भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 5 लेखक राजेश सहस्रबुद्धे

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 5 लेखक राजेश सहस्रबुद्धे
काकू गेल्या तेव्हा त्यांची मुलगी जेमथेम तीन वर्षांची होती…..…..आजही काकू काकांबरोबर तिचा संवाद होतो……..ती आता 92 वर्षांची जक्ख म्हातारी आहे पण……….मंदार काकूंच ऐकत नाही पाहून तिनी कोकणातला प्रसिद्ध मांत्रिक देवा कडकोळला गाठलं……त्यानी सांगितलेल सगळं सामान(एक धारेच लिंबू,हळद,कुंकू,सुया,काळी बाहुली, छोटासा माईक) आणलं आणि…………………… रात्र झाली ठरल्या प्रमाणे देवा कडकोळ काकूंच्या चिरेबंदी वाड्याच्या परसात असलेल्या वडाच्या झाडाखाली आपली पोतडी उघडून बसला, काकूंच्या मुलीने आणलेल सगळं समान पुढे मांडल……………आधी एक धारेच लिंबू घेतलं त्याचे दोन भाग करून त्यावर कुंकू लावलं,दोन सुया त्याच्या मध्यभागी टोचल्या………. तेव्हाच मंदार शर्टच बटन लावत होता पॅगोडावर तर सुई टचकन बोटात घुसली म्हाताऱ्या साधूच्या प्रभावामुळे त्याला ते जास्त जाणवलं नाही…….. इकडे देवा कडकोळला नक्की कळलं तिकडे काय झालं असणार.
मग ती काळी बाहुली घेऊन तिची पूजा करण्यात आली,कवटी मध्ये भरून आणलेल पाणी त्यावर शिंपलडल तेव्हा…………मंदार गरम होत होत म्हणून शॉवर घ्यायला गेला पाणी चालू केलं पण……..पाण्याचा रंग लाल होता. देवा कडकोळनी मग बाहुलीला गुदगुल्या करायला सुरुवात केली…….इकडे मंदार शॉवर खालीच हसून हसून गडबडा लोळायला लागला………….बाहुलीची बोट मोबाईल स्क्रिन फिरवली की तिकडे मंदारच्या मोबाईलवर आपोआप काहीही टाईप व्हायला लागलं………शेवटी बाहुलीच्या हातात तो आणलेला छोटा माईक दिला …………तिकडे मंदार हँड शॉवर हातात घेऊन बाईच्या आवाजात गाणं म्हणून लागला.
लेखक राजेश सहस्रबुद्धे
ह्या कथेतील पात्र, स्थळ काल्पनिक आहेत चुकून साधर्म्य आढल्यास योगायोग समजावा