मनोरंजन

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 2 लेखक राजेश सहस्रबुद्धे

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 2 ..  लेखक राजेश सहस्रबुद्धे

तर मंडळी कालच्या कथेचा पुढचा भाग………..

काल मंदारच नशीब चांगल म्हणून ऐन वेळेस देवा त्याला भेटला आणि त्या काकू निघून गेल्या, मग पॅगोडा हॉटेलच्या मॅनेजरनी त्याला त्या काकूं बद्दल सांगितल की त्या 5 वर्षांपूर्वी अपघातात मरण पावल्या होत्या………..आता पुढे
स्वतःला काला पत्थर मधला बच्चन समजत मंदार सकाळी आवरून पुन्हा त्या साईटवर गेला,दिवसभर काम करून हॉटेल वर परत जाताना एक पूर्ण म्हातारा साधू बरोबर घेतला सोबत चघळायला दाणे,वेफर्स,चीज वगरे घेतलं आणि रिसेपशन वर चावी घ्यायला थांबला, कालचा मॅनेजर काउंटर वरच होता,मंदारच्या हातात सगळी तयारी बघून त्याने विचारलं, “काय साहेब आज नाही ना रात्री बाहेर पडणार परत” पिशवी कडे आशाळभूत नजरेने पहात म्हणाला हवं तर मी कंपनी देऊ का तुम्हाला?
एकंदरीत कालच्या प्रकरणामुळे मंदार जरा टरकला होताच, देवा पण त्याची match होती म्हणून निघून गेला होता, त्याला वाटलं ठीक आहे तेवढीच सोबत होईल. त्यानी हो म्हणल्यावर मॅनेजर म्हणाला तुम्ही व्हा पुढे मी आलोच. मंदार रूम वर आला,फ्रेश वगरे झाला आणि बैठक मारून बसला,10 मिनिटात मॅनेजर पण आला,साईटवर काम जास्त असल्याने उशीर झाला होता बसता बसता शेवटी 12 वाजलेच. मॅनेजर आत आला पण दार लावायला विसरला, मंदारशेठ एक जागी बसून कंटाळले होते म्हणून उठतच होते दार लावायला तेवढ्यात……….. मॅनेजरनी बसल्या बसल्या 10 फुटावर असलेला दरवाजा हातानी लोटून बंद केला, म्हाताऱ्या साधूच एक प्रवचन झालं होतं म्हणून मंदारच्या ते लक्षात आलं नाही की त्यानी बसल्या बसल्या हात लांब करून दरवाजा बंद केलाय.
दुसरा राउंड सुरू झाला पण नेमके ice cube संपले, मॅनेजरनी नुसता हात कानाला लावला(हातात फोन न्हवता) आणि हुकूम सोडला गण्या ice घेऊन ये,गण्या आला परत त्यानी बसल्या जागी हात लांब करून दरवाजा उघडला गण्या आत आला, मंदारच लक्ष गण्याच्या पायाकडे, तो आत येत होता पण त्याचे पाय मात्र दाराकडे होते ice ठेवून निघाला तेव्हा परत निरखून पाहिल तर बाहेर जाताना पाय मात्र आतल्या बाजूला……..आता मंदार जाम टरकला,त्याला कळेना नक्की काय प्रकार आहे म्हणून त्यानी मॅनेजर कडे हळूच नजरेच्या कोपर्यातुन पाहिल……….ग्लास धरलेला हात उलटा………तोंड टेबल कडे पण पाय सोफ्याकडे उलटे……सिगरेट जळत होती पण तोंड दिसतच न्हवत………. आणि धीर गंभीर आवाजात बोलत होता,मंदार साहेब अहो भरा की तुमचा ग्लास, असे शून्यात कुठे हरवला………….
मंदार कसाबसा उठला आणि फुल भुंगाट पळत सुटला खाली रिसेप्शन वर आला पाहतो तर काय मॅनेजर तिथे TV बघत बसला होता, त्यानी विचारलं काय झालं साहेब तब्येत बरी नाही का? घाम केवढा आलाय तुम्हाला थांबा औषध आहे का बघतो द्यायला…….…..

मंदार म्हणाला तुम्ही तर माझ्या बरोबर आले होते ना वर,आपण पार्टी करत होतो मग माझ्या आधी तुम्ही खाली कसे आले? मॅनेजरच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला तो म्हणाला…………. काल ज्या काकू तुम्हाला भेटल्या त्यांचा एकट्याचा अपघात न्हवता झाला, त्यांच्या बरोबर त्यांचे मिस्टर आणि ड्रायवर गण्या पण होता तिघ on the spot गेले होते..
मंदारनी मग हॉटेल पॅगोडा सोडण्याचा निर्णय घेतला, आता उद्या बघू पुढे काय होणार……….

लेखक राजेश सहस्रबुद्धे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}