डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-06-2025 — मोफत, अनुदानित अन्न हस्तांतरणामुळे भारतातील अत्यंत गरिबीचा दर झपाट्याने घसरून ५.३% झाला
----आणि आमची जान्हवी संगीत विशारद झाली----

डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर
15-06-2025
मोफत, अनुदानित अन्न हस्तांतरणामुळे भारतातील अत्यंत गरिबीचा दर झपाट्याने घसरून ५.३% झाला: जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून दिसून येते
भारतातील गरिबी कमी होण्याच्या बातमीनुसार, गेल्या ११ वर्षांत अत्यंतिक गरिबीत जगणाऱ्या लोकांची संख्या २७.१ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांपर्यंत घटली आहे, असे जागतिक बँकेने एका अहवालात म्हटले आहे. या काळात, ग्रामीण भागातील अत्यंत गरिबी १८.४ टक्क्यांवरून २.८% पर्यंत आणि शहरी भागातील गरिबी १०.७ टक्क्यांवरून १.१% पर्यंत घटली आहे.
अतिरिक्त माहिती:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2124545
जागतिक बँकेचा अहवाल:
जागतिक बँकेने केलेल्या संशोधनानुसार, भारतातील अत्यंत गरिबी कमी होण्याचा एक मोठा टप्पा पार पडला आहे.
गरिबी कमी होण्याचे कारण:
या घटमागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही महत्त्वाचे म्हणजे रोजगार वाढणे, सरकारी योजना आणि ग्रामीण भागांमध्ये विकासाची पाऊल उचलणे.
राज्यांचा वाटा:
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये गरिबी कमी होण्यात मोठा वाटा आहे.
निष्कर्ष:
भारताने गरिबी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, आणि या प्रक्रियेत अनेक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.
दारिद्र्यरेषा का सुधारित करण्यात आली ??
(आणि भारताचा प्रभाव नवीन आयपीएल हे प्रतिबिंबित करते:)
कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सुधारित राष्ट्रीय दारिद्र्यरेषा.
वापराचे सुधारित मापन, विशेषतः अन्न आणि अ-खाद्य वस्तू.
२०२१ च्या क्रयशक्ती समता (पीपीपी) Purchasing Power Parity अंदाजांचे एकत्रीकरण.
Year | Poverty Line (PPP/day) | Poverty Rate | People Below Poverty Line |
2011–12 | $2.15 (2017) | 16.22% | ~205.9 million |
2011-12 | $3.00 (2021) | 27.12% | ~344.47 million |
2022–23 | $2.15 (2017) | 2.35% | ~33.6 million |
2022–23 | $3.00 (2021) | 5.25% | ~75.2 million |
जागतिक बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ ते २०११-१२ दरम्यान भारतात जवळजवळ २७ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर पडले, तेव्हा त्यांची संख्या २७.१% वरून ५.३% पर्यंत कमी झाली.
=======================================================================
From the desk of DD ( Devdatta Deshpande )
ती दहा विशारद खाऊन बसली आहे हा विभाचा डायलॉग मला नेहमी आठवतो..
जान्हवी विशारद नाही , कधीच नव्हती 🤔..
पण ते आज पर्यंतच…
आज जान्हवी संगीत विशारद झाली, अगदी Distinction मध्ये.. नाणं खणखणीत होतेच, फक्त त्याला आज कागदोपत्री मान्यता मिळाली..
माझ्या मते जान्हवीसाठी हा फक्त एक कागद आहे, औपचारिकता आहे..
गोड गळयाची, गाणी लिहिणारी, त्याना चाली लावणारी, वेळ प्रसंगी संगीत देणारी, आणि कुठल्याही बाजेची गाणी सहज म्हणणारी जान्हवी आज संगीत विशारद झाली..
सासू सासरे, 2 दिर, 2 भावजया, 3-4 पोरं असा मोठ्ठा आणि Joint परिवार सांभाळत, शाळेत संगीत शिक्षिका म्हणून काम करत, रामपर्व सारखे अभिनव उपक्रम करत, सारेगम मध्ये परिपूर्ण सहभागी होत जान्हवीने ही सुद्धा फॉर्मॅलिटी तिने पूर्ण केली. हा कागद कदाचित संगीत शिक्षक म्हणून करिअर करायला उपयुक्त ठरेल, पण जान्हवीने त्या पलीकडे बघावे आणि संगीत क्षेत्रात नाव कमवावे हीच आमची मनापासून इच्छा आहे..
अभिनंदन जान्हवी
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर
15-06-2025