डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-08-2025

डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-08-2025
आपल्या सा रे ग म समुह मधल्या आरती सिन्नरकर हीची मुलगी ओवी सिन्नरकर -ओवी ची आहे
ओवी नितीन सिन्नरकर 
ओवी नितीन सिन्नरकर
तायक्वांडो ब्लैक belt खेळाडू आहे. त्याबरोबरीने काही मैदानी खेळात शारीरिक तंदुरुस्ती साठी म्हणून खेळणारी खेळाडू आहे. ह्यावर्षी प्रथमच व्हॉलिबॉल ह्या खेळासाठी म्हणून तिची निवड झाली. मुळात फक्त मैदानी खेळ म्हणूनच हा खेळ ह्याआधी ती खेळत होती, पण खेळ म्हटला की भारताच प्रतिनिधित्व हे एक स्वप्नं कायम उराशी बाळगत खेळत आली. मागील वर्षात काही वैद्यकीय कारणाने तिच्या तायक्वांडो च्या मॅचेस पासून तिला लांब रहावं लागला. ह्यावर्षी सुरुवात करताना पालकांनी बचावात्मक पवित्रा घेत सुरू करायला परवानगी देताच शाळेने तायक्वांडो आणि व्हॉलिबॉल दोन्ही खेळासाठी तिची निवड केली. शाळेकडून व्हॉलिबॉल साठी 2 विद्यार्थिनींची टीम महाराष्ट्र साठी निवड झाली आहे. त्यात ओवी चा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या मॅच साठी महाराष्ट्र च्या टीम कडून खेळण्यासाठी ओवी ची आता जोरदार तयारी सुरू आहे. लवकरच तिला आपल्या देशाच्या वतीने खेळण्याची संधी लाभो हीच शुभेच्छा आपल्या ब्राह्मण यूनिटी कडून आपण देऊ 👏👏💐💐
मुंबई येथे पार पडलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत टीम महाराष्ट्र साठी खेळून कालच ओवी परत आली आहे. टीम महाराष्ट्र ला ह्या स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-08-2025
Dr विभा देशपांडे