डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 01-08-2025

डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 01-08-2025
खुशखबर
खुशखबर
खुशखबर
येस
ह्या वेळी तीन तीन खुशखबर आपल्या समुह मधल्या मेंबर्स कडून आल्या आहेत , जय हो
1.आपल्या ब्राह्मण unity ची सारिका शेखर जोशी ने स्वतःचे संगीत शिक्षण यावर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.
सौ सारिकाने लग्नाआधी खैरागड युनिव्हर्सिटीचे BMus केले. त्यानंतर 2006 पासून नियमित शास्त्रीय संगीताचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. 30/35 शिक्षार्थी अगदी वय वर्ष 6/7 पासून 60 पर्यंत शिकत आहेत. Covid नंतर Online वर्ग पण सुरु केले. आता दोन्ही Online/Offline पद्धतीने शिकवते. घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तिने स्वतःचे संगीत शिक्षण सुद्धा नेटाने सुरु ठेवले. कालिदास महाविद्यालय रामटेक येथील MA Music सौ संगीता पारनेरकर (स्व प्रभा अत्रे यांच्या शिष्या आणि पारनेरकर महाराजांची सून) यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. तिच्या संगीत प्रवासासाठी सगळ्या कुटुंबाकडून शुभेच्छा 👏🏻👏🏻👏🏻
======================
2. ब्राह्मण युनिटी च्या Talent Search या सरस्वती फंड उपक्रमा अंतर्गत निवड झालेली विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या कुलकर्णी हीने MTS ऑलिम्पियाड महाराष्ट्र शासनमान्य राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत रौप्य पदक मिळवले..
ऐश्वर्या चिंचवड येथील रहिवासी असून ती इयत्ता ६ वीत शिकते.
कु. ऐश्वर्याचे संपूर्ण ब्राह्मण युनिटी तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा !