डीव्हीडी कॉर्नर — आजची खुश खबर डीव्हीडी ( डॉ विभा देशपांडे )
..... सांगणार दर महिन्यातून दोनदा

चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
अशोक सराफ (जन्म 4 जून 1947) हे एक भारतीय – महाराष्ट्रीय अभिनेते आणि विनोदी नट आहेत , जे मराठी आणि हिंदी चित्रपटांसह दोन्ही भाषांमधील थिएटरमध्ये काम करण्यासाठी ओळखले जातात . सराफ यांना अकरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मराठीसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील महानायक (साहित्य ’श्रेष्ठ अभिनेता’), अशोक सम्राट किंवा मामा असे संबोधले जाते.
2016 मध्ये त्यांना मराठी चित्रपटातील योगदानाबद्दल फिल्मफेअर मराठी जीवनगौरव पुरस्कार मिळाला. 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला. २०२५ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, भारतातील चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.
यावर अशोक सराफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर आता लगेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे मला जास्तच आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली. पुढे ते असेही म्हणाले, जे काम करतोय त्यासाठी आपल्याला काहीतरी मिळावं अशी माझी इच्छा होती, पण इतकं मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. मी कलाकार म्हणून पहिल्यांदा रंगभूमीवर तयार झालो. रंगभूमीवरून मी एक एक पायऱ्या चढून वरती गेलो आणि आता पद्मश्रीकडे येऊन थांबलोय, असंही अशोक सराफ म्हणाले. मराठी कलाविश्वात अनेक प्रतिभावान कलाकार आहेत त्यांची कमी नाही. त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. वेगळेपण जपलं पाहिजे, असं म्हणत अशोक सराफ यांनी कलकारांना मोलाचा सल्ला दिला. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या दृष्टीने पद्मश्री पुरस्काराचे मोठं महत्त्व आहे. आम्ही इतक्या वर्षांपासून मेहनत केली, प्रेक्षकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलाय त्याचं आता भारत सरकारकडून शिक्का बसला, त्यामुळे मी सरकारचा ऋणी असल्याचे म्हणत अशोक सराफ यांनी आभार मानले.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी, गझल गायक पंकज उधास यांना सन २०२५साठीचा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. याशिवाय पद्मश्री पुरस्कारांमध्ये अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई आदींचा समावेश आहे.ज्येष्ठ कलाकार शेखर कपूर यांना पद्मभूषण, तर गायक अरिजीत सिंह यांना पद्मश्री जाहीर झाला. पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये मारुती सुझुकीच्या माध्यमातून भारतातील मध्यमवर्गीयांचे चारचाकी गाडी खरेदी करण्याचे स्वप्न साकार करणारे सुझुकी मोटारवाहन उद्योगाचे संस्थापक ओसामू सुझुकी, विख्यात साहित्यिक एम. टी. वासुदेवन नायर, प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा, निवृत्त सरन्यायाधीश जगदीशसिंह खेहर, कला क्षेत्रातील कुमुदिनी लाखीया व लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांचा समावेश आहे. साध्वी ऋतंबरा, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
https://www.tv9marathi.com/videos/ashok-saraf-first-reaction-after-padma-shri-award-was-announced-1339970.html
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर डीव्हीडी
( डॉ विभा देशपांडे )