मनोरंजन

कथा- गमावलेले नाते अरुण वि.देशपांडे- पुणे 9850177342

ले-अरुण वि.देशपांडे-पुणे
कथा- गमावलेले नाते
*
तो-  का आलीस तू ?
ती-
सॉरी म्हणायला आले,
नाही , नाही, माफी मागायला आले,
तुझी, आणि हो..
घरातल्या सगळ्यांचीच..

त्यावेळी चुकलेच माझे !
किंवा असे समज-
आता डोळे उघडलेत माझे.
थोडाफार पश्चातापही झाल्यासारखं वाटतंय.
म्हणून म्हटलं- यावं तुला भेटायला.

तो-
आज आलीस,ते आलीस, पण लक्षात ठेव !
हे तुझे शेवटचे येणे ..
यायचं आणि लगेच निघायचं ,कळलं ?

ती-
आपल्यातले प्रेम, आपली लव्ह स्टोरी विसरलास का रे ?
फेमस लव्ह-बर्डस आहोत आपण एकेकाळचे.
मग लव्ह- मॅरेज केलय आपण,
आपलं हे प्रेमाचं नातं कसे तोडतोस तू ?

तो- किती मानभावीपणाने वागतेस ग तू ,
खोटेच तेही रेटून बोलतेस.
तुझ्या या डेअरिंगचे कौतुकच केले पाहिजे.

तू प्रेम केलंस हे खरं,
त्यात चुकून लग्न केलं, हे ही खरंच म्हणायचं आता.
लग्न करून तू चूक केलीस !
हे सतत सांगत होतीस.

तुला फक्त तुझी करियर करायची होती .
संसार वगैरे लोढणे तुला नकोच होते .
तुला आमची, अगदी माझी सुद्धा अडचण होऊ लागली,
फिल्म, सिरीयल आणि काय काय.
हा मायाबाजार”तुला हवा होता,
वाट्टेल ते करून मिळवींनच ही तुझी प्रतिज्ञा होती,

ती-  हो, असे म्हणाले होते मी.
तुम्ही नको म्हणायचा ,
आणि तुम्ही “विरोध करता ‘”म्हणून
तुम्हा सगळ्यांना मी “माझे दुष्मन “समजून बसले.
खरेच, त्यावेळी किनई  डोकं फिरलं होत माझं.
आता सॉरी म्हणतेय ना !

तो- घर, परिवार, संसार ,
तुला काय तुझ्या सिरियलचे एपिसोड वाटत होते की काय?
आम्ही नव्हते केले तुला बंदिवान”, तुलाच हवी होती
स्वतंत्रता ,लिबर्टी . तुला हवी तशी, तुझ्या सोयीनुसार.

ती- माफी मागणारी मी,
तुझी बायको आहे ,जरा तरी मान ठेव !
तू दया नाही का करणार माझ्यावर ?
मी घटस्फोट अर्ज सुद्धा मागे घेण्यास तयार आहे.

तो- कान उघडे ठेवून ऐक तू ,
तू लाख तयार असशील ,
पण मी बिलकुल तयार नाही,
आता आपल्यात समेट होणे नाही, घटस्फोट अटळ आहे.
गेली दोन वर्षे तू आमची कुणीच नसल्यासारखी
आमच्याशी वागलीस.

ती- किती लक्षात ठेवतोस रे तू ,
झालं गेलं विसरून जा न यार !
पुन्हा दोस्ती करू या,
मस्त सुखी ठेवीन ,आय प्रॉमिस !

तो- मला सांग,
पब्लिक लाईफ जगून तू काय कमावलस ?
काहीच नाही .

त्यापेक्षा काय काय गमावून बसलीस ?
हा विचार केला असतास ना कधी,
तर ही वेळ आली नसती तुझ्यावर.

ती-
नको ना रे इतका कठोरपणे वागूस माझ्याशी,
एक संधी देऊन तर बघ, स्वर्ग-सुख देईन तुला.

तो-
तू आणि सुख..?
आपल्यातील नात तू कायमचे गमावले आहेस.
तू येऊ नकोस…कधीच..
गुड बाय !

 

ले-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}