नवरात्री सातवा दिवस…. माता श्री कालरात्रीदेवी संकलन – अनघा वैद्य

माता श्री कालरात्री
श्री कालरात्री माता हे देवी दुर्गाचे नवदुर्गांपैकी सातवे रूप आहे, जिची नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते. ती अंधार आणि अज्ञानाचा नाश करणारी देवी असून, तिच्या भक्तांना शुभ फळे देणारी ‘शुभंकरी’ म्हणूनही ओळखली जाते. तिचे स्वरूप भयंकर असले तरी ती नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज असते आणि अकाल मृत्यूचे भय दूर करते.
माता श्री कैला देवी
कैला देवी हा आदि शक्ती महायोगिनी मायेचा अवतार मानला जातो. देवीने नंद-यशोदाच्या पोटी जन्म घेऊन श्रीकृष्णाला यशोदा मातेकडे सुरक्षित ठेऊन या छोट्या बालिकेला वसुदेव घेऊन गेले. कंसाने जेव्हा मागील सहा बालकांना मारले तसेच ह्या बालिकेला पण उचलून आपटणार तोच ती छोटी बालिका हातातून निसटून अवकाशात स्थिरावली आणि तुला मारणारा गोकुळात सुरक्षित आहे असे म्हणून अंतर्धान पावली. ही बालिका म्हणजे योगिनीमाया…. पुढे श्री कैला देवी म्हणून ह्या देवीची स्थापना झाली.
माता कैला देवी हे राजस्थानमधील करौली जिल्ह्यात असलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे, जे देवीला महालक्ष्मी आणि महायोगिनी (योगमाया) म्हणून पूजले जाते. हे मंदिर त्रिकूट पर्वत रांगेत, कालिसिल नदी (जी बाणगंगा नदीची उपनदी आहे) च्या काठावर वसलेले आहे. कैला देवी ही विंध्यवासिनी आणि हिंगलाज माता म्हणूनही ओळखली जाते.
या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. असे मानले जाते की हे मंदिर सुमारे ११०० मध्ये बांधले गेले होते आणि ते उत्तर भारतातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे.
श्री कैला देवीच्या आशीर्वादाने, करौलीच्या यादवंशी राज्यकर्त्यांनी मंदिराची देखभाल, सण उत्सव साजरे केले आहेत. १७२३ मध्ये महाराजा गोपाल सिंह यांनी मंदिराचा पाया घातला. त्यांनी श्री चामुंडा देवीची मूर्तीही स्थापित केली. ती मूर्ती गाग्रौनच्या किल्ल्याजवळील एका गुहेतून आणली जिथे त्या मूर्तीची पूजा इ. स. ११५० मधे खिंची राज्यकर्ते मुकुंद दास यांच्या द्वारे होत होती.
या मंदिराला राजस्थानमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते आणि येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.
मंदिराच्या मुख्य गर्भगृहात श्री कैला देवी आणि श्री चामुंडा देवी यांच्या प्रतिमा आहेत. श्री कैला देवीच्या आठ भुजा आहेत आणि त्या चांदीच्या चौकीवर सुवर्ण छत्रींच्या खाली विराजमान आहेत. हे मंदिर अरवली पर्वतरांगेत वसलेले आहे. श्री कैला देवी मंदिराचा वार्षिक जत्रा (कैलादेवी वार्षिक मेला) खूप प्रसिद्ध आहे.
संकलन – अनघा वैद्य