देश विदेश

जबलपूर ते पचमढी  

जबलपूर ते पचमढी
उप्प्या ची भटकंती https://uppendse.blogspot.com/2025/03/blog-post_2.html

जबलपूर ते पचमढी

सकाळी नेहमी सारखे साडे आठ ला चेक आउट आणि जबलपूर मध्ये MPT कलचुरी एकदम सेंटर ला होते रेल्वे स्टेशन पासून एक किमी वर सो तिथून जबलपूर बाहेर पडायला ट्रॅफिक व्हायच्या आधीच  बरे असा विचार करून आम्ही लवकर रस्त्याला लागलो

तेंदूखेडा बरेली पिपरिया करून  आम्ही पचमढि पोहोचलो..  बऱ्याच डोंगरांच्या मध्ये वसलेले हे मध्य प्रदेश चे महाबळेश्वर.. सगळे आहे पण काही नाही असे

it is an overrated hill station..

Mp मध्ये सर्व मैदानी भाग साधारण पणें ५०० मीटर वर आहेच तिथून फक्त अजून ५०० मीटर वर.. हलका घाट चढ आणि लांब चे पण सुंदर रस्ते .. ब्रिटिश टाऊन असल्याचे  पुरावे खूप .  ब्रिटिश बंगला संस्कृती आणि एक त्याला सप्लाय सपोर्ट सिस्टिम साठी लोकवस्ती . लोकल लोकांना पैसे आणि काम मिळावे या साठी खूप ठिकाणे फक्त त्याच्याच गाडीतून आणि त्यांच्याच बरोबर पहावी लागणार अशीच सोय ..

आराम करायला हवा छान आणि bunglow भारीच  आणि फिरायला सगळे जवळपास

औषधी वनस्पती आणि त्या पासून बनवलेले प्रॉडक्ट्स हे इथले लोकल वैशिठ्य ..

राजेंद्रगिरी पॉइंट वरून सर्व बाजूंची पंचमढी दिसते आणि जवळच बोटिंग आणि चंपक लेक आहे तो पाहून परत संध्याकाळी लोकल आयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या वस्तु घेतल्या काही सुवेनियर्स घेतली आणि हॉटेल ला परत आलो

आणि आज दोन मस्त ठिकाणे पाहायला मिळाली

बडा महादेव आणि गुप्त महादेव.. आणि नंतर गेलो जयशंकर  असे तिन्ही महादेव दर्शन

 

 

 

 

 

 

 

 

पचमढी पासून ६ किमी वर बडा महादेव मंदिर आहे अगदी हेअर पिन curves चे  रस्ते आणि चढ उतार  एक दोन डोंगर क्रॉस करून तिसऱ्या डोंगरात  खाली खाली जाऊन आपण एका ठिकाणी गाडी पार्क करून या दोन्ही ठिकाणी जाऊ शकतो

पहिल्यांदा आम्ही गेलो बडा महादेव दर्शन.. एका चाळीस पन्नास फूट अश्या तिरक्या गुहेत महादेव आत मध्ये  स्थानापन्न झाले आहेत.. अती थंड पाण्यातून चालत जाऊन च दर्शन होते   शिवपिंडीरूप दर्शन  घेतले. जवळच पार्वती गुंफा पण आहे तिथे जाऊन पार्वती मातेचे दर्शन घेतले आणि गुप्त महादेव दर्शन करण्यासाठी आलो.. एक व्यक्ती साईडवेज चालेल इतकीच जागा असलेली एक घळ आणि त्यात आत चालत गेल्यावर महादेव आणि गणपती बाप्पा दर्शन..  ((घळीचा व्हिडिओ नक्की पाहा))

तिथून परत आल्यावर गेलो ते जयशंकर महादेव दर्शन करायला

दोन डोंगरांच्या मध्ये पायऱ्यांची वाट उभी च्या उभी खाली उतरते .. वाटेत  जातांना आपल्याला नैसर्गिक रित्या तयार झालेले आकार , गणपती सोंडे सहित, त्या नंतर हनुमान आणि मग व्याघ्र आणि  शेषनाग असे चारही आकार नीट दिसतात .. आत मध्ये मोठी गुहा आहे त्यात मगर, महादेव आणि पार्वती माता यांची स्थाने आहेत

या तिन्ही ठिकाणची गोष्ट अशी की राक्षस

ब्रह्मासुर याने महादेवाची साधना करून त्यांना प्रसन्न केले आणि तो ज्या कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल असा वर मागितला , भोळ्या महादेवांनी दिला .. आणि हा भस्मासूर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायला मागे लागला.  त्याच्यापासून लपण्यासाठी महादेव…… पंच ( पांडव वनवासात अज्ञातवासात इथे पाच वेगवेगळ्या गुहेत राहत होते अशी ही मान्यता आहे ) मधी

( महादेवाचे स्थान) म्हणून पचमढी हे नाव…. इथे वेगवेगळ्या तीन जागेत जमिनी खाली लपून बसले ( नंतर ब्रह्म देवांनी मोहिनी चे रुप घेऊन भस्मासुरा ला नृत्य करत स्वताच्या डोक्यावर हात ठेवायला लावला)  त्या ह्या तीन जागा

खूप छान जागा आहेत पूर्ण घनदाट जंगलात आहेत थोडे ट्रेकिंग हवे करायला तिथे पोहोचायला.. येताना हार्ट ची फुल्ल टेस्ट होते इतका चढ आहे उभाच्याउभा.. आम्ही चांगले मार्क्स मिळवून पास झालो असे म्हणायला हरकत नाही

नंतर दिल्लीत म्हणतात तसे मटरकश्ती ( म्हणजे सुपात मटार सोलून ठेवला की कसा कुठे ही लोळतो वळतो किंवा सरकत जातो तसे करत आम्ही मन वाटेल त्या रस्त्यावरून फिरत होतो एक फॉल्स ही पहिला , प्रियदर्शनी आणि एको पॉइंट . आज गुरूवार तर इकडचा बाजाराचा दिवस  बाजारहाट पहिला, सनसेट पॉईंट ला चार वाजता जाऊन आलो कारण ढगाळ वातावरणात सूर्य दिसत नव्हताच

MPT ने फार छान पद्धतीने सर्व ट्रीप व्यवस्थित पार करून दिली आहे .. गेले दोन आठवडे आम्ही MP फिरून सर्व काही पाहिले..  आपल्या गाडीने जाता आपल्याला बऱ्याच जागा आणि किती ही वेळ देऊन बघता येतात त्यामुळे खूप छान ट्रीप आज MP मधून संपवून उद्या महाराष्ट्रात येत आहोत

उद्या शेगाव दर्शन ..  गजानन महाराज संस्थान आणि मंदिर याचे प्रचंड काम श्रद्धा, आस्था आणि स्वच्छता याचे  सांगितलेले महत्त्व अनन्यसाधारण आहे, तेच नर्मदा किनारी मकर संक्रांती दिवशी पुन्हा पुन्हा अधोरेखित केले जात असते..आपण ही जेव्हा कधी कुठे ही जाल तेव्हा  कचरा कुठेही न टाकता केवळ ठराविक दिलेल्या डस्टबिन मध्येच टाकावा आणि स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात आपले  योगदान द्यावे

जय माताजी

नर्मदे हर

हर हर महादेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}