ब्रेकिंग न्यूज

डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-04-2025

डीव्हीडी कॉर्नर

आजची खुश खबर

15-04-2025

 

   

अवनी ताम्हाणे , आपल्या सारेगम मधील हर्षदा ताम्हाणे हिची मुलगी देवमाणूस या चित्रपटात महेश मांजरेकर रेणुका शहाणे अश्या दिग्गज कलाकारांबरोबर चमकली   + परी कुलकर्णी , आपल्या सारेगम मधील पूजा कुलकर्णी हिची मुलगी – रंगोत्सव सेलिब्रेशन २०२५ या आंतर राष्ट्रीय स्पर्धेत स्तरावर तिसरा क्रमांक

आपल्या ब्राह्मण unity sa re ga ma समूहाची सदस्या हर्षदाची मुलगी अवनी ताम्हाणे, हिने एक छोटी पण महत्वपूर्ण भूमिका आगामी *देवमाणूस* या चित्रपटात साकारली आहे.

दिग्गज कलाकार *महेश मांजरेकर, रेणु का शहाणे, सिद्धार्थ बोडके, सुबोध भावे* यांच्या बरोबर तिचे सर्व सीन आहेत.
*चित्रपट येत्या 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे*
साधारण नोव्हेंबर 23 मध्ये आमच्या थिएटरॉन एन्टरटेन्मेंट या नाटक संस्थेतील रोहन बर्वे ज्याने या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे, त्याचा मला फोन आला, ‘ एक मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी मला अवनी योग्य वाटत आहे तर तिचे सध्याचे फोटो पाठव ‘, त्यानंतर साधारण आठवड्यात एक छोटी स्क्रिप्ट पाठवून त्याचा ऑडिशन व्हिडिओ आम्ही पाठवला, डीसेंबर पहिल्या आठवड्यात तिचे सिलेक्शन झाल्याचे कळले. डिसेंबर शेवटच्या आठवड्यात फलटण येथील सांगवी गावात, आणि जानेवारी मध्ये एक दिवस मुंबई गोरेगाव येथील फिल्मसिटी मध्ये शूटिंग चे शेड्युल आम्हाला मिळाले.
त्याप्रमाणे फलटण येथे 1 आठवडा शूटिंग साठी तिथे राहिल्या.
पहिलाच सीन महेश मांजरेकर यांच्याबरोबर लागला होता, खूप उत्सुकता आणि बरेच दडपण होते, पण पहिल्या शॉट नंतर सर्वांनी अवनीचे कौतुक केले. तोपर्यंत महेश सर जास्त बोलले नव्हते, पण नंतर मात्र अवनीशी खूप छान गप्पा मारल्या आणि पहिलच चित्रपटाचा अनुभव आणि पहिलाच सीन तरीही खूप छान एक्स्प्रेशन आणि समजून उमजून काम करते आहेस अशी शाबासकी आणि आश्वासक पावती त्यांच्याकडून मिळाली, त्यामुळे दडपण खूप कमी झाले.
रेणुका शहाणे यांच्याबरोबर चे अनुभव पण खूप छान आहेत. अत्यंत आपुलकीने आणि मायेने त्यांनी अवनीला सांभाळून घेतले, कौतुक केले.
अवनी बालनाट्यातून काम करायला नाटक समजून घ्यायला सुरुवात केली.
*2019* मध्ये नाट्यसंस्कार कला अकादमी तर्फे, *राज्य नाट्य स्पर्धेत बळी* या बालनाट्यासाठी तिला *अभिनयासाठी रौप्य पदक* मिळाले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या नाटकात ती काम करत आहे. आता ती काही व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांचे क्रिएटिव्ह पोस्टर डिझायनिंग देखील करत आहे.
कोविड काळात दादर माटुंगा कल्चरल सेंटर ने आयोजित ऑनलाईन शास्त्रीय नृत्य स्पर्धेत अवनी ला कथक ज्युनिअर कॅटेगरी मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे
अवनीने चितळे बंधू यांच्या वाकड येथील शाखेच्या जाहिरातीत काम केले आहे. एकूण 5 जाहिरातींची साखळी आहे त्यातील 2 प्रदर्शित झाल्या आहेत,
तसेच 2 सिंगल गाण्यांच्या म्युझिक अल्बम मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली आहे.
———————————————————————————————–
       
आपल्या ब्राह्मण unity sa re gam ma ची पूजा कुलकर्णी हिची मुलगी नाव: परी पराग कुलकर्णी
इयत्ता: ९ वी
शाळा: आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, पुणे
परीला चित्रकलेचा वारसा तिच्या दोन्ही आजोबांकडून व आईकडून मिळाला आहे. लहानपणापासूनच ती नवनवीन चित्रे, देखावे आपल्या कल्पकतेने काढत आलीय. रंग संगती, त्यातील बारीक बारीक शेड्स, या सर्वाची तिला उपजत जाण आहे. ड्रॉइंग मधील एलिमेंटरी परीक्षा ती ‘बी’ ग्रेड ने उत्तीर्ण झाली असून इंटरमिजिएट परिक्षेस यंदा अपियर होत आहे. तिला आजवर, आई, सौ. पूजा कुलकर्णी व चित्रकला वर्गातील सौ. संगीता गुरव या गुरुंचे मार्गदर्शन लाभले आहे.
“रंगोत्सव सेलिब्रेशन” ही स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते. भारतातील व भारताबाहेरील अनेक विद्यार्थी यात सहभागी होत असतात.
या स्पर्धेत अनेक वेगवेगळे विभाग असतात जसे, कलरींग, स्केचिंग, व्यंगचित्रे, कार्टून्स, हस्ताक्षर, इ.
परी गेल्या वर्षीपासून, कलरींग या विभागात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरावर उत्तीर्ण होऊन तिने बक्षिसे प्राप्त केली आहेत. यंदाच्या “रंगोत्सव सेलिब्रेशन 2025” मध्ये, तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला. “द अम्रिता शेरगील ॲवॉर्ड (ट्रॉफी), एक स्मार्ट वॉच, आणि सर्टिफिकेट अशा आकर्षक बक्षिसांनी तिला गौरविण्यात आले आहे.

 

डीव्हीडी कॉर्नर

आजची खुश खबर

15-04-2025

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}