देश विदेश

  ग्वाल्हेर ते दतीया ते झांशी ते ओरछा 

ग्वाल्हेर ते दतीया ते झांशी ते ओरछा

उप्प्या ची भटकंती https://uppendse.blogspot.com/2025/03/day-6_7.html

सकाळी ग्वाल्हेर हून अगदी वेळेत निघालो 8.40 ला आणि हायवे ला लागून दतिया नावाच्या गावी आलो..

पितंबरा माता मंदिर कॉम्प्लेक्स छान आहे आणि लवकर आल्यामुळे आरामात दर्शन झाले

 

 

 

पार्किंग च्या वेळी मज्जाच.. mH ची गाडी पाहून 50 रू मागितले .. आता एक advantage आम्हाला कळले , घारे डोळे

इथे कोणाचेही नाहीत त्यामुळे तो घाबरला आणि मी मिलिटरी वाले  घालतात तसा स्वेटर ही घातला होता ,  आणि  ते पाहून तो म्हणाला  आप कम दो . ३० दे दो, पावती काढली आणि २० ची पावती तीस म्हणून tamper करून द्यायला लागला .. मी पाहिले आणि बोललो की बाहर से कोई आये तो ऐसे करते हो क्या,  पितांबरा माता के सामने ऐसी करतुत,  तो ओशाळला आणि त्याने तीस रुपये परत केले … अजून एक प्रकार लुटण्याचा .. असे सतत सुरू असते काही ना काही.. तिथून विर जी का महल म्हणून  पाहायला गेलो , G२० वेळी ही साईट archeological साईट म्हणून  consider केली होती पण रस्ता म्हणजे दिव्य च दोन्ही बाजूला गटार ते ही ओपन आणि त्याच्या मधून गाडी घालून आम्ही वर पोहचलो .. रिटर्न यायला स्कोप नव्हता म्हणून.. रिव्हर्स आणि रिटर्न म्हणून वळवायला जागाच नाही

हवेली  मात्र भन्नाट बांधली आहे  केवळ दगडाची   , लोखंड जराही नाही वापरलेले आणि खूप उंच उंच पाच मजले आहेत. फोटो वरून अंदाज येईलच

 

 

ती पाहून आम्ही दतिया मधून झांसी ला निघालो. MP बॉर्डर क्रॉस करून UP मध्ये आलो.  Up काय MP काय  सगळे एकाच माळेतले शिरोमणी….. दोन्ही ही एकजात सेम

लक्ष्मी बाईंची आणि गंगाधर पंतांची झांसी हायवे पासून किल्ल्यापर्यंत एक छान इम्प्रेशन देऊन गेली  पण राणी महल आणि गणेश मंदिर पाहायला गेलो आणि आजची झाशी समोर आली ती एक झाशीची राणी ॲक्टिवा वर एका झाशी च्या सरदाराच्या बुलेट ला डायरेक्ट ठोकून च .. थुंकणे आणि बोलणे हे म्हणजे एकडची एक अत्यंत अस्वच्छ गोष्टच. Highlight  च होते डायरेक्ट..

कसे ही गाड्या चालवणे आणि कुठून ही मनात आले  की वळायचे .. पोलिसाला कोणीही जुमानत नाही , up पोलिस यांची  केविलवाणी अवस्था आहे अश्या शहरात.

किल्ला जबरदस्त , अप्रतिम आणि इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे. कडक बिजलो तोफ इंग्रजांची झोप उडवणारी

 

 

जम्पिंग पॉइंट वरून मारलेली उडी, झाशी मधील स्वातंत्र्य लढा  आणि आगीने रौद्ररूप धारण करून अक्षरशः गिळंकृत केलेली झाशी  .. असा सगळा इतिहास च डोळ्यासमोरून तरळून गेला

 

 

लक्ष्मीबाई नी पाठीवर दत्तक मुलाला घेऊन घोड्यावरून जी ऐतिहासिक उडी घेतली ती जागा पाहून मन थक्क व्हायला होते. पस्तीस चाळीस फुटांपेक्षा जास्त खोली असलेल्या बुरुजावरुन तो घोडा काय त्वेषाने उडी मारत गेला असेल आणि राणी लक्ष्मीबाई यांची   युद्ध कलेतील स्किल्स  काय घोटवलेली असतील , निडर आणि बेफाम .!!!. मेरी झांसी नहीं दुंगी चां थरार काय असेल !!!

Govt म्यूझियम पण अप्रतिम सर्व प्रकारच्या झाशी मधल्या आणि भारताच्या वेगवेगळ्या डायनेस्टीच्या संस्कृतीमधील सर्व गोष्टी तिथे अत्यंत नेटकेपणाने मांडलेल्या आहेत नाणी असोत प्रत्येक एमपी मधल्या वेगवेगळ्या भागातल्या काही कला असोत एखाद्या गावातल्या रोजचं जीवन कसं असावं त्याचं छान प्रेझेंटेशन त्याचबरोबर एक अत्यंत अत्याधुनिक अशी चोपर  बेस्ड  ए आय वापरून केलेली झाशी शहराची आख्खी टूर ही मात्र  मुख्यमंत्री योगींच्या डोक्यातून आलेली एक भन्नाट कल्पना आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन इथे होताना आपल्याला दिसतं

ही टूर बघितली तर वेगळं जाऊन झाशी बघण्याची गरजच नाही इतकी छान आहे नऊ मिनिटाचा एक व्हिडिओ सुद्धा मी शेअर करेन त्यामध्ये तुम्हाला झाशी मध्ये काय काय आहे याची एक छानशी झलक मिळून जाईल

दतिया आणि झाशी  संस्थान पाहून आम्ही अत्यंत आरामात पुन्हा एकदा MP  UP बॉर्डर क्रॉस करून मध्यप्रदेशात आलो  ओरछा नावाच्या सुंदर गावात  बेट्वा नदी किनारी एक शांत प्रसन्न रिसॉर्ट आहे तिथे आज पोहोचणार  सहा पर्यंत

पोचलो च वेळेत

ओरछा उद्या पाहणार

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}