
*ब्राह्मण क्रिकेट लिग २०२५ ( सिझन २ )*
AGA मॅनेजमेंट च्या पुढाकाराने पुण्यातील ब्राह्मण क्रिकेट लिग सिझन २ ची सुरुवात दि. ११ जानेवारी पासून होत आहे. पुण्यातील विविध ग्राउंड्स खेळली जाणाऱ्या या लिग स्पर्धेत
*वाशिष्टी ब्राह्मण युनिटी फाउंडेशन*,
*गंगा सुपर किंग्स*,
*नर्मदा राईडर्स*,
*शरयू योद्धा*,
*रावी रॉयल ईगल्स*,
*मुठा सह्याद्री शिलेदार*,
*बिअस ब्रावोस*,
*कृष्णा लिजेण्ड्स*,
*इंडस सुपर हिरोज*,
*ब्रह्मपुत्रा वॉरिअर्स* अश्या १० संघांनी सहभाग घेतला आहे. पुणे आणि इतर शहरामधून १८० क्रिकेट खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. ब्राह्मण समाजातील खेळाडूंचे कौशल्य पुढे आणणे हा या स्पर्धेमागील हेतू आयोजक गिरीश ओक, आदित्य पाळंदे, अमित उमरीकर यांनी स्पष्ट करताना शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सेवाभवन हॉल येथे पुण्यातील जुन्या आणि यशस्वी रणजी पटू खेळाडूंच्या हस्ते स्पर्धेच्या करंडकाचे आणि खेळाडूंच्या टि शर्ट्स चे अनावरण झाले. कटारिया स्कूल, ब्रिलियन्ट अकॅडेमी ( येवलेवाडी ) आणि प्लॅटिनम अकॅडेमी ( केसनंद ) येथे ११ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा आयोजित होत आहे, आणि या संपूर्ण स्पर्धेचे Youtube Live प्रसारण होणार आहे.
ब्राह्मण क्रिकेट लिग २०२५ – सिझन २
बहुचर्चित ब्राह्मण क्रिकेट लिग, सिझन २ उद्या दि. ११ जानेवारी पासून सुरू होत आहे.
अमित पाळंदे, अमित उमरीकर आणि गिरीश ओक (AGA Management ) या आयोजकां तर्फे या ब्राह्मण क्रिकेट लिग चे हे सलग दुसरे वर्ष आहे.
कटारिया हायस्कूल वर उद्या सकाळी ९ वाजता *गंगा सुपर किंग्स विरुद्ध वाशिष्टी ब्राह्मण युनिटी फाउंडेशन* या सामन्याने या स्पर्धेची सुरवात होईल.
एकूण १० संघ या स्पर्धेत सहभागी असून, १८० ब्राह्मण क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळणार आहेत.
सर्व आयोजकांना आणि सर्व सहभागी संघाना या क्रिकेट टूर्नामेंट साठी अनेक शुभेच्छा !
*टिम – ब्राह्मण युनिटी फाउंडेशन
*जय श्री परशुराम 🙏🏻*