एकीचे बळ या उक्तीची प्रचिती देणारा इव्हेंट म्हणजे शनिवार दि. २४ मे रोजी यशस्वीरित्या पार पडलेले बाल गोपालांचे व्यवसाय आणि विक्री प्रदर्शन.

एकीचे बळ या उक्तीची प्रचिती देणारा इव्हेंट म्हणजे शनिवार दि. २४ मे रोजी यशस्वीरित्या पार पडलेले बाल गोपालांचे व्यवसाय आणि विक्री प्रदर्शन.
📍📍📍📍📍📍
एकीचे बळ या उक्तीची प्रचिती देणारा इव्हेंट म्हणजे शनिवार दि. २४ मे रोजी यशस्वीरित्या पार पडलेले बाल गोपालांचे व्यवसाय आणि विक्री प्रदर्शन.
युनिटी बिझनेस कल्चर ( UBC) या ब्राह्मण युनिटी फाउंडेशन च्या महत्वाकांक्षी उपक्रमा अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनाचे हे सलग चौथे यशस्वी वर्ष.
गेले ४ दिवस चाललेल्या पावसामुळे हे प्रदर्शन रद्द किंवा पुढे ढकलावे असा विचार सुरू असताना, केवळ मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या आणि ब्राह्मण युनिटी मधील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हे प्रदर्शन अगदी ऐनवेळी ठरवलेल्या पेक्षा वेगळ्या हॉल मध्ये म्हणजे डहाणूकर कॉलनी येथील स्वस्तिक हॉल येथे शिफ्ट करावे लागले आणि तो निर्णय अतिशय योग्य ठरवला तो ब्राह्मण युनिटी च्या अनेक अनेक कार्यकर्त्यांच्या शेकडो हातांनी प्रत्यक्ष पणे पुढे येऊन स्वयंसेवा केल्या मुळेच..
पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही अशी गर्दी सुरवाती पासून ते अगदी वेळ संपल्यामुळे नाईलाजाने बाहेर काढे पर्यंत ओसरत नव्हती.
टेबल्स लावण्यापासून ते संपेपर्यंत पुन्हा हॉल स्वच्छ करून देण्यापर्यंत कार्यकर्ते, प्रदर्शनात सहभागी झालेली मुले आणि त्यांचे पालक हे सर्व जण या स्वयंसेवेत सहभागी झाले..आणि हेच ते अपेक्षित असलेले एकीचे बळ..
ब्राह्मण युनिटी च्या सारेगम या म्युझिकल ग्रुप मधील स्पंदन या समूहाने या प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती.
24 मुलांनी या प्रदर्शनात आपापल्या वस्तूंचा स्टॉल लावला होता. कोणी आपल्या पालकांच्या व्यवसायाचे प्रॉडक्ट्स, तर कोणी स्वनिर्मित वस्तू, कोणाचे पेन्टिंग्स, हॅन्डमेड बॅग्स, दागिने, फ्रेम्स/ट्रे, विज्ञान, कलरफूल T शर्ट्स, कोणी खाद्य पदार्थांचे, कोणी गेम्सचे तर कोणी पुस्तकांचे स्टॉल्स लावले होते..या स्टॉल्स वर काही अपवाद वगळता सर्व पालकांना उभे राहण्यास मनाई होती.. संपूर्ण प्रदर्शन मुलांनीच आपले व्यवहार कौशल्य दाखवायचे होते आणि प्रत्येक स्टॉल धारक विद्यार्थी त्या परीक्षेत 100++% पास झाले.. ही एक अशी परीक्षा होती ज्याचे धडे कुठल्याच अभ्यासक्रमात, पुस्तकात नसतात..
व्यवहार ज्ञान ही भविष्यातील आवश्यक अशी गरज ओळखून हे प्रदर्शन गेले चार वर्षे सलग भरवले जाते आणि वर्षागणिक याला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे..
आपले भावी उद्योजक कश्या प्रकारे व्यवसाय करतात हे बघण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आणि सर्वांनी प्रत्येक स्टॉल वर जाऊन या छोट्या उद्योजकां बरोबर संवाद साधून त्यांच्या कडून विविध वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले..
आपल्या नातवंडांना या नव्या व्यावसायिक स्वरूपात बघून अनेक आज्जीआजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद कॅमेऱ्यात टिपण्या सारखा होता..
दृष्ट लागावी असा हा यावर्षीचा उपक्रम पार पडला तो केवळ तुम्ही फाउंडेशन ला देत असलेल्या रोजच्या १ ₹ या आर्थिक सभासदत्वा मुळेच..अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांना यात सहभागी होता आले. सिनेमा, व्हिडीओ गेम्स, मोबाईल फोन्स वरच्या वायफळ वेळेच्या अपव्यया पेक्षा आणि त्यापेक्षा ही कमी खर्चात आणि जास्त वेळ देऊन काही विद्यार्थ्यांनी अक्षरशः काही हजारांची उलाढाल केली.. व्यावसायिकतेची बीजे इथेच रुजली गेली..
ब्राह्मण युनिटी फाउंडेशन च्या या उपक्रमास आर्थिक सहकार्य केलेल्या, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या, प्रदर्शनाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या प्रत्येक ब्रह्मवृंदांचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
ब्राह्मण युनिटी सारख्याच अजुन २ संघटनानी दिलेल्या सहभागाच्या आश्वासना मुळे आता यापुढील प्रदर्शन अजुन भव्य असेल याची ब्राह्मण युनिटी फाउंडेशन ग्वाही देत आहे..!
जय श्री परशुराम 🙏🏻
Team UBC – ब्राह्मण युनिटी फाउंडेशन
www.brahmanunity.in
♻️♻️♻️♻️♻️♻️♻️