मनोरंजन

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 8 लेखक राजेश सहस्रबुद्धे

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 8 लेखक राजेश सहस्रबुद्धे

अंकलेश्वर हॉटेल परादिस भाग २

त्या तीन सावल्या आणि त्यांच्या मागे मंदार हॉटेलच्या पाठीमागच्या दारातून बाहेर आले……
हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या घनदाट झाडीमुळे आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं….त्यांनी चालायला सुरुवात केली. काही मिनिट तसेच चालत राहिले. आणि हॉटेलपासून बऱ्यापैकी लांब आले.. मागे वळून पाहिले तर ते हॉटेलही दाट झाडांच्या मागे दिसेनासा झालं होता.
त्या तीन सावल्या सुद्धा आता कुठेतरी गायब झाल्या होत्या, मंदारने थोडावेळ बाजूच्या झाडाखाली विश्रांती घेण्याचे ठरवले कारण चालून चालून आणि तीनचार तासांपासून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे शरीरातले त्राण संपले होते,एव्हाना म्हाताऱ्या साधूचा अंमळ पण उतरला होता. तो एका झाडाचा आधार घेऊन बसायला गेला तितक्यात त्याच्या पाठीत कोणीतरी जोरात जीव खाऊन लाथ मारली.. मंदार जोरात तोंडावर आपटला.. कपाळावर पडल्यामुळे रक्त वाहू लागले आणि त्याच्या तोंडातून वेदनेची एक किंचाळी बाहेर पडली…
स्वतःला सावरत तो कसाबसा उठून बसला….. मागे हॉटेलचा मालक उभा होता.. त्याला पाहून मंदारला वाटलं माझी ही तीच अवस्था होणार होती जी त्या काका, काकू त्यांची मुलगी आणि झाली होती.
“मंदार” तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी मी तुला जाऊ देईन.. ह्या सगळ्या अंकलेश्वरवर माझं राज्य आहे..  माझ्या व्यतिरिक्त माझ्या मर्जीशिवाय कोणीही इथून बाहेर जाऊ शकत नाही…
“त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं भयाण हास्य पाहून मंदारच्या शरीरातला होता नव्हता त्राण ही संपला….
जेव्हा तू हॉटेलच्या आवारात उभा होतास तेव्हाच मला समजलं होतं….तुझ्या सोबत चिपळूण मध्ये काय घडलं असावं….हे बघ तुझ्यासाठी मी आधीच सगळी सोय करून ठेवली आहे..
त्याने हात करून त्याला ती जागा दाखवली.. त्याच्या साठी एक खड्डा आधीच खोदून ठेवला होता..
तो त्याच्या समोर दयेची भीक मागू लागले.. “मालक हे पहा मी इथे साईट वर काम करण्यासाठी आलो आहे,घरी सगळे माझी वाट बघतायत, मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे..!!
“तुझा स्वर्गीय आवाज, तुझा सरेगम ग्रुप…. तुझं आयुष्य….तू मेल्यानंतर माझं होईल.. तो अचकट विचकट हास्य करत त्याच्या जवळ येऊ लागला.
मंदारच्या शरीरात पळून जाण्याची देखील ताकद उरली नव्हती…
एका झटक्यात मालकाने बाजूच्या झाडाच्या खोडावर मंदारच डोकं आपटल.
आधीच कपाळावर झालेल्या जखमांतुन एक रक्ताची चिळकांडी मालकाच्या तोंडावर उडाली.. त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता.. तो आता एखाद्या राक्षसासारखा दिसत होता..

मालकाने मंदारचा एक पाय हातात धरून त्या खणलेल्या खड्ड्यात त्याला फेकून दिलं..
त्याच्या अंगावर माती टाकायला सुरुवात केली…मातीचा थंड स्पर्श त्याला जाणवत होता… पण त्याला जगायचं होतं.. त्याच्या चिपळूणच्या काकू साठी त्यांच्या मुलीसाठी.. काका साठी… आणि इतकंच नाही तर त्या मालकाला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी…..खड्डा जास्त खोल नसल्यामुळे त्याचा एक हात खड्ड्याच्या बाहेर होता…
हळूहळू त्याच शरीर मातीखाली झाकल जाऊ लागलं…कपाळावरच्या जखमेवर पडणारी माती त्यातून वाहणारे रक्त थांबवू लागली…त्याला वाटत होत त्याच्या डोक्यावर कोणीतरी बर्फाच्या पाण्याची पट्टी ठेवली आहे…
आता त्याचे संपूर्ण शरीर मातीखाली गाढले गले…. नाकात, तोंडात माती जाऊ लागली… पण आपल्याला जगलच पाहिजे…एवढा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये घुमत होता..…आपल्याला जगलं पाहिजे

मंदार आता बऱ्यापैकी शुद्धीवर आले होते.. फक्त डोळ्यांच्या पापण्या उघडत नव्हत्या… रात किड्यांचा किर्रर्रर्र आवाज फक्त कानावर पडत होता… थंडगार हवा सर्वांगाला झोंबत होती….तो आता हळुवारपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागला, अंधार असल्यामुळे आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसत नव्हता कारण डोळ्यात माती गेली होती. तो डोळे किलकिले करून स्पष्ट पाहण्याचा प्रयत्न करू लागला… तसे त्याला त्याच्यासमोर एक बाई बसलेली दिसली. काही वेळाने लक्षात आले की दूर कुठे तरी खांबावर एक छोटा बल्ब लावलेला होता आणि त्याच्या उजेडात तिचा चेहरा आता स्पष्ट होऊ लागला. त्या बाई ने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती…कपाळावर मोठ्ठ लालभडक कुंकू लावलेलं… तिचे मळकट केस चेहर्‍याच्या आजूबाजूला हवेमुळे उडत होते.. डोळे लाल भडक दिसत होते… गळ्यात हाडांच्या माळा ज्या अगदी पोटापर्यंत लोंबकळत होत्या, त्याच्या मध्यभागी एक कवटी लटकत होती त्याच बाईने मंदारला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढलं असावं…….

लेखक राजेश सहस्रबुद्धे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}