाल्यावर आरेवारीच्या बीचच्या आजूबाजूला दोन-तीन हॉटेल्स बघितली पण आम्हाला जागा मिळाली नाही. हॉटेल शोधत असताना एका बीच वरच्या हॉटेलमध्ये चौकशी करायला गेलो असताना मला वाळूचा अंदाज आला नाही आणि गाडी वळवताना मी गाडी सकट खाली पडलो….

पुढे आम्ही रत्नागिरी मेन गावात पोहोचलो. साधारण वेळ होती चहाची आणि वेळेला चहा हवाच. 🙂 रत्नागिरीमध्ये केसर अमृततुल्य येथे आम्ही चहा प्यायला. चांगला तीन तीन कप चहा प्यायला. तिथे त्यांच्याकडची बरणीतली बिस्किट सुद्धा भरपूर खाल्ली. कारण आम्ही दुपारी कोणीच जेवलो नव्हतो भरपूर भूक लागली होती. पोटाला जरा बरं वाटलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो.

हॉटेल शोधत शोधत आम्ही गणपतीपुळेपर्यंत आलो. गणपतीपुळेच्या मंदिराच्या चेक पोस्ट सारख्या जागेच्या इथे आम्हाला एक एजंट भेटला आणि त्याने आम्हाला एका हॉटेलमध्ये जागा मिळवून दिली. हॉटेलचे नाव होते अतिथी. मंदिराच्या अगदी समोर. रूम मोठी होती, हॉटेल फार छान नव्हते पण अगदी वाईट पण नव्हते.

तिथे आस्वाद हॉटेल मधून जेवण मागवायची सो मगवयची सोय होती.  जेवण चांगले होते. जेवण करून थोड्या गप्पा मारून आणि तिसऱ्या दिवशीचा प्लॅन ठरवून झोपलो.

दिवस ३:

सकाळी आम्ही जरा निवांत निघायचा ठरवलं होतं. आस्वाद हॉटेलमधील जेवण चांगले होते म्हणून आम्ही ब्रेकफास्ट ला पण तिथेच जायचंय ठरवले. आंघोळी करून सगळं आवरून आम्ही हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट झाल्यावर सगळा सामान गाडीला बांधून पुढे कसं जायचं याचा एक कच्चा प्लॅन बनवला आणि साधारण अकरा वाजता आम्ही निघालो. आम्ही गणपतीपुळे ते जयगड असे गेलो. तिथून जेट्टीचा प्रवास करायचा होता. तिथे पोचल्यावर जेट्टी साधारण एक तासाने होती. मग तिथेच थोडा वेळ टाईमपास करत बसलो होतो. ऊन भरपूर होते अंगावरती जॅकेट जीनची पॅन्ट हेल्मेट या सगळ्यामुळे भरपूर घाम येत होता त्यामुळे पाणी पण भरपूर लागत होते. तिथे आडोशाला अशी कुठेच जागा नव्हती की जिकडे सावली मिळेल आणि तिघेही उन्हातच उभे होतो. जेट्टी आल्यावर तिघांनी गाड्या त्याच्यात टाकून जेट्टीत थोडीशी जिथे सावली होती अशा जागेवर जाऊन आम्ही तिघे उभे राहिलो. प्रवास जेमतेम पंधरा-वीस मिनिटं फार नाही.

जेट्टी मधून उतरून आम्ही गुहागर मार्गे दाभोळला जायचे ठरवले होते.

सर्वांना भुका लागल्या होत्या पण आम्ही ठरवलं की शक्यतो दाभोळ किंवा दापोली या साईडला जाऊन जेवूयात म्हणजे आपण जास्तीत जास्त अंतर कापूयात. ठरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्यांदा पुन्हा जेट्टि ने प्रवास केला.

दाभोळ ला उतरल्यावर तेथे एक दोन खानावळी होत्या. चांगल्या असतीलही कदाचित पण आम्ही काही गेलो नाही. वीस पंचवीस किलोमीटर वरती दापोली आहे तिथेच जाऊन बघू असे निर्णय घेऊन पुढच्या प्रवासाला लागलो. आम्ही तहानलेले भुकेले थकलेले होतो त्यामुळे जितक्या लवकर दापोलीला पोचता येईल तितक्या लवकर पोहोचू असे मनातल्या मनात ठरवून आम्ही बऱ्यापैकी जोरात गाड्या चालवत होतो. एक वेळ अशी आली की एक मोठा स्पीड ब्रेकर आला. माझ्यापुढे चैतन्य होता मध्ये मी होतो आणि माझ्या मागे अमोघ होता. त्या मोठ्या स्पीड ब्रेकर वर आधी चैतन्याची गाडी बऱ्यापैकी उंच उडाली. ते मी बघितलं पण ब्रेक मारावा का नाही हा विचार करत असतानाच माझी पण गाडी उडाली. मला वाटलं अमोघ ब्रेक मारून थोडा स्लो होईल म्हणून मी आरशात बघितलं पण जेव्हा आरशात बघितलं तेव्हा तो हवेतच होता. म्हणजे आम्हाला दापोलीला पोहोचायची एवढी घाई होती, हे साधारण आम्हाला तिघांना जाणवलं पण कोणीच एकमेकांना बोललं नाही.

दापोलीच्या मेन चौकात वृंदावन नावाचं व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे आम्ही ती घरी तिथेच जेवलो. एक नक्की सांगतो तुम्ही स्पेशल जेवणासाठी जर वृंदावनला जाणार असाल तर अजिबात जाऊ नका अतिशय भंगार जेवण होतं. चिकन मात्र तेवढं चांगलं होतं. दापोली मध्ये जर का तुम्हाला कुठेच काही खायला मिळालं नाही तरच वृंदावन मध्ये जा अन्यथा जाऊ नका.

उमेश पान शॉप इथे आम्ही पान खाऊन पुढील प्रवासाला निघालो. दापोलीतून निघताना साधारण पाच वाजले होते. एक अंदाज नक्की आला होता की समजा आम्ही वरंध घाटातून आलो अथवा ताम्हिणी घाटातून आलो तरी आम्हाला दोन्ही घाटांमध्ये अंधार हा होणारच होता.

याच्यात माझे म्हणणे होते की आपण वरंधा घाटामधून जाऊ. चैतन्य आणि अमोघ यांचे म्हणणे होते की आपण ताम्हिणी घाटातून जाऊ. हो नाही हो नाही करता करता आम्ही टॉस केला आणि वरंध घाटातून जायचा निर्णय झाला.

दापोली वरून लाटवण मार्गे महाडच्या फाटा वरती येऊन थांबलो. त्याच्या जरा पाणी पितच होतो. आम्हाला आदल्या दिवशी जे जोडपं बाईक वरती फिरत होतं ते त्या स्पॉटला येऊन पुन्हा भेटले. आणि ते भेटायचं पाच मिनिटं आधीच आम्ही त्यांच्याच विषयी बोलत होतो की ते कसे फिरतात किती दिवस फिरत असतात मजा करतात. हे सर्व बोलत असतानाच ते दोघे स्वतःहून येऊन थांबले. दोन-चार मिनिटे गप्पा मारले आणि ते दोघं आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजे मुंबईला निघाले. ते गेल्यावर आम्ही पण पाच मिनिटात निघालोच.

महाड फाट्याला टर्न घेतल्यावर आम्ही महाड गावात गेलो नाही आम्ही एमआयडीसी च्या मार्गाने वरंध घाटाला जायचा निर्णय घेतला.

साधारण 25 ते 30 किलोमीटरचा पॅच इतका खराब होता आणि रस्त्याचे कामही चालू होते त्यामुळे धूर धूर याने आम्ही अक्षरशः वैतागून गेलो.

पुढे पवार हॉटेलला थांबल्यावर या दोघांनी मला इतक्या शिव्या घातल्यात हे काही विचारू नका.

त्यादिवशी रात्री घाटात एक नक्की कळाले की तुमच्या बाईक कितीही भारी असतील तरी त्यांना हेडलाईट एवढे घाणेरडे का देतात हे फक्त कंपनीच सांगू शकते. आम्हाला एवढा प्रॉब्लेम येत होता की आम्हाला कितीही मोकळा रस्ता असला तरीही वेगाने जाताच येत नव्हते. कारण पुढे खड्डा आहे का वळण आहे याचा अंदाज पटकन येत नव्हता कारण गाडींचे लाईट फार काही चांगले नव्हते.

हळूहळू प्रवास करत आम्ही शिरवळ फाट्यावरून हायवे लागलो आणि टोल क्रॉस करून शेवटचा ब्रेक घेतला. तिथून आम्ही तिघेही वेगळे झालो आणि आपापल्या घरच्या प्रवासाला लागलो.

Related Articles

2 Comments

  1. Very nice written up. Moreover this experience will act as guide for the readers . But driving speed is very risky. Hope this comment will be taken positively.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}