दुर्गाशक्तीब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Dr विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर    आजची खुश खबर     01-09-2025

Dr विभा देशपांडे
डीव्हीडी कॉर्नर    आजची खुश खबर     01-09-2025
आपल्या ब्राह्मण यूनिटी sa re ga ma ची सदस्य हर्षदा ताम्हाणे ची मुलगी…अवनी

           

कलानंद कथक अकॅडमी, ठाणे आयोजित कलांजली कथक आणि भरतनाट्यम प्रस्तुती स्पर्धा 2025 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 25 दरम्यान आयोजित केली होती. यात पुणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक व इतर महाराष्ट्रातील स्पर्धक तसेच दिल्ली, लखनौ अशा विविध ठिकाणाहून वेग वेगळ्या वयोगटातील साधारण 250 ते 300 स्पर्धक सहभागी झाले होते.

आपल्या ब्राह्मण यूनिटी sa re ga ma ची सदस्य हर्षदा ताम्हाणे ची मुलगी…अवनी, हीने कथक सिनियर कॅटेगरी (वय 17 ते 25 वर्षे )मध्ये टांझ कथक अकॅडमी तर्फे गुरु तेजस्विनी साठे यांच्या परवानगीने एकल कथक प्रस्तुती आणि समूह प्रस्तुती मध्ये तिच्या मैत्रिणींबरोबर सहभाग नोंदवला होता.

एकल प्रस्तुती वेळ मर्यादा 7 मिनिटे आणि समूह प्रस्तुती साठी वेळ मर्यादा 10 मिनिटे होती.

या स्पर्धे मध्ये अवनीने रूपक ताल सादर केला यात कथक च्या पारंपरिक रचना थाट, परण आमद, तोडा, चक्रदार परण, चक्रदार परण, तत्कार आणि फर्माईशी चक्रदार तोडा सादर केले व त्यानंतर एक कृष्ण भजन सादर केले.

या प्रस्तुतीसाठी अवनीला या गटात उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.
त्यांच्या समूह नृत्य प्रस्तुती मध्ये एकूण ७ जणींनी सहभाग घेतला होता यात त्यांनी सुरुवातीला एक वंदना, त्यानंतर एकतालातील पारंपरिक बंदिशी जशा थाट, आमद, परण आमद, तोडा चक्रदार तोडा, तत्कार, आणि नंतर होरी सादर केली.

त्यांच्या या प्रस्तुतीसाठी त्यांना १ले पारितोषिक मिळाले आहे आणि सर्वोत्कृष्ट नृत्यसरचनेसाठी देखील त्यांना पारितोषिक मिळाले आहे (४ ही दिवसातील सर्व सादरीकरणांमधून फक्त 1च विशेष पारितोषिक असते)

त्यामुळे हे पारितोषिक त्यांच्या गुरू तेजस्विनी साठे आणि त्यांना शिकवणाऱ्या भक्ती झळकी ताई यांना मिळाल्याचे खूप जास्त अभिमान आहे 😊🙏

Dr विभा देशपांडे
डीव्हीडी कॉर्नर    आजची खुश खबर     01-09-2025

 

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}