मंथन (विचार)वैद्यकीय

“डॉक्टर-पेशंट रिलेशन वासुदेव स. पटवर्धन, पुणे.

“डॉक्टर-पेशंट रिलेशन वासुदेव स. पटवर्धन, पुणे.

सुमारे ३५ वर्षांपूर्वी एका मासिकाच्या स्पर्धेत “डॉक्टर-पेशंट रिलेशन” या विषयावर मी एक लेख लिहिला होता आणि त्याला प्रथम क्रमांक देखील मिळाला होता. आत्ता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यातील काही मुद्दे प्रकर्षाने आठवले. त्याबद्दल थोडे परत लिहावेसे वाटले.

सध्या अल्प प्रमाणात अस्तित्वात असलेल्या “फॅमिली डॉकटर” संकल्पनेचे महत्त्व! तसं पाहायला गेलं तर सर्व सामान्य लोकांना आजाराची फारशी माहिती नसते, असते ती लक्षणांची. पण हल्ली समाज माध्यमातून ज्या चर्चा होत असतात त्यामुळे बहुतेक जणांना आपले वैद्यकीय ज्ञान खूपच आहे असे वाटत असते. वैद्यकीय प्रश्नांबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की कुठल्याही आजाराचे
काही बाह्य लक्षणांवरून जनरलायझेशन करता येत नाही, किंबहुना तसे ते कधीही करू नये. प्रत्येकाची जडणघडण, शारीरिक आणि कुटुंबिय इतिहास (𝐛𝐨𝐝𝐲 & 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲 𝐡𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲) वेगळा असतो. महत्त्वाचे म्हणजे ह्या साऱ्याचा परिणाम शरीरावर, आजारावर आणि उपचारावर निश्चित होत असतो. आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर देखील हे ठासवले गेले आहे.

आणि इथेच फॅमिली डॉक्टरची आवश्यकता महत्त्वाची ठरते. सध्या दुसरा एक ट्रेंड प्रचलित होत आहे. जेव्हा रूग्ण थोडी फार लक्षणे दिसू लागतात तेव्हा तो जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो. पण नंतर मात्र १/२ दिवसातच काही गूण न आल्यास तो तडक स्पेशालिस्ट किंवा हॉस्पिटलमध्ये जातो. ते देखील जनरल प्रॅक्टिशनर च्या सल्ल्याशिवाय, बरेच वेळा त्यांना न कळवता देखील! नैसर्गिकपणे हॉस्पिटलचे डॉ. किंवा स्पेशालिस्ट रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नसतात आणि मग उपचाराची सर्व प्रक्रिया पहिल्यापासून सुरू होते. त्यामुळे उपचारासाठी दिरंगाई तर होतेच शिवाय खर्च देखील वाढतो. येथे जर प्राथमिक उपचार केलेल्या फॅमिली डॉक्टरनी (जनरल प्रॅक्टिशनरने) मध्यस्थ म्हणून योगदान दिले तर उपचार योग्य वेळेत, योग्य प्रकारे होण्यास नक्की मदत होईल.
रूग्णाची देखील अशी एक मानसिकता झालेली आहे की त्याचा हॉस्पिटलवर विश्वास राहिलेला नाही, कमी झालेला आहे. त्याची कारणे काही का असेनात पण याचा परिणाम रूग्णाच्या उपचारांवर होत असतो. अशा वेळी फॅमिली डॉ. वर त्यामानाने रूग्णाचा जास्त विश्वास असतो आणि मग हे डॉ. आपल्या बेसिक वैद्यकीय ज्ञानावरून रूग्णाला उपचारांची दिशा योग्य असल्याचे व अमलात आणत असलेल्या उपचारांची आवश्यकता असल्याचे समजावून सांगू शकतील.

रासायनिक उत्पादन घेताना आपल्या कच्च्या मालाची गुणवत्ता तावूनसुलाखून घेतली जाते, प्रक्रिया करतानाचे सर्व पॅरामिटर्स कसोशीने पाळले जातात. आणि तरीही उत्पादन १००% मिळेलच हे खात्रीने सांगता येत नाही, ते अगदी २-४ टक्के कमी आले तरी समाधान मानावे लागते. जैविक प्रक्रियांमधून तर अशा उत्पादनासाठी आणखीनही फरक दिसून येतो.
वैद्यकीय उपचारांत मानवी शरीर हा एक कच्चा मालच असतो आणि उपचार ही काही प्रमाणात जैविक प्रक्रिया असते. तेव्हा उपचारांच्या परिणामांसाठी छातीठोकपणे सांगणे नक्कीच कठीण असते. अगदी अत्यंत प्रगत देशात देखील १०१% खात्री देता येत नाही. माझ्या आठवणी प्रमाणे एक खूप प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र संपादक निवृत्ती नंतर अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांना देखील वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले होते. अर्थात दिनानाथ च्या प्रकरणाचे समर्थन करणे किंवा त्या बाबत सबबी देणे हा ईथे अजिबात उद्देश नाही.

आणखी एक सर्व सामान्यांच्या मनोवृत्ती संबंधी. एखादा डॉ. जेव्हा प्रयत्नांची शिकस्त करतो आणि तरीही अपेक्षित यश मिळवण्यात कमी पडतो तेव्हा रूग्णांचे आप्तेष्ट त्याची कुठल्याही शब्दात निर्भत्सना करताना दिसतात. अर्थात ती त्यांची त्या वेळेची नैसर्गिक प्रतिक्रिया असते (𝐡𝐞𝐚𝐭 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐦𝐨𝐦𝐞𝐧𝐭)
पण जेव्हा कोणी डॉ. आपले ज्ञान व अनुभव वापरून रूग्णाला एखाद्या असाध्य रोगातून बरा करतो तेव्हा रूग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना या गोष्टीचे सेलिब्रेशन करताना डॉक्टरांचा विसर पडतो.

लिहिण्यासारखे आणखीही बरेच आहे. पण वरिल लिखाणावर काही प्रतिक्रिया कळल्यास चर्चा करता येईल.

वासुदेव स. पटवर्धन, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}