काव्यगंध’ युट्यूब चॅनेल

काव्यगंध’ चे पुष्प पहिले उद्या म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या मंगल दिनी प्रसारित करत आहोत
मित्रहो,
माणसाचं आयुष्य कवितेसारखं असावं. कवितेसारखं जगलं जावं. कारण कविता नादमय असते, ब्रह्ममय असते. आयुष्याला कवितेसारखा रिदम असावा. ते भरकटलेलं नसावं. आयुष्य कधीही अतृप्त नसावं हे जरी खरं असलं तरी कवीने नुसत्या कवीकल्पनेत रमण्यात तृप्तता ठेवू नये. काव्य शब्दबद्ध करताना जी अनुभूती येते ती अनुभवावी, अनुभवत राहावी.
मनाच्या गाभाऱ्यातल्या सुंदर कल्पनांना कविता करताना मूर्त स्वरूप येते. कधी या कल्पना मानवी मनातील व्यथांना काव्याच्या रूपाने प्रवाहीत करतात तर कधी प्रेम, आर्तता, राग, लोभ, मैत्री, शारीरिक आकर्षण, सौंदर्य, निसर्गाबद्दलची ओढ, सृष्टी व तिच्यातले बदल, चंद्र, सूर्य, तारे, हवा, समुद्र यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या भावना कवितेतून शब्दबद्ध होतात.
कविता आणि शायरी लिहिण्याची आवड जपताना त्या सामाजिक माध्यमातून काव्यरसिकांसमोर आणण्याकरता ‘काव्यगंध’ हे युट्यूब चॅनेल सुरू करत आहोत.
‘काव्यगंध’ चे पुष्प पहिले उद्या म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या मंगल दिनी प्रसारित करत आहोत. तुमच्यासारख्या काव्यरसिकांकडून आम्हाला प्रोत्साहनाची तसेच अभिप्रायाचीही गरज आहे. त्यातूनच एक फलदायी भागीदारी निर्माण होऊन हा उपक्रम योग्य दिशा घेऊ शकेल.
© सदानंद देशपांडे, नवीन अगरखेडकर