डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 30-04-2025 डॉ विभा देशपांडे

अमित कुलकर्णी.
अमित कुलकर्णी यांचे मनोगत
ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन चा २०१८ पासून सभासद आहे. सुरुवातीला गायन, वादन, रक्तदान, मेडिकल कैंप ह्यात सहभागी असायचा सारेगाम ह्या ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन च्या समूहमधे दादा कोंडके चे गाणे गायल्या पासून एक वेगळीच ओळख घेऊन वावरायला लागलो होतो. हळूहळू तबला वादक म्हणून ओळख मिळू लागली आणि वादकांच्या समूहाचा भाग झालो. हे सगळे नियमित चालू असतानाच, ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन ने अजून एका आवडीच्या आणि त्याच्या जिव्हाळ्याच्या छंदाला चालना मिळेल अशी योजना आमलात आणण्याचे जाहीर केले. ते म्हणजे ब्राह्मण यूनिटी बॅडमिंटन लीग (BBL).
मी गेली अनेक वर्षे बॅडमिंटन खेळत होतोच परंतु आपल्या ब्राह्मण यूनिटी ने आमलात आणलेल्या ह्या स्पर्धेचा भाग होण्याची संधी तो सोडूच शकत नव्हतो. त्यामुळे त्याने २०२४ च्या BBL 1.0 chya स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे ठरवले. अतिशय सुनियोजित अश्या स्पर्धा फार मजेत खेळीमेळीने पार पडल्या. त्या वर्षी त्याला फायनल्स मधे जाण्याचा योग नाही आला परंतु BBL २.० म्हणजेच २०२५ च्या आयोजित मॅचेस मधे सुपरकप नावाची अजून एक नवीन योजना राबवली आणि त्यामध्ये त्याला runnerup ची ट्रॉफी मिळाली. लहान असताना खेळण्यात अभ्यासात पारितोषिक, ट्रॉफी मिळते आणि त्याचे एक वेगळे कौतुक होते पण वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आपल्या घरच्यांकडून (ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन फैमिली) कौतुक आणि पाठिंबा मिळणे हे भाग्य तो समजतो.
ह्या स्पर्धांचे आयोजन अतिशय योजना पूर्वक केले होते आणि त्या प्रमाणे ते राबवलेही गेले. ह्यात आपले देवदत्त देशपांडे, पराग सुमंत आणि रघू जावडेकर चे विशेष कौतुक.
अश्याच योजना तुम्ही राबवत रहा आणि आम्हाला आमच्या कला गुणांना वाव मिळेल अश्या संधी उपलब्ध करून द्या.
धन्यवाद
जय परशुराम 🙏
—————————————————————-
गार्गी भट
आम्हाला तुम्हाला कळवताना खूप आनंद होत आहे की आमची मुलगी गार्गी भट हिने २५ ते २७ एप्रिल २०२५ रोजी इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर श्रेणीमध्ये कलात्मक जोडी आणि कलात्मक गट स्पर्धेत भारतासाठी २ सुवर्णपदके जिंकली आहेत.
तिला तिचे प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर, स्वप्नील जाधव आणि अश्विनी भट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे दोघांचे ही अभिनंदन
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर
30-04-2025
*डीव्हीडी ( डॉ विभा देशपांडे ) सांगणार दर महिन्यातून दोनदा*