मनोरंजन

 भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 7 लेखक राजेश सहस्रबुद्धे

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 7 लेखक राजेश सहस्रबुद्धे

अंकलेश्वर हॉटेल परादिस

थकून भागून साईट वरून आल्यावर मंदारने पूर्ण म्हातारा साधू संपवत आणला होता, वातावरणातील झालेल्या बदलामुळे त्याच्या मनावरील दडपण अजूनच वाढू लागलं.. काकूनी हळूच वरती पाहिलं.. तितक्यात मंदारची नजर बाजूने येणाऱ्या आवाजाकडे गेली.. झाडांच्या पानाचा सळसळाट वाढला होता… त्याचबरोबर झाडांच्या फांद्याच्या घर्षणामुळे होणारा तो कर्कश आवाज.. वातावरणामध्ये एक नकारात्मक भास निर्माण करत होता…. मंदारला खूपच अस्वस्थ वाटू लागल ,आणि एक भयानक गोष्ट जाणवली. त्याच्या आजूबाजूला तीन काळ्याकुट्ट सावल्या आकार घेऊ लागल्या… त्याच्या सोबत नक्की काय घडतंय काहीच कळायला मार्ग नव्हता. घडत असलेल्या प्रकारा मुळे थंडीने कुडकुडत असलेल्या मंदारच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या… संपूर्ण शरीर थरथरू लागलं… एकाकी सावल्यांचा विभत्स हसण्याचा आवाज कानावर पडू लागला.. जो प्रत्येक मिनिटाला अधिकच तीव्र होऊ लागला.. आता मात्र त्याची भीतीने बोबडीच वळली होती…. हृदयाचे ठोके प्रचंड प्रमाणात वाढले होते… कदाचित थोड्या वेळात ते बंद देखील होतील असे वाटू लागले. तितक्यात मंदारच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला. मागे वळून पाहण्याची देखील हिंमत होत नव्हती.. तरीही वळून पाहिले. काकूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला होता आणि काही तरी पुटपुटत होत्या,जे घडत होत ते सत्य होत कि भास काहीच कळत नव्हत.. मंदारने मोबाइलमध्ये वेळ पाहिली..
त्याला झोप कधी लागली कळले नाही. तितक्यात काकू हळूच त्याच्या कानात पुटपुटल्या. “आम्ही परत येतो पंधरा मिनिटात,” आणि बाहेर निघून गेल्या, तो झोपेत होता त्याला कळले नाही की इतक्या रात्री अचानक ते सगळे कुठे गेले. एक तर ते हॉटेल त्याच्यासाठी नवीन होत… काही वेळा नंतर वातावरण पुन्हा बदलू लागल. हळूहळू त्या तीन सावल्या पुन्हा त्याच्या समोर आकार घेऊ लागल्या.. आता मात्र तो हादरले होता.. कारण काही वेळापूर्वी घडून गेलेला भयाण प्रकार आता पुन्हा त्याच्या सोबत घडत होता.तो तसाच बेड वर बसून होता, त्या काळ्या सावल्यांच रूपांतर काका,काकू आणि गण्या मध्ये होत होतं..तो एकटक तिथेच पाहत होता, त्यांच्याकडे पाहून एके क्षणी वाटलं की त्यांचा त्याला इजा पोहोचवण्याच्या हेतू नसावा..हा विचार मनात आला आणि एकदम त्याची भीती जरा कमी झाली. त्यांच्यातल्या काकू अचानक बोलू लागली ” “मंदार तू चिपळूण सोडून इकडे आलास… हे साध सुध हॉटेल नाही हे एक वाईट शक्तींचा अड्डा आहे.. तुझ्यासारखंच आम्ही ह्या हॉटेल कडे पाहून मोहित झालो होतो… अमावस्येच्या रात्री आम्ही ह्याच डील फायनल केल, की आपली अजून एक ब्रँच अंकलेश्वरला असली तर बरं पडेल म्हणून….पण आम्हाला फसवलं गेल.. आमच्या पैसे काढून घेऊन आम्हाला इथेच संपवल.. पण खर सत्र त्या नंतर सुरू झालं.. हे बघ अजुनही वेळ गेली नाही…  निघून जा…स्वतःला वाचव..”

“पण त्याने तुम्हाला का मारलं.” मंदारने थोड घाबरतच विचारलं.
तशा काकू सांगू लागल्या…..त्याने तर आमच्या मुलीला पण मागणी घातली आम्ही आनंदाने हो म्हणालो,
बर चिपळूण पासून 550 km लांब, आमच्यासोबत काय झालं हे विचारणार कोणीही नव्हतं… त्याच गोष्टीचा फायदा त्या मालकाने घेतला… त्याच्याकडे पैसा, इज्जत , मानसन्मान, प्रतिष्ठा,आहे.. तो जवळपास तीस वर्षाचा वाटतो पण त्याचं खरं वय साठ वर्षांहून जास्त असेल.. तू इथे उतरलास तसे या सगळ्याला सुरुवात झाली. तु इथे आला तिकडे देवा कडकोळ बाहुलीच्या डोक्यावर हात ठेवून अघोरी मंत्र पुटपुटत होता.. तू आता त्याच्या जगात प्रवेश केला आहेस.. तो आता तुझ्या शरीराचा देवा कडकोळच्या मदतीने त्याच्या मनोरंजना साठी वापर करून घेणार आणि शेवटी तुझा प्राण पोपटात टाकणार. अघोरी विद्येचा वापर करून तो स्वतः तरुण होतो. आम्हा सगळ्यांना मारून त्याने याच हॉटेलच्या मागे पुरलय.”
इतकं सगळं ऐकल्यावर मंदारला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तो मालक असे करू शकेल, असा असेल हे वाटलं नव्हत पण इथे आल्यापासून घडणाऱ्या विचित्र घटना पुरेशा होत्या.. त्या धक्क्यातुन स्वतःला भानावर आणत म्हणाला,
हॉटेलच्या बाहेर जाण्यासाठी मला एकच मार्ग माहीत आहे.. जर मी त्या मार्गाने गेलो.. तर तो मला नक्की अडवेल.. आता तुम्हीच मला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा.. मंदारने त्यांना विनंती केली..
काकू म्हणाल्या ,”तो दोन मिनिटात रूम मध्ये येईल.. तू लवकर आमच्या मागे ये…”
“मंदार त्यांच्या पाठोपाठ निघाला….. हॉटेल संपूर्ण अंधारात बुडाल होत…

लेखक राजेश सहस्रबुद्धे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}