इंदोर उज्जैन

इंदोर उज्जैन
उप्प्या ची भटकंती https://uppendse.blogspot.com/2025/03/day-2.html
सकाळी प्रचंड थंडी होती. घर cozy असल्याने आतमध्ये आम्ही एकदम कंफर्टेबल होतो. सकाळी त्यांच्या टॉम नावाच्या बोक्या बरोबर खेळून झाल्यावर मग आवरायला घेतले .. इडली चटणी ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही त्यांचा निरोप घेऊन उज्जैन महाकाल नगरी कडे निघालो उशिराच निघालो आणि फारच थोडा प्रवास फक्त 54 किमी
वाटेत उज्जैन च्या चार किलोमीटर आधी शनी मंदिर आणि नवग्रह मंदिर आहे.. फार छान जागा आहे आम्ही शनी दर्शन घेतले नवग्रह पूजा केली शनी ची दृष्टी डायरेक्ट नको म्हणून तिरक्या रेषेत दर्शन घ्यावे …
तिथून शिप्रा रेसिडेन्सी म्हणून MPT चे सुंदर भव्य हॉटेल आहे तिथे चेक इन केले आणि फिरायला बाहेर पडलो
संदीपनी ऋषी आश्रम आणि वेद शाळा
श्री कृष्ण बलराम आणि सुदामा यांची शाळा 14 विद्या शिकलेले हे तिन्ही संदीपनी
पुराण
मीमांसा लॉजिक तर्क
कल्प धर्म शास्त्र
निरुक्त
ज्योतिष
व्याकरण
छंद शास्त्र
शिक्षण
आयुर्वेद प्रधान
संगीत प्रधान
यज्ञ प्रधान
अश्या 14 विद्या शिकेलेले बलराम सुदामा आणि श्री कृष्ण
84 बैठक पण आहेत, वल्लभाचार्य यांच्या. भारत भर जिथे जिथे स्थाने आहेत ती ही 84 जागा. त्यांनाच बैठक म्हणतात
चित्रगुप्त मंदिर , अकृरेश्वर महादेव , राम जानकी मंदिर , कुसुमेश्वर महादेव विष्णुजनार्दन मंदिर अशी अत्यंत प्राचीन मंदिरे पण आहेत
चित्रगुप्ता ला आपले सर्वांचे अकाउंट नीट ठेवायला डेबिट क्रेडिट साठी सांगून आलो…
आणि उज्जैन मध्ये कोअर गावात स्कूटर ,बाईक च् जातील असे लहान रस्ते आहेत आणि प्रचंड गर्दी ज्योतिर्लिंग मंदिरे असल्यामुळे .. आम्ही e रिक्षा ने गेलो आणि मकर संक्रांत असल्याने शेकडो दुकाने पतंगाची लागली होती आणि त्यातून हजारो लोक पतंग मांजा फिरक्या खरेदी करत होते .. प्रचंड हॉर्न बाजी चालते इथे एकाने वाजवले की दुसरा तिसरा आणि एकदम कल्लोळ होतो. आणि मग जॅम पण आणि समोरून पण horns … काही स्कूटर अगदी रिक्षा च्याच बाजूला येऊन जोरात हॉर्न वाजवून जायला रस्ता द्या म्हणून चलो चलो तोंडाने ही ओरडायचे..
E रिक्षा चालक एकदम skilled. त्याची गाडी कुणालाही लागली नाही का त्याला एकही गाडी टच नाही केली
आपल्या पुण्याहून भयानक प्रकारे गाड्या चालवतात इथे
आज जीवाचे उज्जैन करणार असेच फिरत होतो
आज हवा अशी होती की जॅकेट उन्हात ही हवेहवेसे वाटत होते 21 22 deg .. आणि वारा त्यामुळे गार गार वाटत होते..
थोडे उशिरा जेवून , थोडा आराम करून महाकाल कॉम्प्लेक्स दर्शन घ्यायला निघालो
क्षिप्रा नदीवर बांधण्यात आलेले हे कॉम्प्लेक्स संपूर्ण एरिया ची शोभा वाढवायला मदतच करत आहे परिसर अत्यंत स्वच्छ .. आणि संध्याकाळी लाईट ने एक अनोखी दुनिया च वाटते ..
महाकाल दर्शनाला लाईन फारच कमी होती अगदी आरामात दर्शन झाले
शनिवार रविवार सोमवार सोडून या ठिकाणी यावे बरेच सोयीचे होईल दर्शन
तिथेच एक नवीन सोय दुर्लभ दर्शन म्हणून डिजिटल दर्शन
.जगाच्या निर्मितीपासून महादेवाचे महत्त्व आणि अनासक्ती पासून नटलेले महादेव नी पुन्हा मूळ अनासक्त रूप याचे संपूर्ण विवेचन दर्शन आणि माहिती 9 मिनिटात आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून फार छान पद्धतीने समोर पाहता येते आम्ही त्याचा लाभ घेतला
नंतर दर्शन आणि प्रसाद घेतला , आणि बाहेर फिरत फिरत बडे गणेश आणि हरसिद्धी माता मंदिर सुद्धा पाहिले , आरती मिळाली इथे
रात्री या महाकाल नगरी मध्ये फिरण्याची मज्जाच आहे .. सर्व भावर्थी जय महाकाल म्हणून जयजयकार करत असतात आणि तसाच रिस्पॉन्स त्यांना सगळ्या बाजूने मिळत राहतो
चालत बाहेर यायला बरेच चालावे लागते आणि e रिक्षा म्हणजे इथली गंमत च, सुळकन सुरू होतात आवाज न करता आणि इतक्या छोट्या छोट्या जागेतून घुसतात आणि समोरचे येणारा माणूस आपल्या मांडीवर येऊन बसतो की काय असे च सर्वांचे चालवणे पण कुठे की touch नाही का आरडाओरडा नाही.. सगळे कडे मस्त e routine सारखे
छान शहर आहे छोटेसे पण स्वच्छ आहे , बोर्ड आहेत सगळी कडे आणि सर्व माणसे अत्यंत आनंदाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतात
ओव्हर ऑल आवडले शहर उज्जैन आणि त्या च बरोबर अप्रतिम असे महकालेश्र्वर दर्शन
आता उद्या शिवपुरी महाल इतिहास आणि राजे राजवाडे हवेल्या किल्ले ऐतिहासिक परंपरा अशी ट्रीप
लै भारी!