लघुकथा – दिशाभूल ले- अरुण वि.देशपांडे – पुणे. ९८५०१७७३४२

लघुकथा – दिशाभूल
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
—————————-
प्रभाकर आणि विलास दोघे मित्र , त्यांची मैत्री खूप वर्षापासूनची . जुनी- जाणती ,आणि परिपक्व झालेली.
माणसे वयोमानानुसार अशीच असतात ” अशी जी अपेक्षा असते ती या दोन मित्रांना भेटल्यावर ,त्यांच्याशी बोलल्यावर
समोरच्या व्यक्तीला हे जाणवते .मनोमन तो म्हणतो “यस..! ही माणसे मित्र म्हणून अगदी योग्य आहेत .
सत्तरीच्या घरात असलेले हे दोन मित्र त्यांचे निवृत्ती -पर्व पुण्यासारख्या आधुनिक महानगरात एकाच टाऊनशिमधील एक बिल्डींग मध्ये शेजारी शेजारी राहून व्यतीत करीत आहेत .
त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली ती साधारण पन्नास वर्षापूर्वी. तो जुना काळ, जुनी माणसे आज पुन्हा नव्याने आठवतांना
या दोन्ही मित्रांची मने भरून येणे साहजिकच आहे. तर..आपण वाचू या , यांच्या मैत्रीची कहाणी ..
दोन वेगवेगळ्या गावची ही दोन माणसे एकत्र आली ती नोकरीच्या निमित्ताने , नोकरी मिळण्या अगोदर
झालेल्या परीक्षा ,इंटरव्यू “या सगळ्या फेऱ्यांच्या वेळी हे दोघेही एकाच ग्रुपमध्ये होते .
साहजिकच त्यांचा नंबर लागेपर्यंत बोलणे हाच टाईमपास होता.मग तुम्ही कुठले ,आम्ही कुठले , अशा प्राथमिक चौकशी करून झाल्यवर दोघांना आपण एकमेकांचे मित्र होऊ शकतो याची जाणीव झाली .
योगायोगाने दोघांची निवड झाली ,तेव्हा पोस्टिंग लिस्ट पाहून तर दोघांनाही आनंद ,आश्चर्याचा धक्काच बसला .
औरंगाबादला असलेल्या मुख्य -शाखेत दोघांची पहिली पोस्टिंग झालेली होती .
प्रभाकरचे आणि विलास दोघांची गावं जवळ नव्हती ,तर एकदम विरुध्द दिशेला होती ..एक विदर्भातले तर दुसरे – मराठवाड्याच्या उस्मानाबादच्या पुढे सोलापूर रोड साईडला.
ही दोन्ही गावे औरंगाबादपासून सेम अंतरावर सुमारे- दोनशे किलोमीटर होती .
प्रभाकरच्या बोलण्यात नागपुरी टोन आणि विलासच्या बोलण्यातून कानडी -मराठी असा मिक्स टोन होता. पण म्हणतात ना-
” मैत्रीत भाषा आणि इतर कुठल्या ही गोष्टीचा अडसर येत नसतो ,फक्त मने जुळावी लागतात , मग या मैत्रीची भाषा न बोलता ..न सांगताही कळत असते .
लहानश्या गावात वाढलेली -शिकलेली ही दोन तरुण मुले पदवी मिळवून बाहेर पडली. ७०-७१ च्या त्या काळात
बँकेचा जॉब मिळणे सोपे होते . पगार जरी कमी , तरी ही नोकरी चांगली समजली जायची .
या दोघांची नोकरीसाठीची वणवण आणि पायपीट तर थांबली होती “,
मोठी जाणती माणसे, वडीलधारी मंडळी म्हणायची –
पोरांनो – आमचे ऐका , जी नोकरी मिळाली तिला “पदरी पडली -पवित्र झाली ” असे मानून रुजू व्हा ”
असा व्यावहारिक सल्ला हक्काने आणि आपलेपणाने देणारी मोठी पिढी सभोवताली होती .
प्रभाकरला आणि विलासला आपल्या परिवारातील मोठ्या माणसांचा हा सल्ला मोलाचा वाटला ..
दोघांनी बँकेत जॉईन होण्याचा निर्णय पक्का केला .
नोकरी मिळणे ” ती कोणती, कुठे ,कशी आहे ? असा आवडी-निवडीचा घोळ घालत बसण्यासारखी परिस्थिती दोघांच्याही घरात नव्हती.
हे वास्तव ना प्रभाकर नाकारू शकत होता ना विलास .
दोघे ही घरातले मोठे ,शिकून बाहेर पडलेले मुलगे “, “नोकरी लागलेल्या आपल्या कर्त्या – मुलाकडून “, सगळ्या घराला मोठ्या अपेक्षा होत्या.
आई -वडिलांनी न सांगता – मुलांनी घराची जबाबदारी स्वीकारायची असते ” ,यासाठी फॅमिलीमध्ये कधी लिखा -पढी “,करायची पद्धत नव्हती .
त्यामुळे प्रभाकर आणि विलास दोघांनी मनाची तयारी करूनच नव्या आयुष्य -पर्वाला आरंभ केला .
प्रभाकरचे वडील ग्रामीण भागात शिक्षक , आई गृहिणी , कुटुंबात इतर माणसेही हक्काने असण्याचा ,राहण्याचा तो काळ होता.
वडिलांच्या एकट्याच्या पगारात घर चालते. लग्न-कार्य या खर्चिक जबाबदाऱ्या आपले वडील कर्ज-बाजारी होऊनच पार पाडतात ,
हे पहात पहातच प्रभाकरने स्वतःचे कॉलेजचे शिक्षण अडचणी सोसत पूर्ण केले . विलासच्या घरात तर फक्त शेती आणि मेहनत करणारी ,शेतात राब-राब राबणारी गरीब साधी-सुधी माणसे होती.
नोकरीत रुजू झाल्यवर प्रभाकर आणि विलास एक रूम घेऊन राहू लागले .रूम-पार्टनर झाल्यापासून त्यांनी एकमेकाला समजून घेत ..पुढची वाटचाल करण्याचे ठरवले ..आणि त्यांच्या पगाराच्या पैश्यांनी दोघांच्या घरात “सुखाचे नवे अंकुर फुटू लागले आहेत “हे पाहून दोघे मित्र मनोमन हरखून जाऊ लागले.
प्रभाकर -विलास सुट्टीच्या दिवसाला जोडून रजा घेत मग एकमेकांच्या गावी अधून मधून जाऊन येत .
दोन्ही घरातील माणसांना या दोन मित्रांचे मोठे कौतुक वाटे.
लहान गावातील लोकांसाठी औरंगाबाद म्हणजे लई मोठी सिटी .घाटी -सरकारी दवाखाना उपचारासाठी कुणी न कुणी येई तेंव्हा त्यांच्यासाठी प्रभाकर -विलासची रूम मोठ्या आधाराची होती . दोन्हीही मित्रांनी येणारीस सर्वांसाठी या रूमचे सदा उघडे ठेवले होते .
प्रभाकर -विलासने नोकरी करतांना काय केले आयुष्यभर ..?
पगाराच्या पैशातून सारे घर चालवले, सांभाळले पण.. दोघांनी अजून एक केले ते म्हणजे-
पैसे खर्च न करता ही, जी कामे करता येतात ती सतत केली ..
जो आला त्याला अडचणीच्या वेळी मदत केली.सोबतीचा आधार दिला , आम्ही आहोत ..काळजी करू नका ..”!
या त्यांच्या शब्दांनी सगळ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला . पैशापेक्षा जास्त किंमत माणसाच्या शब्दांना असते ” याची समज असलेली माणसे मोठ्या संख्येने सभोवताली असण्याचा तो काळ होता .
उमेदीचा काळ संघर्षाचा असतो ,नियती खूप फटके देत असते .यातून जो धडा शिकतो तो खरा अनुभवी .”
प्रभाकर नेहमी म्हणतो-
मी भले पैशाने नेहमीच मदत नसेल करू शकलो पण प्रत्येकाला योग्य तेच सांगितले ..
मी नेहमीच गाईड करीत राहीन .कधी मिसगाईड नाही करीत.
विलास म्हणतो – कोणत्या दिशेने ,रस्त्याने जायचे “हे मी सांगेन . दिशा दाखवताना त्याची दिशाभूल मात्र कधीच करणार नाही.
प्रभाकरच्या -विलासच्या फॅमिली-मेम्बर्स देखील हाच आदर्श कृतीत आणून दाखवला आहे” ,याचे मोठेच समाधान प्रभाकर आणि विलासचे
निवृत्त जीवनमान अधिक सुखाचे आनंदाचे बनवणारे आहे.
—————————————–
लघुकथा – दिशाभूल
ले- अरुण वि.देशपांडे – पुणे.
९८५०१७७३४२