भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 6 लेखक राजेश सहस्रबुद्धे

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 6 लेखक राजेश सहस्रबुद्धे
अंकलेश्वरला क्रूझ पोहोचलं
रात्री १२.३० ची वेळ,तटरक्षक दलातील जवानांना किनाऱ्यावर तीन आकृत्या दिसल्या(काका,काकू आणि गण्या) म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिल पण त्या तिघांची पावलं समुद्राकडेच जाताना दिसत होती(भूतांचे पाय उलटे असतात),एवढ्या रात्री समुद्रात कोण जाणार मारायला असा विचार करून ते माघारी फिरले. वातावरणामध्ये होता… किनाऱ्याच्या थोड पुढे चालत गेल्यावर गण्यानी खिशातून गाडी बाहेर काढली,बघता बघता ती गाडी मस्त sedan कार बनली, आता tesla car च आपण कौतुक करतोय पण 100 वर्षा पूर्वीच tesla चिपळूणच्या रस्त्यांवर धावत होती, कारण लोकांना ड्रायव्हर सीट वर कोणी दिसायचच नाही,काका काकू गाडीत बसले, गण्या driving seat वर बसला अन गाडी मंदार थांबला होता त्या दिशेने सुसाट निघाली,गाडीमध्ये एयर कंडीशन ची हवा वातावरणाच्या गारव्यात भर घालत होती… काकूंना तर थंडीने अगदी हुडहुडी भरली होती(डायरेक्ट हाडा पर्यन्त थंडी जात होती ना)… त्यांनी मागून हात लांब करून एसी बंद केला. थोड्या वेळाने त्या नॉर्मल झाल्या…काका गोव्याचा खंबा ढकलल्यामुळे एकदम फुल्ल टू होते, मंदार ज्या हॉटेलात उतरला होता ते जरा शहराच्या बाहेरच वाटत होत… वस्ती पासून बरच दूर.. जवळ जवळ जंगलातच.. थंडी वाढल्यामुळे कुणाचच आजूबाजूला लक्ष नव्हतं… काकू अन गण्याचे हात-पाय थंडीने बधीर झाले होते… गेट समोर गाडी उभी करून गण्याने एक दोन वेळेस गाडीचा हॉर्न वाजवला… गार्डनी बाहेर एक कटाक्ष टाकला.. गेट अगदी भव्य वाटत होतं.. गेटच एवढा मोठा आहे तर… हॉटेल किती मोठ असणार.. काकूंच्या सहज मनात येऊन गेलं… त्यांची नजर गेट उघडण्याची वाट पाहत होती.. कधी गार्ड एकदाच गेट उघडतो असं झालं होतं… काही मिनिट उलटली.. गण्या च हॉर्न वाजवण चालूच होत.. तितक्यात कुठून तरी गार्ड धावत आला आणि त्याने गेट उघडलं… हॉटेल तर रात्रीच्या अंधारात एखाद्या राजवाड्या सारखा भासत होत. त्यांच्या आलिशान गाडीने हळू हळू त्या हॉटेल मध्ये प्रवेश केला…
“काय रे,” तुला तुझा मालक झोपायचे पैसे देतो का, किती वेळ झाला मी हॉर्न वाजवत आहे…” गण्या जरा रागातच म्हणाला.
बिचारा गार्ड खाली मान घालून उभा होता गण्या ने काका काकूंना गाडीतच बसून राहायला सांगितलं.. तो मात्र गाडीतून खाली उतरला आणि त्याने वॉचमन च्या नजरेत स्वतःची नजर मिळवली, तितक्यात हॉटेलचा दरवाजा उघडला गेला… रिसेपशनिस्ट दारात जांभया देत उभा होता.. जणू गाढ झोपेतून उठून आली आहे.. त्याच्याकडे पाहून वाटत होतं चाळीस-बेचाळीस वर्षाची तरी असावा.. गण्या त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानात हळूच काहीतरी पुटपुटला.. तो तसाच लगबगीने हॉटेलमध्ये गेला. गण्या पुन्हा गाडीकडे आला आणि काका, काकूंना गाडीच्या खाली उतरण्याचा इशारा केला.. काकूंनी हळूच दरवाजा उघडून त्यांचा उजवा पाय जमिनीवर ठेवला.. त्यावेळेस त्यांना असं वाटल… एखाद्या बर्फाच्या ढीगाऱ्या वर पाय ठेवला आहे.. अगदी थंडगार वातावरण… वातावरणामध्ये बदल जाणवू लागला होता.. थंडी अधिकच वाढली होती.. काकूंनी समोर हॉटेलच्या दरवाज्याकडे नजर टाकली.. पण रिसेपशनिस्टला समोर कोणीच दिसले नाही… त्यानी दोन्ही हाताच्या बोटांनी स्वतःचे डोळे चोळले… परत एकदा समोर पाहण्याचा प्रयत्न केला.. तरीही त्याला समोर कोणी दिसत नव्हते…