पालक खिचडी.. सौ उज्वला डोके.. अन्नपूर्णा 2

पालक खिचडी..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
तांदूळ,
मुगडाळ आणि
थोडी तुरडाळ
स्वच्छ धुवून हळद,मीठ,हिंग मिक्स करून कुकर ला तीन चार शिट्ट्या करून शिजवून घ्या.
आता एका कढईत पालक उकळत्या पाण्यात तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या.आणि थंड पाण्यात काढून घ्या म्हणजे पालकाचा हिरवा रंग छान तसाच रहातो.आता तेलाची फोडणी करून त्यात जिरे मोहरी हिंग फोडणी द्या.नंतर लसूण बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा आता धने पावडर,लाल तिखट,गरम मसाला, मीठ टाकून घेणे.मग बारीक चिरलेला टोमॅटो, मटार, आवडी नुसार गाजर वगैरे टाकून घ्या.. सगळे छान शिजले की पालक प्युरी मिक्स करून दोन मिनिटे शिजवून घ्या..व नंतर शिजवलेला भात टाकून सगळे हलवून घ्यावे..एका दुसरया भांड्यात तुपाची फोडणी करून लसूण,लाल तिखट,लाल सुकी मिरची फोडणीत घालून ती फोडणी भातावर घालावी..
आणि छान एकसारखे करावे…🌸🌸🌸🌸🌸 🌸
सौ उज्वला डोके.. अन्नपूर्णा 2