
पुणे नाशिक
पाच जानेवारी 2025
आज सकाळी यावर्षीच्या पहिल्या टूरचा प्रारंभ केला आहे , मध्य प्रदेश- हा या टूरचा विषय
उप्प्या ची भटकंती https://uppendse.blogspot.com/2025/03/day-1.html
राजे महाराजे, त्यांचे मोठे मोठे राजवाडे, हवेल्या किल्ले ऐतिहासिक मंदिरे शिल्प आणि पुराण कथा स्थाने आणि मध्य प्रदेश मधले दोन व्याघ्र प्रकल्प असा मिक्स अँड मॅच ट्रिपचा प्रोग्राम राहणार आहे
सकाळी सव्वा पाच ला पुण्याहून निघून पावणेदहाला नाशिक मध्ये आधी हॉटेलला, रामा हेरिटेज ला चेक इन केलं , सकाळी निघतांना कडक थंडी 13 deg आणि मिसळ खाऊन बाहेर पडे पर्यंत कडक उन , चक्क गरम होत होते
सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे नाशिक मधल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना भेटायला आणि त्यांच्याबरोबर ग्रेप एम्बसी अशा नावाची इथे एक जबरदस्त चुलीवरची मिसळ मिळते की जिथे असे हजारो लोक संडेला मिसळ खायला येतात आणि तितकेच मोठी जागा आहे
……. तर तिथे आम्ही सगळ्यांनी मिसळ खाल्ली साडेदहाला तिथे होतो आम्ही साडेदहा ते एक, असे अडीच तास मिसळ खात गप्पा मारल्या , चिक्कार धमाल केली , विसळीची चवही अप्रतिम मिसळी बरोबर पापड ,त्याच्यानंतर ताक, त्याच्यावर गरम गरम तुपातल्या तळलेल्या जिलब्या आणि त्याचबरोबर त्या ग्रेप इस्टेट मधली द्राक्षाच्या केलेल्या मनुका , असे चार पाच गोष्टी एकत्र करून अडीच तास आम्ही मस्त धमाल केली टेस्ट मात्र खूपच छान जेव्हा
कधी नाशिकला याल तेव्हा ग्रेप एम्बसीला व्हिजिट करायला विसरू नका
त्यानंतर ग्रेप एम्बसी मधून मिसळ खाल्ल्यानंतर, आम्ही त्रंबकेश्वर ला गेलो महादेवाचे ज्योतिर्लिंग दर्शन केलं त्या आधी वाटेत हनुमंत जन्म स्थान , अंजनेरी , पाहिले …. त्र्यंबकेश्वर येथे आता नवीन आणखी एक शेगावच्या धरतीवर इथे प्रति शेगाव म्हणून एक सुंदर मंदिर आणि आश्रम एरिया असा त्यांनी केला आहे तो पण खूप छान आहे
त्र्यंबकेश्वरला पार्किंग हा एक मोठा विषय झालेला आहे आणि त्याच्याच बरोबर पार्किंगचे वेगवेगळे स्लॉट्स आणि वाटेल ती पार्किंग प्राईज म्हणजे पन्नास रुपयापासून पब्लिक पार्किंग ते 200 रुपयापर्यंत pvt पार्किंग, वाटेल ते पार्किंग, त्यामुळे थोडी चिडचिड झाली , महादेव च स्वतः लक्ष घालतील आता इतका उतमात होत आहे आणि गरम होते चक्क, उन्हामध्ये चालत गेलो मंदिराचे दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतलं
त्यानंतर दुपारी आमच्या एका स्नेहींच्या घरी गप्पा मारल्या खूप वेळ आणि पावणे पाच पाच वाजता आम्ही सीता गुंफा, त्याच्यानंतर काळाराम मंदिर , त्यानंतर गोरे राम मंदिर असे बघून संध्याकाळी सात वाजता गोदावरी नदी ज्याला इथे लोक गंगा म्हणतात , त्या गंगेची आरती करायला आणि बघायला आम्ही गंगा घाटावरती पंचवटी येथे गेलो नाशिक मध्ये जेव्हा पूर येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना फोटो किंवा व्हिडिओ दाखवतात तो दुतोंड्या मारुती हा तो भाग ,
पंचवटीचा . जिथे इस्कॉन ची एक आरती असते आणि एक पुरोहित संघाची आरती असते अशा दोन्ही आरत्या जवळपास सारख्या वेळेला सुरू होतात, गोंधळ असतो थोडा , पण सुंदर आरत्या असतात , ओवळणे असते आणि दोन्ही आरतीचा लाभ घेऊन आम्ही आमच्या हॉटेलला आता परत आलेलो आहोत आणि उद्याची थोडीशी तयारी करून उद्या सकाळी मोठा प्रवास आहे नाशिक पासून इंदोर जवळपास साडेचारशे किलोमीटर आणि ६ ७ तास मला उद्या गाडी चालवायची आहे , त्याच्यामुळे आज लवकर रात्री, retiring early . आणि सकाळी फ्रेश , ब्रेकफास्ट करून साडेसात पर्यंत /आठ पर्यंत इथून निघून दुपारी चार पर्यंत पोहोचायचा प्लॅन आहे
गुड नाईट एव्हरीवन आज नाशिक मध्ये कण भर पण थंडी नाही
पहिला दिवस इथेच संपवतो.
खूप छान
खूप मस्त