देश विदेश

शिवपुरी ते ग्वाल्हेर 

शिवपुरी ते ग्वाल्हेर

शिवपुरी हून निघतांना भदैया कुंड बघायचे, पाण्याच्या दोन वेगवेगळ्या धारा  आणि त्या खाली मधोमध शिवलिंग असे अत्यंत पुराण काळातील एक सुंदर जागा , मोरांचा केकारव, पोपटांची पोपट पंची आणि माकडांचे चित्कार याने ती जागा भरून राहिली होती  शिवलिंगाचे दर्शन लांबून च घेतले कारण तिथे जाणे मनाई होती पुरातत्व खात्याचे बोर्ड होते ओल्ड आणि धोकादायक जागा म्हणून .. र ते MPT टुरिस्ट गेस्ट हाऊस ला लागूनच असल्याने सकाळी बाहेर पडलो आणि ते पाहूनच ग्वाल्हेर कडे  कूच केले तात्या टोपे आणि  झांसी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या  भागात असल्याने “निघालो” असे लीहिण्या ऐवजी “कूच केले” .. एक संग्राम असल्या सारखं …आणि आज ग्वाल्हेर मध्ये तसाच संग्राम  झालाच …

 

 

सांगतो…..

शिवपुरी ते ग्वाल्हेर MPT तानसेन रेजन्सी काहीही प्रॉब्लेम न येता छान व्यवस्थित प्रवास पर पडला, ८० ८५ च्या स्पीड ने  एकदम ओक्के मध्ये ग्वाल्हेर गाठले , म्हणजे त्या भाषेत आमचे ग्वाल्हेर मध्ये आगमन झाले

ग्वाल्हेर मध्ये  थेट धडकलो आणि तानसेन  रेजेन्सी मध्ये चेक इन केले.. आणि फिरायला बाहेर पडलो

पहिलं ठिकाण

जय विलास पॅलेस .. जगातला अप्रतिम ठेवा इथे आहे असेच वाटते पाहून आल्यावर.. सींदिया खानदानाच्या  इतिहासाचे साक्षीदार असलेला हा पॅलेस ..असंख्य आठवणी आणि अगणित  वस्तूंचा खजिना

संपूर्ण सिंदीया कुटुंब म्हणजे राजवैभवात तुडुंब भरलेले तळे असते ना त्यात पूर्ण डुंबणारे.. आपल्या भाषेत सगळे जण कढईत बसून बोटे पण पूर्ण माखून बसलेली .. इतकी श्रीमंती थाट होता एकेकाचा

काही फोटो वरून दिसेलच

 

The train serving wine and whisky to guest across 150 sittings

T

 

 

 

 

 

 

 

सांगायचे झाले तर ..

जय विलास पॅलेस हा युरोपियन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. हे लेफ्टनंट कर्नल सर मायकेल फिलोस (१८३२-१९२५) यांनी डिझाइन आणि बांधले होते,  हा राजवाडा मुघल आणि मेडिसी यांच्या वास्तुशैलीचा मिलाप आहे. हे स्थापत्य शैलीचे संयोजन आहे, पहिला मजला टस्कन, दुसरा इटालियन-डोरिक आणि तिसरा कोरिंथियन आहे. पॅलेसचे क्षेत्रफळ सव्वा लाख sq  ft आहे आणि ते त्याच्या मोठ्या दरबार हॉलसाठी ओळखले जाते. दरबार हॉलचा आतील भाग चांदी आणि सोन्याच्या धातूने सजलेला आहे आणि मोठ्या गालिचा आणि अवाढव्य झुंबरांनी सजलेला आहे. हे 30 मीटर (100 फूट) लांब, 15 मीटर (50 फूट) रुंद आणि 12 मीटर (41 फूट) उंचीचे आहे आणि असे दोन झुंबर टोटल वजन तीस टन .एका हुक वर कित्येक वर्ष राहिलेली आहेत ह्या हॉल मध्ये ५७० किलो सोने वापरलेले आहे आणि आज ते तसेच आहे

This Mahal even today as 570 Kilo Gold on ceilings and pillars tops and bottom

 

अखंड गालीच्या पण तसाच आहे  आणि जेवणासाठी पंगत , टेबल बैठक व्हेज वेगळे नॉन व्हेज वेगळे आणि त्या मध्ये मद्य वाईन साठी अशी प्रत्येकी दीडशे लोकांची  x ४ बैठका ..आणि मद्य किंवा  वाईन सर्व्ह करायला झुकझुक गाडी आहे त्यावर बाटल्या आणि ग्लास लोडेड असतात.

असामान्य वस्तूंनी अनेक खोल्या पूर्ण भरलेल्या आहेत  काचेचे फर्निचर,  उंची लाकडाचे वेगवेगळे फर्निचर  , भरलेले वाघ , बायसन आणि स्वतःच्या बोटीसह फक्त महिलांसाठी असलेला स्विमिंग पूल. कॅव्हर्नस डायनिंग रूम पीस , एक मॉडेल चांदीची ट्रेन जी रात्रीच्या जेवणानंतर ब्रँडी आणि टेबलाभोवती सिगार घेऊन जाते.  पाश्चिमात्य शैलीच्या जेवणाच्या खोलीच्या विरूद्ध, पूर्णपणे भारतीय शैलीतील जेवणाचे खोली देखील जतन केले गेले आहे

मेणे पालख्या अंबाऱ्या  शस्त्र हत्यारे बंदुका तोफा तलवारी  आणि ढाली या ही आहेत

चांदी चे दरवाजे आणि सोन्याच्या वस्तू ..

माधवराव सिंदिया यांनी स्वताच्या  ऐशोआरमी प्रवासासाठी इंजिन आणि एक बोगी  बनवून घेतली होती  , रोल्स रॉइस कडून ती ही आहे इथे पाहायला

त्यांच्या पगडी- अंगरखे स्त्रियांची वस्त्रे साड्या आणि मॉडर्न  इंग्लिश व्हरायटी  बैठकीच्या आसनाची खोली  बग्गी (व्हिक्टोरिया n २०३ आठवला )

मराठा साम्राज्याचा विस्तार केलेला नकाशा

कागल , अक्कलकोट ,जव्हार ,मिरज  झांसी आणि  होळकर व  लक्ष्मी बाई नेवाळकर घराण्यातील सूना सिंदिया बनून इथे आल्या

माधवरावांनी वापरलेली पेन आणि घड्याळं त्यांची क्रिकेट साहित्या ची ठेव, देवांचे देव्हारे  एक तर धातूच्या मोराच्या तोंडात धरून बॅलन्स केलेलं श्री कृष्णाचा देव्हारा

गालिचे आणि त्या वरचे डिझाईन्स

सर्वच आलिशान , गर्भ श्रीमंती झळकते सिंदिया घराण्याची

अत्यंत प्रसन्न चित्ताने काही तरी भन्नाट आणि अमूल्य ठेवा पाहायला मिळाला या नादात आम्ही बाहेर पडलो

तिथून आलो ते सूर्य मंदिर पाहायला कोणार्क ची प्रतिकृती , छान उभारली आहे  आणि अत्यंत स्वच्छ आणि शांत  अशी जागा कारण आत न्यायला मोबाईल नाही .. सो फोटो नाही

सेल्फी नाही  , फक्त डोळ्यात साठवून ठेवणे इतकेच

तिथून MPT ला येऊन  मसाला खिचडी आणि पापड ऑर्डर केले आणि  आजचे ग्रह बहुतेक  इथूनच फिरले

सुपा सारखी मसाला खिचडी  पीता येईल अशी .. पुन्हा आटवून आणायला सांगितली मग निदान खाणेबल तरी झाली

.

बाहेर पडून ola ॲप डाऊनलोड करून टॅक्सी ऑर्डर केली आणि त्याने उगाच घोळ घालत या दाराने का त्या दाराने करत कसे बसे किल्यावर आणले आणि ola money प्लस १०० रू जास्तीचे घेऊन लुटून गेला.

किल्ला मस्तच , अभेद्य , आज पर्यंत कोणालाही जिंकता न आलेला हा किल्ला .. एकसंध  एकछत्री राज्य फक्त आणि फक्त सिंदिया.. amazing history

बाकी नेहमीचे महाल , टॉम्ब आणि किल्यात असणारे प्रोटेक्टिव्ह दरवाजे आणि इतर अनेक गोष्टी .. गुरुद्वारा , मशीद आणि  गोपाचाल जैन पर्वत , जोहर कुंड म्युझियम असे सगळे आहे , पाहायला भरपूर काही अगदी धावत पाहिले तर काही आरामात  आवडीप्रमाणे वेळ देता आला हे महत्वाचे

गुजरी महाल इतिहास अभ्यासक मंडळींचा आवडीचा विषय आणि जागा  शिल्प आणि शस्त्रे यांसारख्या पुरातत्त्वीय वस्तूंचे प्रदर्शन करणारे ऐतिहासिक राजवाडा-संग्रहालय.मूळतः तोमर शासकाच्या राणीसाठी बांधलेला एक निवासी राजवाडा, आता मध्य प्रदेश सरकारद्वारे प्रशासित सुव्यवस्थित, सुंदर देखभाल केलेले संग्रहालय आहे.संग्रहालयात कला, संस्कृती, स्थापत्य आणि BC 2रे शतक ते अगदी अलीकडील सिंधिया काळातील विविध कालखंडातील शिल्पांशी संबंधित वस्तूंचा अतिशय समृद्ध संग्रह आहे.संग्रहालयात 20 गॅलरी आणि एक अंगण आहे जे असंख्य वस्तू प्रदर्शित करते.

शिल्पे अशोक काळातील  राजधानी दर्शवितात. बौद्ध धर्मातील स्तूपांचे तुकडे मुस्लिम  राज्यकर्त्यांनी विद्रूप केलेल्या मूर्ती  वैदिक धर्मातील विविध देवता जसे की सूर्य, अग्नी, कुबेर इ.

हे विविध शिलालेख, नाणी, चित्रे, शस्त्रे आणि काय नाही ते देखील प्रदर्शित करते.

भेट देण्यासारखे सर्वोत्तम संग्रहालयांपैकी एक ते दीड तास नक्कीच हवा

एक सास बहु मंदिर आहे

सुंदर प्राचीन मंदिर. मंदिरांमध्ये कोरलेल्या जवळजवळ सर्वच विधींचे तोंड कसे खराब झाले हे पाहून वाईट वाटले. मुस्लिम मुघल  आक्रमकांचे काम

खरेतर सांस बहु असे काही नाहीये ते मंदिर सहस्त्रबाहू  मंदिर वाटले मला . गुटखा खाऊन बोलतांना  इथल्या स्थानिक लोकांनी त्याचे सास् बहु करून टाकले आहे

अत्यंत गलिच्छ शहर , भांडकुदळ लोक

आणि कोणाला काहीही विचारले तर आधी पचकन  गुटखा  खाल्लेला थुंकणार आणि मग आपल्याशी बोलणार.

सगळ्या गाडी चालकांना पब्लिक प्रायव्हेट सर्वांना प्रचंड हॉर्न वाजवत जायची सवय आणि कोणीही तरी बाजुला ही होत नाही .इतके वाईट्ट

चेहेऱ्यावर एक मग्रुरी आणि.     नैसर्गिक   ” आपण कोणाच्या बापाला ऐकत नाही ” हीच तऱ्हा , राजे राजवाडे हीच वृत्ती आणि प्रवृत्ती

रिक्षा वाल्याशी वाद  , ola वाल्याशी असाच वाद ,टोटल ३५ किमी फिरलो आणि त्याचे एका कार hire ने २५०० सांगितले .. आऊट rightly rejected ,  आम्हाला  नाही वाटत की पुन्हा कधी या शहरात जाऊ

ग्वाल्हेर ची  ऐतिहासिक ओळख  हीच लक्षात राहिलेली बरी आणि आताची परिस्थिती इतकी वाईट आहे की संपूर्ण पिढीच वाया गेली की काय अशीच शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.. व्यसन आणि मग्रुरी व भांडण काढायची उकरून हीच कला अवगत आहे त्यांना

आज खरंच  .. नर्मदे हर ….

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}