देश विदेश

उज्जैन ते शिवपुरी

उज्जैन ते शिवपुरी

उप्प्या ची भटकंती https://uppendse.blogspot.com/2025/03/blog-post_7.html

खूप फिरलो ना आदल्या दिवशी  त्यामुळे छान झोप लागली सकाळी MPT क्षिप्रा रेसिडेन्सी मध्ये ६ वाजता सहा डिग्री सेल्सिअस तापमान होते क ड क थंडी ….  एकदम कुडकुड च

पण रूम फार छान च होती तितकीच वॉर्म पण त्यामुळे आवरायला काही त्रास नाही झाला ..  ब्रेकफास्ट म्हणजे ट्रीट च , फ्रूट  ब्रेड साधा आणि व्हीट ब्रेड पण जॅम आणि चटणी .गरम करायला ऑप्शन , बाजुला बेसन धिरडे , इडली सांबार ,  इंदुरी पोहे पुरी भाजी  आणि  उपमा  व नंतर चहा   कॉफी

सगळे टेस्ट केले आणि सगळ्यांवर ताव पण मारला ..

साडे आठ ला निघालो  आणि गूगल map लावून उज्जैन नगरी सोडली ती शिवपुरी च्या दिशेने

रोड अप्रतिम  जरा पण त्रास नाही  थोड्या वेळाने नॅशनल हायवे लागला मुंबई आग्रा मग काय आम्ही गाडीचे विमान च केले

वाटेत धुके बरेच होते ११ पर्यंत , धुक्यात ला सूर्य चंद्र सारखा… च दिसत होता आणि

धुक्यात पवन चक्की ही खाली बेस नसल्या सारखीच केवळ मधला भाग आणि पाती

आत्मा , हा एक भारी प्रकार सारखा समोर येत होता , हे नाव मनाली ने ठेवले आहे,  नवीन ट्रक  डिलिव्हरी करायला चाललेले,  ट्रक ड्रायव्हर त्यांच्या साठी  छोटी जागा बसायला  हुड , आणि केबिन  वगैरे नाही तर नुसताच ओपन चासी , त्या मागे बॉडी नाहीच म्हणून त्याला आम्ही आत्मा असे च नाव दिले फक्त इंजिन हृदय आत्मा  आहे  बॉडी नाही,  refer photo

 

मोहोरी , सरसो शेती मस्त फुललेली हिरवी  झुडुपे आणि पिवळी धम्मक फुले . एकदम तुझे देखा तो ये जाना सनम…  राज आणि सिमरन चां पंजाब च समोर आला.

मजल दरमजल करत ,  पेरू खाऊन, वाटेत चहा बिस्किटे आणि वेफर्स खात आम्ही शिवपुरी येथे पोहोचलो

काय डोंगर काय झाडी म्हणतात ना तसे काय रिसॉर्ट आणि काय रूम   , आहाहा !!! , अप्रतिम  .. आणि जागा पण काय मस्त. पाण्याशेजारी च , थंड हवेचे ठिकाण असल्यागत एकदम classic आणि एपिक.

दोन सव्वा दोन वाजता ३५१ किमी प्रवास करून आम्ही  जरा पण न दमता रिसॉर्ट वर पोहोचलो

प्रि booked असल्याने रूम लगेच ताब्यात आणि आम्ही बॅग्स टाकून आधी साईट seeing ला पळलो कारण रात्री थंडी खूप होईल असा अंदाज होता आणि खराच ठरला आता हे लिहितांना १० deg temp आहे

माधव नॅशनल पार्क  जंगल सफारी साठी

चार च्या आधी “इन” व्हावे लागते पण आज बुधवार आणि नवीन वर्षात आलेल्या रुल प्रमाणे आज पार्क बंद..

आणि त्याच बरोबर ज्योतिरादित्य सिंधिया यांची visit पण. सगळे चकाचक  आणि आपल्या भाषेत बंदोबस्त पुरा .त्यामुळे एकदम सेफ सिटी आहे आज शिवपुरी

लोकल लोकांना  ही माहीत नसलेले  तात्या टोपे  समाधी स्थळ स्मारक सर्वात आधी बघून  घेतले   आपल्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण खुणा , हे इथे कोणी सांगत नाही दाखवत नाही, त्याच समोर कैला देवी मंदिर  आहे ते येथील लोकांचे श्रद्धा स्थान  ,दोन्ही दर्शन घेतले , बाहेरच एक गाय आणि छोटे पिल्लू पण होते , एकदम क्यूट (refer photo)

       

पुरातत्व विभागाचे संग्रहालय पण भारी च पण पाहून अत्यंत राग येतो , मुसलमान रुलर्स चां , सर्व मूर्ती भग्न आणि विकृत स्वरूपात आहेत . ( Thats why not shown  pic)

छत्री .. माधवराव सिंदिया यांच्या वाड- वडिलांनी महाराज असताना प्रचंड मोठे कॉम्प्लेक्स संपूर्ण बांधून ठेवलेले आहे त्यात मोर आहेत कारंजे आहेत तळी आहेत मंदिर मशीद पण आहेत .. राजवाडा आणि  त्याचे दरवाजे तर चांदी चे आहेत २०० २०० किलो चे  .. त्याच बरोबर अत्यंत आकर्षक मजबूत पण transparent असे मार्बल आणि त्यातील जडवून ठेवलेली रत्ने हा खूप मोठा ठेवा आहे याच छत्री मध्ये

                                               

बाणगंगा मंदिर आणि त्यात कृष्ण महादेव श्रीराम हनुमान गणपती आणि देवी अश्या सर्व देवांची मंदिरे आणि बाजूलाच  सती अनसूया माता मंदिर आणि त्यात लक्ष्मी , सरस्वती आणि पार्वती यांच्या मूर्ती आणि ब्रह्मा विष्णू महेश बाल रुपात पाळण्यात .. फार छान मंदिर आहे

ते पाहून  भदैय्या कुंड ह्या MPT रिसॉर्ट ला लागून च आहे ते पाहून रिसॉर्ट मध्ये आलो..

रिसॉर्ट च सर्वात छान आहे

काय जागा ( पाण्याला लागून)

काय रिसॉर्ट ( पॉश क्लीन आणि अप to date)

काय  बंगला ( वेल appointed रूम्स आणि लॅण्डस्केप आणि लायटिंग)

आणि काय थंडी( अरेरे ते  अबब पासून ते आता कुडकुड पर्यंत पोहोचली आहे) 6 Deg

आता retiring for the day

उद्या महाराज आणि फोर्ट ऑफ ग्वाल्हेर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}