Jabalpur

पन्ना ते. जबलपूर
उप्प्या ची भटकंती https://uppendse.blogspot.com/2025/03/jabalpur.html
मकर संक्रांती नर्मदा दर्शन
सकाळी पन्ना अभयारण्यातून वेळेवर निघालो आणि जबलपूर च्या वाटेवर लागलो
पांडव फॉल्स आणि पांडव गुहा सहा किमी वर आहेत त्या बघायला
पांडव वनवासात असताना येथे येऊन गुहेत राहिले होते अशी मान्यता आहे
सुंदर जागा , दरीत उतरत खाली खाली जात एका मोठ्या तलावापाशी पोहोचते .. तिथे जातांना आपल्या लहानपणी पाटी पेन्सिल होती ना त्या पाट्या बनवायचे दगड लागतात.. (फोटो आहे) तिथून खाली गेलो की तळे नितळ पाणी आणि वाहते आहे
तळ्याच्या बाजुला पाच छोटी मंदिरे आहेत ती पांडव मंदिरे आहेत आणि त्या खाली मोठ्या मोठ्या गुहा आहेत , त्यात , वनवासात पांडव राहायचे अशी मान्यता आहे
छत्रसाल राजाने त्यांच्या शिकारीच्या छंदासाठी तिथे काही अजून गुहा सदृश बांधल्या आहेत .. आता त्या protective rooms म्हणून वापरल्या जातात . हा भाग अभयारण्याच्या हिनोटा गेट मधून जाऊन ही ॲक्सेस करता येतो , बफर संपल्यावर कोअर जंगल लागते त्यात आहे , जंगली श्वापदे इथे पाणी प्यायला येतात त्यामुळे येथे गाईड शिवाय जाण्याची परवानगी नाही.. कन्हैया नावाच्या वाघाचा हा एरिया आणि तो सर्वात जुना वाघ आहे सध्याचा इथला , ११ वर्ष वय आणि बांधवगड ते पन्ना या कॉरिडॉर मधून त्याचा दोन्ही जंगलात मुक्त संचार सुरू आहे.. त्याला सगळे लोक एक आपल्या घरातला व्यक्ती असल्या सारखेच बोलतात वागतात .. कन्हैया ऐसा है वैसा करता है. वगैरे… त्याच्या सर्व सवयी . तो कुठे असतो आणि कुठे दिसतो हे ही त्यांना माहीत असते .. आम्हाला ही त्याने असेच त्या दरीतून वर वर येत असताना फॉल्स च्या पलीकडे जंगलात दर्शन दिले आणि फिरत फिरत गेला .. असे सांगतात की तो संध्या territory मार्किंग करायला १५ दिवसापूर्वी परत आला आहे .. आधी दोन महिने बांधवगड मध्ये जाऊन आला होता , दोन दोन अभयारण्यात मुक्त संचार असलेले असे वाघ फारच कमी.. आणि अत्यंत पॉप्युलर .. आज पर्यंत मानवाला त्रास नाही दिलेला त्याने म्हणून लोकल लोकांचा ही अत्यंत आवडता
ते पाहून आम्ही दुपारी दोन पर्यंत जबलपूर ला आलो. थोडा आराम करून चार वाजता सदर नावाच्या मार्केट place ला visit केली
Burger sing
Traffic jam
शिकागो d lite
अशी नावे असलेल्या हॉटेल्स चां एरिया आणि इतर नेहमीचे शॉपिंग.. बघत बघत फिरत असताना मोबाईल ची काच फुटली होती खजुराहो मध्ये ती बदलली आणि इंडिया कॉफी हाऊस मध्ये बऱ्याच दिवसांनी साऊथ इंडियन फूड , रवा मसाला आणि म्हैसूर साधा असा ताव मारला आणि वर टिपिकल साऊथ ची तयार करून दिलेली कॉफी ..मस्त जमले ..
संध्याकाळी तीलवारा घाटावर नर्मदा दर्शन घेतले , संध्याकाळी प्रचंड गर्दी मकर संक्रांत निमित्ताने मोठी आरती आयोजित केली होती त्याचा लाभ घेतला आणि सर्वात महत्वाचे नर्मदा मैंय्या दर्शन.. नर्मदे हर.
स्वच्छता या विषयावर मुख्य पंडित जे होते त्यांनी प्रचंड खडे बोल सर्वांना सुनावले ..घाट अत्यंत स्वच्छ करणे किती आवश्यक आहे. आणि त्या बद्दल बोलायची गरज का लागलेली आहे याचे महत्त्व त्यांनी आरती आणि नर्मदा अष्टक या आधी सांगितले
प्रसन्न अशी घाटावरच्या वातावरणातील संध्याकाळ मस्त हवा थंडी आणि नर्मदा मैंय्या च्या काठावर ..पवित्र स्थानावर . आणि ते ही मकर संक्रमण होत असताना चां सूर्यास्त
पर्वणी महाकुंभा इतकीच पवित्र आणि परत न मिळणारी
प्रसाद , तीर्थ घेऊन परत येताना .. जबलपूर पॉवर ग्रीड .. एक किलोमीटर पसरलेली सर्वात मोठी ग्रीड चे स्टेशन, त्याच बरोबर मंगळवार आणि सिटी मध्ये पूर्ण सुट्टी असल्याने सर्व जण घाटावर होते म्हणून आपल्या पुण्याच्या तुळशीबागेत कधी गाडी नेता येत नाही अश्या जबलपूर मधल्या रस्त्यांनी गाडीतून फिरलो.. नवीन होणारा रेल्वे वर चां बिन पिलर चां पुल पहिला. पुलावर १०० मीटर चे circle असलेला अशक्यप्राय ब्रीज पहिला .. हायवे नर्मदा क्रॉस करणारे ब्रीज आणि त्या खालून वॉटर चॅनल असा एक ब्रीज पहिला वॉटर चॅनल १०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बर्गी dam पासून सुरू होतो आणि. बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा योजना त्या अंतर्गत आहे, जबलपूर मधील सांताक्रूझ मिलन सब वें सारखा त्याहून छोटा आणि फक्त छोट्या गाड्या जातील असा गुहे सारखा under pass मधून जाऊन पाहिले..जबलपूर ची वैशिठ्ये पहिली आणि प्रकाश चाट नावाच्या जग प्रसिद्ध चाट वाल्याकडे आलू चाट आणि पाणीपुरी खाऊन रात्री १० ला हॉटेल ला परत आलो
उद्या पंचमढी MP चे महाबळेश्वर
आमचे तर व्हायलाच पाहिजे ना … रूटीन ते रूटीन