
खजुराहो
सिर्फ नाम ही काफी है
इथे काय नाही
सुंदर शहर , archaeological साईट ..mesmerising, amazing…..
सकाळी ओरछा हून निघालो आणि भारतातील मी फिरलेल्या रस्त्यामधला सर्वता सुंदर रस्ता आहे त्या वर 175 किमी गाडी चालवली आहे , पोटातले पाणी ही हलत नाही इतका छान बनवलेला आहे ..आपल्या मुंबई पुणे पेक्षा तर 100 पट चांगला
इतक्या स्मूथ पोहोचलो खजुराहो मध्ये की काही कळलेच नाही ..
हॉटेल चेक इन केले आणि रिसेप्शन वर सगळे समजून घेऊन वेस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पल पाहायला निघालो
खजुराहो म्हणजे कामसूत्र अशी एक डोक्यात प्रतिमा झाली होती ती actually यायच्या आधीच बदलली होती आणि आल्यावर तर पूर्ण बदलली
ऑन लाईन पद्धतीने तिकीट काढून आत गेलो .. गाईड ची गरज नाही सर्व व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि त्याचे प्रत्यंतर येते आत गेल्यावर, इथे ही गाईड प्रचंड किमती ,आणि आत गेल्यावर कळते की गरजच नाहीये गाईड ची
सर्वात आधी आपण कांदरीया महादेव मंदिरात येतो .. 1025 ते 1050 मध्ये याचे निर्माण झाले आहे, शिल्प आणि कोरीव काम अप्रतिम आणि एक महत्वाची गोष्ट प्रत्येक मंदिरात प्रवेश करतांना आधी गंगा आणि यमुना आहेत .. विषय हा की आपण कसे ही गेलो तरी प्रत्येक मंदिरात प्रवेश करतांना शुचिर्भूत होऊन च आत जाऊ या साठी…
बाहेर जरासा जरी उजेड असला तरी आत गर्भगृहात त्याचे प्रत्यंतर येते आणि मूर्ती स्पष्ट दिसतेच
सर्व मंदिरात अशीच रचना आहे
कांदरिया मंदिराच्या बाह्य भागात sculputres आहेत ज्या बद्दल खजुराहो लोकांसमोर मांडले ते समोर दिसते–कामसूत्र
शरीर सुखातून पुढे आलात की मी तुम्हाला मुक्ती प्राप्त करून देईन असे सांगणारे महादेव. जगदंबी, विष्णू आणि सूर्य समर्पित चित्रगुप्त , यात 11 मस्तक असलेली विष्णू मूर्ती आहे , विश्वनाथ ,प्रतापेश्वर , लक्ष्मण अशी मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि तुल्यबळ आहेत .. पूर्वी 85 मंदिरे होती आता केवळ 250आहेत , महामंडप . अर्ध मंडप , विशिष्ट प्रतिमा आणि आणि गर्भगृह अशी रचना सर्वच मंदिरांची
नंदी मंडप. आतून काशी विश्वनाथ सारखे आणि बाहेरून पिरॅमिड
मोठे मोठे वृक्ष त्याच भागात दगडांना वेढून जमिनीत मुळे घट्ट रोवून उभे राहिलेले पण आहेत याच कॉम्प्लेक्स मध्ये मातंगेश्र्वर मंदिर ही इथेच आहे ..
चतुर्भुज मंदिर वामन मंदिर आणि जवेरी मंदिर अशी अजून तीन मंदिरे आहेत
एक नवीन उत्खनन होते आहे असे कळले ज्यात या सर्वांपेक्षा खूप मोठी मंदिरे मिळतील अशी अपेक्षा आहे असे लाईट अँड sound show मध्ये सांगत आहेत
सांस्कृतिक गाव – मध्यप्रदेश मधील जन जीवन आणि लोक कला याचे अभूतपूर्व असे डिस्प्ले -आदिवर्त नावाचे इथे MP gov ने छान प्रत्यक्षात आणले आहे
महाराष्ट्र एमटीडीसी यांची खरंच आपले सर्व अधिकारी यांना चार दिवस MP मध्ये पाठवून काय करायला हवे आणि कसे याचे ज्ञान घ्यायला उपयोगी होईल, MTDC ची दारुण अवस्था आणि MPT ची प्रचंड मोठी उडी यात कमालीची तफावत आढळते
लोक कला , जाती आणि त्यांचे जीवन . वापरायच्या वस्तू , धान्य कोठार , तिर कमठा, स्वयंपाकाच्या वस्तू , घरातील वेगवेगळ्या जागा , infact वेगवेगळ्या जाती तील वेगवेगळी घरे आणि त्यांची स्टाइल्स व एरिया सर्व नीट समजते
Mpt खजुराहो पुन्हा एकदा टुरिझम चे महत्व सांगत आपल्याला सर्व सुखसोयी देत आरामाचा stay देण्याचा पूर्ण आणि सक्सेसफुल प्रयत्न करते..
रात्रीचा लाईट अँड sound शो म्हणजे एक सुंदर ट्रीट च जणू
सर्व इतिहास .. ही मंदिरे कोणी कधी कधी बनवली आणि काय गणिती भूमिती आणि calculatuon होती … कलींजर राज्य या स्थापत्याचे संपूर्ण श्रेय घेते आणि अत्यंत युक्तच
आक्रमणे , नैसर्गिक संकटे यातून पुन्हा पुन्हा उभे राहिलेली ही मंदिरे स्थापत्य कलेचा वारसा आहेत
खजुराहो अत्यंत स्तुत्य असून शारीरिक आकर्षण संपल्यावराच मानसिक शांती पर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढत असताना त्याची प्रचिती येते .. काही लोक मंदिर न पाहता याच प्रतिमा पाहत असतात आणि त्यांची प्रगती खुंटलेली राहू शकते किंवा त्यांच्या अध्यात्मिक विकास सुरू व्हायला वेळ लागणार आहे असे दिसते
खजुराहो सुंदर सिटी आहे.. ओल्ड सिटी पासून वेगळी बसवलेली आणि त्यात सर्व काही आहे .. या आणि आनंद घ्या